जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम ३०-१२-२०१२
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत रेफरल ट्रान्सपोर्ट हा कार्यक्रम जिल्हा स्तरावर जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत राबविला जातो या कार्यक्रमातंर्गत पुढीलप्रमाणे विनामुल्य संदर्भ बाइतुक सेवा पुरविण्यात येते.
१) प्रसुतीपुर्वे वेदनेच्या काळात व प्रसुतीसाठी निवासस्थानापासुन ‘रुग्णालयात जाण्यासाठी व प्रसुती झाल्यानंतर मातेला नवजात बालकासह निवासस्थानी परत पोहोचविण्यासाठी.
२) ० ते ३० दिवस या वयोगटातील आजारी बालकास व त्याच्या मातेस निवासस्थांतुन रुग्णालयात व रुग्णालयातून निवासस्थानी परत पाहोचविण्यासाठी..
३) रेफरल ट्रान्सपोर्ट या योजनेअंतर्गत मोफत वाहन सेवा पुरविण्याची योजना कार्यान्वीत करण्यात आलेली आहे. या योजनेतंर्गत प्रत्येक जिल्हयातील जिल्हा रुग्णालयात २४ तास कार्यरत असणारा सपंर्क कक्ष तयार करण्यात आला असुन या संपर्क कक्षात १०२ हा टोल फ्री क्र. बसविण्यात आलेलो आहे. याठिकाणी पाळी पध्वतीवरः ५ प्रशिक्षित कर्मचारी नेमण्यात आली आहेत, ना रिकांनी १०२ मा टोल फ्री क्रमांकावर दुरध्वनी करुन निवासी पत्तों व रुग्णाबद्दलची माहिती दिल्यानंतर रुग्णांच्या निवासस्थानी मोफत रुग्णवाहिका पाठविण्यात येते व प्रसुतीसाठी जाणाऱ्या मातेलाठी किंवी बालकासाठी विनामोबदला सरावाहीका सेवा दिली जाते. त्याचप्रमाणे रुग्ण परत जात वळी उपरोक्त उल्लेख केल्याप्रमाणे परतीची वाहतुक व्यवस्था देखील केली जाते. सदर योजना कार्यान्वीत करण्यासाजी उपलका शासकिय रुग्णवाहीका वापरल्या जातातअधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम १९-०४-२०१२
ज्या जिल्हयांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहेत त्या जिल्हयांमध्ये जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम हा यशस्वीपणे राबविण्यासाठी सदर कार्यक्रमाची जबाबदारी ही जिल्हा शल्य चिकित्सक यांनी बघावी.
जिल्हयास पुरविण्यात आलेल्या संदर्भसेवा (Referral Transport) निधीतुन सदर कार्यक्रमासाठी रुग्णांची संख्या विचारात घेऊन मोफत रुग्णवाहिका (वाहतूक संदर्भ सेवा) जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यामार्फत उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
ग्रामीण भागातील रुग्ण संबंधीत भागाच्या आरोस्य संस्थेने शासकीय रुग्णालयात आणून सोडावेत. शहरातील रुग्ण आणणेची जबाबदारी जिल्हा शल्य चिकित्सक यांची राहील,
वैद्यकिय महाविद्यालय रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर जिल्हा शल्य चिकित्सक यांनी रुग्णाच्या परतीच्या प्रवासासाठी मोफत वाहन सेवा उपलब्ध करून द्यावी.अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम २१-०१-२०१२
१) प्रसुतीपुर्व ‘वेदनेच्या काळात व प्रसुतीसाठी निवासस्थानापासुन रुग्णालयातं जाण्यासाठी व प्रसुती झाल्यानंतर मातेला नवजात बालकासह निवासस्थानी परत पोहोचविण्यासाठी.
२) ० ते ३० दिवस या वयोगटातील आाजारी बालकास व त्याच्या मातेस निवासस्थातुन रुग्णालयात व रुग्णालयातून निवासस्थानी परत पोहोचविण्यासाठी.
३) रेफरल ट्रान्सपोर्ट या योजनेथतंर्गत मोफत वाहन सेवा पुरविण्याची योजना कार्यान्वीत करण्यात आलेली आहे. या योजनेतंर्गत प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयात २४ तास कार्यरत असणारा संपर्क कक्ष तयार करण्यात आला असुन या संपर्क कक्षात १०२ हा टोल फ्री क्र. बसविण्यात आलेला आहे. या ठिकाणी पाळी पध्दतीवर ५ प्रशिक्षित कर्मचारी नेमण्यात आली आहेत. नागरिकांनी १०२ या टोल फ्री क्रमांकावर दुरध्वनी करुन निवासी पत्ता व रुग्णाबदद्लची माहिती दिल्यानंतर रुग्णांच्या
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम 5-1-2012
जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम ७ ऑक्टोबर २०११ पासून राज्यात कार्यान्वीत करण्यात आला आहे. यामध्ये प्रसुतीसाठी मातेला आणि ३० दिवसापर्यन्तच्या आजारी नवजात अर्भकास आरोग्य संस्थेमध्ये दाखल करीत असतांना, घरापासून शासकिय आरोग्य संस्थेत, आरोग्य संस्वेपासून दुस-या आरोग्य संस्थेत संदर्भ सेवेसाठी तसेच, उपचारानंतर आरोग्य संस्थेपासून घरापर्यन्त सोडण्यापर्यन्त मोफत आरोग्य सेवा व मोफत वाहन सुविधा पुरविण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.
