Thursday, July 24, 2025
Thursday, July 24, 2025
Home » जनसुविधा

जनसुविधा-ग्रामपंचायतीला जनसुविधासाठी विशेष अनुदान या जिल्हा वार्षिक योजनेर्गत ग्रामपंचायत अंतर्गत कामांची व्याप्ती वाढ व सुधारित निधी मंजूर दि. 25 जाने 2018 साठी येथे क्लिक करा

ग्रामपंचायतीला जन सुविधांसाठी विशेष अनुदान या जिल्हास्तरीय योजनेंतर्गत संदर्भाधीन शासन निर्णयान्वये मंजुरी देण्यात आलेल्या कामांसाठी खालीलप्रमाणे सुधारित निधी मंजूर करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. तसेच अ.क्र. १ (ड) येथील बाबींचा सदर योजनेंतर्गत नव्याने समावेश करण्यात येत आहे.

खर्चाची मर्यादा (रक्कम रू. लाखात)
१. (अ) ग्रामीण भागात दहन/दफन भूमीची व्यवस्था करणे, त्या सुस्थितीत ठेवणे व त्याचे नियमन करणे यासाठी स्मशान भूमीवर हाती घ्यावयाची कामे:- २०.००
१) दहन/दफन भूसंपादन
२) चबुतऱ्याचे बांधकाम
३) शेडचे बांधकाम
४) पोहोच रस्ता
५) गरजेनुसार कुंपण वा भिंती चालुन जागेची सुरक्षितता साधणे
६) दहन/दफन भूमीत विद्युतीकरण व आवश्यकतेनुसार विद्युतदाहीनी/सुधारित शवदाहीनी व्यवस्था
७) पाण्याची सोय
८) स्मशान घाट/नदीघाट बांधकाम (स्मशान व्यवस्थेसाठी आवश्यक तेवढे)
९) जमीन सपाटीकरण व तळफरशी १०) स्मृती उद्यान
१. (ब) ग्रामपंचायत भवन / कार्यालय याबाबत हाती घ्यावयाची कामे:- २०.००
१) नवीन ग्रामपंचायत इमारत बांधकाम व इमारती अंतर्गत सुविधा
२) जुन्या ग्रामपंचायत इमारतीची पुनर्बाधणी/विस्तार
३) ग्रामपंचायतीच्या आवारामध्ये वृक्षारोपण, परिसर सुधारणा, परीसराला कुंपन चालणे व इतर अनुषंगीक कामे
१. (क) जनसुविधा योजनेंतर्गत कामांची व्याप्ती वाढविणे:-
१) ग्रामपंचायत हद्दीत आठवडी बाजार केंद्र विकसित करणे १५.००
२) गावतलावातील गाळ काढून गावतलावांचे सुशोभीकरण करणे १५.००
३) घनकचरा व्यवस्था करणे २०.००
५) ग्रामपंचायत हद्दीमध्ये अस्तित्वात असलेल्या विहीरींवर सौरऊर्जेवर आधारित दुहेरी हातपंप बसविणे तसेच जलशुध्दीकरण आर ओ प्लांटची व्यवस्था करणे २०.००
৭.(ड) जनसुविधा योजनेंतर्गत घेण्यात येणारे रस्ते२०.००
१) गावांतर्गत रस्ते
२) एका वस्ती/पाड्यापासून दुस-या वस्ती/पाड्यापर्यंत जोड रस्ता बांधणे

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

जिल्हा वार्षिक योजनेर्गत ग्रामपंचायतीला जनसुविधासाठी अनुदान बाबत मार्गदर्शक सूचना मार्गदर्शक सूचना दि ३१/०९/२०१७ साठी येथे क्लिक करा

१) ग्रामपंचायत हद्दीत आठवडी बाजार केंद्र विकसित करणे
२) ग्रामपचायत हद्दीमध्ये अस्तित्वात असलेल्या विहीरींवर सौरऊर्जेवर आधारित दुहेर्र हातपंप बसविणे तसेच जलशुद्धीकरण आर ओ प्लांटची व्यवस्था करणे
३) गावतलावातील गाळ काढून गावतलावांचे सुशोभीकरण करणे
४) घनकचरा व्यवस्था करणे
५) भूमीगत गटारे बांधणे
२. सदर योजनेचा लाभ किमान १०० लोकसंख्या असलेल्या वाड्या व पाड्यांना उपलब्ध करु देण्यात येत आहे.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

