राज्यातील आदिवासी महिलांसाठी राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना राबविण्यास मंजूरी देणेबाबत. आदिवासी विकास विभाग 07-08-2025 सांकेतांक क्रमांक 202508071640080824
राणी दुर्गावती या भारतीय इतिहासातील एक पराक्रमी, शूर आणि कर्तव्यनिष्ठ राणी होत्या. त्यांचे कार्य आणि बलिदान याला भारतीय इतिहासात अढळ स्थान आहे. त्या एक उत्तम प्रशासक, बुद्धिमान आणि युद्धकला जाणणा-या योद्धा होत्या. त्यांना स्त्रीशक्तीचा आणि देशभक्तीचा आदर्श मानण्यात येतो. विशेषत महिलांच्या संदर्भात त्यांचे धोरण प्रगल्भ आणि आदर्शवत होते. त्यांनी त्यांच्या राज्यात न्यायव्यवस्था आणि सुरक्षा यावर भर दिला. त्यांनी प्रशासनात स्त्रियांचा सन्मान राखून आदर्श राज्यकारभारही केला, म्हणूनच त्यांचे राज्य स्त्रीसन्मानाच प्रतिक मानलं जात.
भारतीय राज्यघटनेने सर्व नागरिकांना दिलेल्या समानतेच्या हक्कांची अंमलबजावणी करण्यासाठी महिलांना आवश्यक संधी आणि सुविधा उपलब्ध करून देणे तसेच त्यांचा सामाजिक, आर्थिक आणि अन्य क्षेत्रातील विकास साधने, आरोग्य पोषण, आहार व स्वास्थ, शिक्षण व कौशल्य विकास इत्यादी उपजिविकेची साधने वृद्धिगंत करणे, इत्यादी माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी विकासासाठीचे सर्वागींण, सर्वकष व सर्वसमावेशक राज्याचे ४ थे महिला धोरण शासनामार्फत जाहिर करण्यात आलेले आहे.
आदिवासी महिलांचे संपूर्ण सामर्थ्य खुलविण्यासाठी शिक्षण, आरोग्यसेवा, आर्थिक सक्षमता, योग्य मार्गदर्शन, शासकीय योजनांचा लाभ आणि सामाजिक जागृतीमुळे त्यांना संधी दिल्यास त्या आदिवासी समाज परिवर्तनाच्या अग्रभागी राहू शकतात. एकूणच आदिवासी महिलांना सर्वांगिण सक्षम बनविण्याच्या उद्देशाने स्त्रीशक्तीचा आदर्श मानली जाणारी राणी दुर्गावती यांच्या नावाने आदिवासी महिला सक्षमीकरण योजना
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........