राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव हा "राज्य महोत्सव" म्हणून साजरा करण्याबाबतचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या अनुषंगाने राज्यातील गणेशोत्सवानिमित्त अधिकाधिक व्यक्ती, संस्था आणि विविध समाजघटकांना सामाजिक सलोख्यासाठी एकत्रित आणणे, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर साजऱ्या होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवास प्रोत्साहन देणे, विविध सांस्कृतिक विषयांचे जतन व संवर्धन करणारे उपक्रम उदा. विविध स्पर्धा, व्याख्यानमाला इ. आयोजित करणे, महाराष्ट्रात शिकणाऱ्या परदेशातील तसेच अन्य राज्यांतील विद्यार्थ्यांना या राज्य उत्सवात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे इ. उपक्रमांसह, गणेशोत्सव हा 'राज्य महोत्सव' म्हणून साजरा करण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.


५. उपरोक्त परिच्छेदामध्ये दर्शविण्यात आलेल्या कार्यक्रमांच्या/उपक्रमांच्या संदर्भात आवश्यक असलेला खर्च हा संबधित कार्यालयांनी त्यांना सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात उपलब्ध असलेल्या निधीतून भागवावा..
६. सर्व जिल्हाधिकारी यांनी गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा व्हावा यासाठी सदर शासन निर्णयात नमूद करण्यात आलेल्या कार्यक्रम/उपक्रमांच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करावी.
संगणक संकेतांक क्रमांक २०२५०८१४१७२९०९३६२३ अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….