संदर्भ सेवेसाठी एका आरोग्य संस्थेतुन दुस-या आरोग्य संस्थेत रुग्णास वाहनातुन सोडण्यात येते. या वाहनाच्या वाहन चालकाने संबंधीत आरोग्य संस्थेच्या संस्था प्रमुखांना भेटल्याशिवाय वाहन परत नेवू नये. त्यामुळे त्यावेळी संबंधीत आरोग्य संस्थेमधून डिस्चार्ज देण्यात आलेल्या आपल्या मूळ आरोग्य संस्थेअंतर्गत गावामधील रुग्ण असल्यास अथवा मूळ आरोग्य संस्थेच्या वाटेवरील गावांमध्ये सोडावयाचा रुग्ण असल्यास अशा लाभार्थीना त्याच वाहनातून परतीच्या प्रवासाचेवेळी घरापर्यन्त सोडण्यात यावे. यामुळे कांही ठिकाणी वेगळया वाहनाची आवश्यकता भासणार नाही.
आपणांस सूचित करण्यात येते की, आपल्या अधिनस्त सर्व आरोग्य संस्थांना उपरोक्त सूचना तात्काळ देण्यात याव्यात, व केलेल्या कार्यवाहीबाबत या कार्यालयास अवगत करावे.अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम 13-12-2011
राज्यामध्ये दिनांक ७ ऑक्टोंबर, २०११ पासून जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत प्रसुतीसाठीच्या मातेला व ३० दिवसापर्यतच्या आजारी असलेल्या नवजात अर्भकास मोफत उपचार, मोफत आहार, मोफत रक्त पुरवठा, मोफत प्रसुती व आवश्यकतर सिझेरियन सेक्शन या सुविधा देणे आवश्यक आहे.
तथापि अद्यापही लाभार्थी पर्यत या कार्यक्रमाबाबतची माहिती पोहोचलेली नाही असे आढळून आले आहे. यासाठी जिल्हा रुग्णालय/स्त्रि रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय/उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्रसुतीपुर्व तपासणीसाठी येणा-या लाभार्थीना व त्यांच्या नातेवाईंकाना तसेच रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल झालेल्या मातांना त्या-त्या संस्थेतील /वार्डमधील अधिपरिचारिका/आरोग्य सेविका /आरोग्य सहाय्यिका यांनी व्यक्तिशः माहिती दयावी. मोफत वाहतुक व्यवस्थेसंबंधी माहिती दयावी व जिल्ह्याचा टोल फ्री, दुरध्वनी क्रमांकाबाबत माहिती दयावी.
प्रस्तुत विषयी जिल्हा शल्य चिकित्सक/जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी त्यांच्या अधिनस्त प्रत्येक आरोग्य संस्थेत कार्यवाही होईल यासाठी सूचना दयाव्यात. तसेच कार्यक्षेत्रातील भेटीमध्ये पर्यवेक्षिय अधिकारी कर्मचारी यांच्यामार्फत पडताळणी करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास पाठविण्यात यावा.
जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम 3110-2011
राज्यात सर्व जिल्हयांमध्ये जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम दि. ७ ऑक्टोबर २०११ पासून राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत राज्यातील माता मृत्यू आणि अर्भक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक जिल्हयांमध्ये गरोदर मातेस व ३० दिवसांपर्यंतच्या अर्भकास विनामूल्य सेवा पुरविण्यात येत आहे. ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी तसेच जनतेस विनामुल्य संदर्भ सेवा मिळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कॉल सेंटर स्थापन करण्यात आलेले आहेत. या कॉलसेंटरसाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, मुंबई यांनी भारत संचार निगम लिमिटेड यांचेकडे १०२ हा टोल फ्री नंबरची मागणी केलेली होती. जिल्हयांमधील कॉल सेंटरचा आढावा घेतला असता असे आढळून आले आहे की, काही जिल्ह्यांमध्ये अद्यापपर्यंत हा टोल नंबर कार्यान्वित झालेला नाही.
तरी ज्या जिल्हयांमध्ये १०२ हा टोल फ्री नंबर कार्यान्वित झालेला नाही, त्या जिल्हयांनी टोल फ नंबरसाठी भारत संचार निगम लिमिटेड यांचेकडे पाठपुरावा करुन टोल फ्री नंबर त्वरीत प्राप्त करुन घ्यावा टोल नं. १०२ प्राप्त झाल्यानंतर या कार्यालयास अवगत करण्यात यावे.अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….