कोविड १९-या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होवून अनाथ झालेल्या बालकांना व कुटूंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होवून एकल/विधवा झालेल्या महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रांची पुर्तता करुन त्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन आपल्या दारी” या संकल्पनेवर आधारित ” मिशन वात्सल्य” योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात येत आहे. २. कोविड-१९ या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होवून अनाथ झालेल्या बालकांना व कुटूंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होवून एकल/विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ उपलब्ध व्हावा, यासाठी राबविण्यात येणाऱ्या “मिशन वात्सल्य” या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी खालीलप्रमाणे तालुकास्तरीय समन्वय समिती गठीत
१. संपूर्ण तालुक्यात कोविड-१९ या आजाराने दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ झालेली बालके व कर्त्या पुरुषाचे निधन होऊन एकल / अनाथ झालेल्या महिलांबाबतची माहिती गाव पातळीवर गठित केलेल्या पथकाकडून प्राप्त करुन घेवून अशा महिला/ बालकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे. २. गाव पातळीवरील पथकाव्दारे प्राप्त प्रस्तावांपैकी तालुकास्तरावर मंजूरीचे अधिकार असलेल्या प्रस्तावांना संबंधीत विभाग/कार्यालयाकडून मान्यता मिळवून देणे. ३. ज्या योजनांचे मंजूरीबाबतचे अधिकार जिल्हास्तरावर आहेत असे प्रस्ताव जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांना मंजुरीसाठी पाठविणे व याबाबत सातत्याने पाठपुरावा घेणे. ४. कोरोना संक्रमणामुळे अनाथ झालेली बालके व एकल / विधवा झालेल्या महिला यांच्याबाबतची माहिती तालुकास्तरीय समन्वय समितीस उपलब्ध करण्याची जबाबदारी समितीचे सदस्य सचिव या नात्याने संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची राहिल. ५. तालुकास्तरीय समितीची बैठक दर महिन्याच्या प्रत्येक आठवड्यात आयोजित करणे तसेच सदर बैठकीत झालेल्या कार्यवाहीचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठित कृतीदलास सादर करण्याची जबाबदारी समितीचे अध्यक्ष या नात्याने तहसिलदार यांची राहिल. ६. तालुकास्तरीय समितीने केलेल्या कार्यवाहीचा आढावा जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखालील गठित कृतीदलाच्या बैठकीमध्ये घेण्यात येईल. “मिशन वात्सल्य” या योजनेंतर्गत एकल/विधवा महिला आणि अनाथ बालके यांना शासनाच्या विविध गंजा लाभ उपलब्ध करुन देण्याची जबाबत
सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.
सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.
अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.