जनसुविधा-जिल्हा वार्षिक योजनेर्गत ग्रामपंचायतीला जनसुविधासाठी विशेष अनुदान मार्गदर्शक सूचना दि. 16 सप्टेंबर 2010 साठी येथे क्लिक करा

उपरोक्त बाबीवर विचारांती ‘ग्रामपंचायतीला जनसुविधांसाठी विशेष अनुदान’ ही जिल्हा स्तरीय योजना राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. सदर योजनेसाठी जिल्हा नियोजन समितीच्या मागणीच्या अनुषंगाने नियोजन विभागामार्फत जिल्हा योजनेतंर्गत निधी उपलब्ध करण्यात येईल. सदर योजना राबविण्याबाबत खालील प्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत.

१. योजनेतंर्गत घ्यावयाची कामे (अ) ग्रामीण भागात दहन/दफन भूमीची व्यवस्था करणे, त्या सुस्थितीत ठेवणे व त्याचे नियमन करणे यासाठी स्मशान भूमीवर हाती घ्यावयाची कामे

१) दहन/दफन भूसंपादन २) चबुत-याचे बांधकाम ३) शेडचे बांधकाम ४) पोहोच रस्ता ५) गरजेनुसार कुंपण वा भिंती घालून जागेची सुरक्षितता साधणे ६) दहन/दफन भूमीत विद्युतीकरण व आवश्यकतेनुसार विद्युतदाहीनी / सुधारीत शवदाहीनी व्यवस्था
७) पाण्याची सोय
८) स्मृती उद्यान
९) स्मशान घाट / नदीघाट बांधकाम (स्मशान व्यवस्थेसाठी आवश्यक तेवढे)
१०) जमीन सपाटीकरण व तळफरशी
(ब) ग्रामपंचायत भवन / कार्यालय याबाबत हाती घ्यावयाची कामे :-
१) नवीन ग्रामपंचायत इमारत बांधकाम व इमारती अंतर्गत सुविधा
२) जुन्या ग्रामपंचायत इमारतीची पुनर्बाधणी / विस्तार
३) ग्रामपंचायतीच्या आवारामध्ये वृक्षारोपण, परिसर सुधारणा, परीसराला कुंपन घालणे व इतर अनुषंगीक कामे.
२. अटी व शर्ती
२.(अ) दहन/दफन भुमीवरील कामांबाबत :-
१) ज्या गावामध्ये दहन/दफन भूमीसाठी शासकीय / ग्रामपंचायतीच्या मालकीची जागा उपलब्ध नसेल तरच अशा ठिकाणी खाजगी जमीन संपादीत करण्यासाठी येणारा खर्च या योजनेच्या निधीमधून भागविता येईल.
२) सदर योजनेंतर्गत स्मशानभूमीवर दहनाकरीता आवश्यक चबुतऱ्याचे बांधकाम करण्यात यावे.
३) ज्या ठिकाणी लोखंडी शवशाखा व पत्र्याचा वापर होतो अथवा ज्या चबुत-यावर प्रेत दहन केले जाते तेथे शेड घालण्यात यावे.
४) दहन/दफन भूमीमध्ये अत्यंकर्म करण्यासाठी आलेल्यांना बसण्याची तात्पुरती सोय होण्यासाठी अनुरूप शेडची व्यवस्था करावी.
५) इंधन खर्च कमी करण्यासाठी ग्रामपंचायतीची लोकसंख्या आदी विचारात घेऊन विद्युत शवदाहिनीचा सुधारीत शवदाहिनीचा वापर स्मशानभूमीत करुन अद्यावतीकरण करता येईल.
६) दहन/दफन भूमीपर्यंत विनासायास येण्यासाठी गावातील जवळच्या रस्त्यापासून पोहचरस्ता बांधकाम करता येईल.
७) दहन/दफन भूमीसाठी आवश्यकतेनुसार कुंपण वा भिंती घालून जागेची सुरक्षितता साधता येईल.
८) ज्या ग्रामपंचायतीमधील दहन/दफनभूमी मध्ये विद्युत खांब नाही त्याठिकाणी खांब उभारून दहन/दफन भूमीतील विद्युत खांबावर ग्रामपंचायतीमार्फत सीएफएल अथवा ट्युबलाईट लावता येतील. याशिवाय गावामध्ये दहन/दफन भूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पथदिव्याची व्यवस्था करता येईल.
