राज्यातील महिला व बालकांची मोठया प्रमाणात असलेली लोकसंख्या व राज्यातील महिलांच्या जीवनात येणाऱ्या समस्या व त्यांच्या सबलीकरणासंदर्भात भेडसावणाऱ्या समस्या ज्यामध्ये प्रामुख्याने महिलांच्या अर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक समस्या जाणुन घेऊन त्यांचा सर्वांगिण विकास होण्याच्या दृष्टीने राज्यात सन २०२५-२६ पासून आदिशक्ती अभियान राबविण्याबाबत व आदिशक्ती अभियान उत्कृष्टपणे राबविणाऱ्या ग्रामपंचायतींना आदिशक्ती पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्याबाबत दि.२२.०५.२०२५ च्या शासन निर्णयान्वये आदेश निर्गमित करण्यात आले आहेत
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान राबविणे व आदिशक्ती पुरस्कार प्रदान करणेबाबत. महिला व बाल विकास विभाग 22-05-2025 सांकेतांक क्रमांक 202505221724340830
राज्यातील महिला व बालकांची मोठया प्रमाणात असलेली लोकसंख्या व राज्यातील महिलांच्या जीवनात येणाऱ्या समस्या व त्यांच्या सबलीकरणासंदर्भात भेडसावणाऱ्या समस्या ज्यामध्ये प्रामुख्याने महिलांच्या अर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक समस्या जाणुन घेऊन त्यांचा सर्वांगिण विकास होण्याच्या दृष्टीने सन २०२५-२६ पासून राज्यात आदिशक्ती अभियान राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे महिलांसाठी राज्यात राबविण्यात येत असलेल्या विविध शासकीय योजना/उपक्रम/कार्यक्रम इ. बाबत आवश्यक व उपयुक्त माध्यमाद्वारे प्रचार प्रसिध्दी देऊन जनमाणसांमध्ये याबाबतची जनजागृती करण्यात येईल. यासाठी ग्रामस्तरीय समित्यांना "आदिशक्ती पुरस्कार" देऊन गौरविण्यात येईल.
२. आदिशक्ती अभियानाचा उद्देश व अभियानाची अंमलबजावणी खालीलप्रमाणे करण्यात येईल:-
१) उद्देश -:
१) ग्राम चळवळीतून महिलांच्या समस्यांचे महत्व जाणून घेणे व महिलांच्या आरोग्य समस्यांचे संवेदनशीलपणे निवारण करणे.
२) कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यूचे प्रमाण कमी करण्याकरीता सक्षम समाज निर्माण करणे.
३) लिंगभेदात्मक विचारसरणीला आव्हान देऊन किशोवयीन मुलींमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढविणे व बालविवाह मुक्त समाज निर्माण करणे.
४) लैंगिक, शारीरिक अत्याचार ला प्रतिबंध करून हिंसाचार मुक्त कुटुंब व समाज निर्माण करणे व अनिष्ट रुढींचे निर्मुलन करणे.
५) महिला नेतृत्वाला सक्षम करून पंचायत राज पद्धतीमध्ये त्यांचा सहभाग वाढविणे.
६) महिला, किशोरी यांना शिक्षण, रोजगार, निर्णय व हक्क यामध्ये समान संधी निर्माण करून शासकीय योजनांचा लाभ व स्वयंरोजगाराच्या संधींच्या माध्यमातून आर्थिक उन्नत स्त्री संकल्पना राबविणे.
२) अभियानाची कार्यप्रणाली :-
राज्यात सदरचे अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी ग्रामस्तर, तालुकास्तर, जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तरावर विशेष समित्यांचे गठण करण्यात येईल.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........