72
शासकीय सेवेतील अपंग कर्मचाऱ्याची बदली त्याच्या राहत्या ठिकाणाजवळ
शासकीय सेवेतील अपंग कामचाऱ्याची बदली त्याच्या राहत्या ठिकाणाजवळ करण्याबाबत साप्रवि शापरिपत्रक क्र अपंग-१००४/प्रक्र १८/०४/१६-अ दि १५/१२/२००४ अधिक माहिती साठी व download साठी येथे click करा.
शासकीय सेवेतील अपंग कर्मचाऱ्यांच्या बदल्या सहानुभूतीचा दृष्टीकोन ठेऊन त्यांच्या राहत्या ठिकाणाजव करण्याबाबत संदर्भाधीन क्र.१ च्या परिपत्रकान्वये सूचना देण्यात आल्या होत्या. तथापि या सूचनांची व्यवस्थित अंमलबजावणी होत नाही असे निदर्शनास आल्यामुळे संदर्भाधीन क्र.२ च्या परिपत्रकान्वये, मंत्रालयीन विभाग व त्यांच्या नियंत्रणाखालील विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख यांना पुन्हां सूचना देण्यात आल्या होत्या की, शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन करण्यासाठी शासनाने दि. १६ जानेवारी २००४ रोजी प्रख्यापित केलेल्या अध्यादेशास अधीन राहून शासकीय सेवेतील अपंग कर्मचाऱ्यांच्या बदल्या प्रशासकीय सोयीनुसार शंक्य असल्यास त्यांच्या राहत्या ठिकाणाजवळ कराव्यात.
आता या अनुषंगाने सुधारित सुचना देण्यात येत आहेत की, शासकीय सेवेतील अपंग कर्मचाऱ्यांच्या बदल्या, शासनाने दि.१६.१.२००४ रोजी तसेच दिनांक २ जुलै २००४ रोजी प्रख्यापित केलेले अध्यादेश / बदल्यांचे नियम, यातील तरतुदीस बाधा येणार नाही या अटीचे अधीन राहून त्यांच्या राहत्या ठिकाणाजवळील कार्यालयात पदांची उपलब्धता आणि प्रशासकीय सोय लक्षात घेवून करता येतील.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
शासकीय सेवेतील अपंग कामचाऱ्याची बदली त्याच्या राहत्या ठिकाणाजवळ करण्याबाबत साप्रवि शापरिपत्रक क्र अपंग-१००४/प्रक्र १८/०४/१६-अ दि १५/०४/२००४ अधिक माहिती साठी व download साठी येथे click करा.
सन परिपत्रक :-
शासकीय सेवेतील अपंग कर्मचाऱ्यांच्या बदल्या सहानुभूतीचा दृष्टीकोन ठेऊन त्यांच्या राहत्या ठिकाणाजवळ रण्याबाबत संदर्भाधीन परिपत्रकान्वये सूचना देण्यात आल्या होत्या. तथापि या सूचनांची व्यवस्थित अंमलबजावणी होत ही असे निदर्शनास आल्यामुळे या परिपत्रकान्वये मंत्रालयीन विभाग व त्यांच्या नियंत्राणाखालील विभाग प्रमुख / कार्यालय मुख यांना पुन्हा सूचना देण्यात येत आहेत की, शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन करण्यासाठी शासनाने दिनांक जानेवारी २००४ रोजी प्रख्यापित केलेल्या अध्यादेशास अधीन राहून शासकीय सेवेतील अपंग कर्मचाऱ्यांच्या बदल्या शासकीय सोयीनुसार शक्य असल्यास त्यांच्या राहत्या ठिकाणाजवळ कराव्यात.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
महाराष्ट्र शासकीय बदल्याचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००३,साप्रवि शा परिपत्रक क्र संकीर्ण-१००३/प्रक्र २४४/०३/१९-अ दि २० /१/२००४ अधिक माहिती साठी व download साठी येथे click करा.
You Might Be Interested In