९) दहन/दफन भूमीत येणाऱ्या लोकांना अंत्य विधीसाठी पाण्याची सोय उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, यासाठी स्मशान भूमीपर्यंत नळ घेवून पाण्याचा हौद बांधण्यात यावा.
१०) दहन/दफन भुमीवर गरजेनुसार बाग तयार करून, दाट छायेंचे वृक्षारोपण करावे. ११) धार्मिक रीती रिवाजानुसार मृतदेहांवर जे संस्कार आवश्यक आहेत त्यासाठी आवश्यक बांधकामे / सुविधा हाती घेता येतील.
२.(ब) ग्रामपंचायत भवन / कार्यालय बांधकामाबाबत :-
१) स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ग्रामपंचायतींचे कामकाज सुयोग्यरित्या व एकत्रितपणे चालविण्यासाठी अद्यावत ग्रामपंचायत भवन असणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने ज्या गावामध्ये ग्रामपंचायत इमारत नाही अशा ठिकाणी सदर योजनेतंर्गत नवीन ग्रामपंचायत इमारत बांधकाम प्राधान्याने हाती घेण्यात यावे.
२) याशिवाय आवश्यकतेनुसार जुन्या पडझड झालेल्या ग्रामपंचायत इमारतीची पुनर्बाधणी अथवा विस्तार करणे, ग्रामपंचायतीच्या सभोवताली कुंपण घालणे, आवारामध्ये वृक्षारोपण करणे, परिसर सुधारणा करणे, इत्यादी अनुषंगीक कामे सदर योजनेतंर्गत घेता येतील.
३) केंद्र पुरस्कृत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत राजीव गांधी भारत निर्माण ग्राम सुविधा केंद्र या योजनेमधून हाती घेतलेले ग्रामपंचायत इमारत बांधकाम पूर्ण करण्यास आवश्यक व त्या योजनेच्या निकषात न बसणारा कुशल कामे व साहित्य यावरील उर्वरीत खर्च भागविण्यासाठी सदर योजनेमधून निधी वापरता येईल.
३. निधीची उपलब्धता
१) सदर योजना जिल्हास्तरीय योजना असून, जिल्हा नियोजन समिती मार्फत जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत निधीची तरतूद करण्यात येईल.
२) सदर योजनेमध्ये निधी मंजूर करताना गावाची लोकसंख्या विचारात घेण्यात यावी, तसेच एका गावाकरिता (अ) व (ब) या योजनेसाठी प्रत्येकी जास्तीत जास्त रूपये १० लाख मंजूर करता येतील. ३) शासनाने मंजूर केलेला निधी योजनेतंर्गत सुविधा पुर्ण करण्यास कमी पडल्यास ग्रामपंचायतींनी स्वनिधीतून त्याची तरतूद करावी. तसेच सदरची कामे संबधित आर्थिक वर्षात पुर्ण करण्यात यावीत.
४. कामांना मंजूरी
१) सदर योजनेतंर्गत हाती घ्यावयाच्या कामांचा समावेश गाव नियोजन आराखडयात असणे आवश्यक आहे.
२) या योजनेतंर्गत प्रत्येक कामास प्रशासकीय मान्यता ग्रामसभेच्या सहमतीनंतर ग्रामपंचायत देईल.
३) योजनेतंर्गत कामास तांत्रिक मान्यता मात्र शासन निर्णय क्रमांक झेडपीए २००८/प्र.क्र. ४४४/वित्त-९. दिनांक १५ जुलै, २००८ अनुसार सक्षम अधिकाऱ्यामार्फत देण्यात यावी.
४) सदर योजनेतंर्गत कामांची निवड जिल्हा नियोजन समितीमार्फत करण्यात येईल.
५) योजनेचे आढावा व सनियंत्रण अधिकारी हे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद राहतील.

५. देखभाल व दुरूस्ती
सदर योजनेतंर्गत निर्माण करण्यात आलेल्या सुविधांची देखभाल व दुरूस्ती करण्याची जबाबदारी संबधित ग्रामपंचायतीची राहील.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

45829

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare.