Saturday, August 29, 2026
Saturday, August 29, 2026
Home » अधिसंख्य पद

अधिसंख्य पद

0 comment 6.8K views

अधिसंख्य पदावरील नियुक्त्यांना मुदतवाढ देणेबाबत.
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांक बीसीसी ११२३/प्र.क्र.२९ए/१६-ब मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई- ४०००३२. दिनांक : १८ सप्टेंबर, २०२५

अनुसूचित जमाती जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे अवैध ठरल्यामुळे अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना सेवा विषयक / सेवा निवृत्ती लाभ मंजूर करण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दैनांक ०४-१०-२०२४

शासन निर्णय दि.२१.१२.२०१९ अनुसार अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना सेवा विषयक (पदोन्नती व अनुकंपा धोरण वगळून) व सेवा निवृत्ती विषयक लाभ संदर्भाधीन क्र.२ येथील दि.१४.१२.२०२२ च्या शासन निर्णयान्वये अनुज्ञेय करण्यात आले असून या संदर्भात पुढीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहेत.
१) दि.२१.१२.२०१९ च्या शासन निर्णयानुसार अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांचा प्रत्येक ११ महिन्याच्या सेवेनंतरचा १ दिवसाचा तांत्रिक खंड सर्व सेवा विषयक (पदोन्नती व अनुकंपा धोरण वगळून) व सेवा निवृत्ती विषयक लाभांसाठी क्षमापित करण्यात येत आहे.
२) दि.२१.१२.२०१९ च्या शासन निर्णयापूर्वी सेवामुक्त केलेल्या ज्या अधिकारी/कर्मचाऱ्यांची अधिसंख्य पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे, अशा अधिकारी/कर्मचाऱ्यांचा सेवामुक्त केल्याच्या दिनांकापासून अधिसंख्य पदावर पुनर्नियुक्तीपर्यंतचा कालावधी (खंड), महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन) नियम, १९८२ अनुसार केवळ निवृत्तीविषयक लाभ मिळणेसाठी क्षमापित करण्यात येत आहे. तथापि, अशा अधिकारी/कर्मचाऱ्यांचा सेवा मुक्त केल्याच्या दिनांकापासूनचा अधिसंख्य पदावर नियुक्ती करेपर्यंतच्या कालावधीची गणना कोणत्याही सेवा विषयक व सेवा निवृत्ती विषयक लाभांसाठी अर्हताकारी सेवा म्हणून ग्राह्य धरण्यात येऊ नये
३) अधिसंख्य पदावरील अधिकारी / कर्मचारी पदोन्नतीस पात्र नसल्याने त्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ अनुज्ञेय होणार नाही.
४) दि.२१.१२.२०१९ च्या शासन निर्णयानंतर अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे शासन सेवेत नियुक्त झालेल्या व संबंधित जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम, २००० च्या कलम १० व ११ अनुसार कार्यवाही करण्यात यावी.
२. संदर्भाधीन क्र.३ येथील दि.७.५.२०२४ च्या परिपत्रकास संदर्भ क्र.४ येथील दि.१५.५.२०२४ च्या आदेशान्वये स्थगिती देण्यात आलेली आहे. सदर दि.७.५.२०२४ चे परिपत्रक रद्द करण्यात येत आहे.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

अनुसूचित जमातीचे जातीचे दावे अवैध ठरलेल्या अधिकारी/ कर्मचाऱ्याच्या अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या सेवे संबधी मार्गदर्शक सूचना देणेबाबतचे दि 07-05-2024 परिपत्रकास स्थगीतीं देण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दैनांक १५-०५-२०२४

दि.०७.०५.२०२४ रोजीचे शासन परिपत्रक याद्वारे स्थगित करण्यात येत आहे. तथापि, संदर्भाधीन क्र.१ येथील दि. १४.१२.२०२२ च्या शासन निर्णयातील सर्व तरतुदी कायम राहतील.
अनुसूचित जमातीचे जातीचे दावे अवैध ठरलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या सेवेसंबंधी मार्गदर्शक सूचना देणेबाबत.

अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेल्या महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी वर्गणीदारास सेवानिवृत्त / मृत्यूनंतर भविष्य निर्वाह निधी खात्यातील अंतिम प्रदान नियमित शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच करणेबाबत .. महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग.मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ०३२. क्रमांक :संकीर्ण-२०२३/प्र.क्र.२०३/२३/आ(वर्ग-२), दिनांक : २२ फेब्रुवारी, २०२४

अधिसंख्यपदावरील वार्षिक वेतनवाढ_ महाराष्ट्र शासन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, दुसरा मजला, मुख्य इमारत, हुतात्मा राजगुरु चौक,मंत्रालय, मुंबई-४०० ०३२. क्रमांक: संकीर्ण २०२३/प्र.क्र.५०५/व्यशि-१ दिनांक : १५ जानेवारी, २०२४

अनुसूचित जमाती प्रवर्गातील नियुक्त झालेल्या तथापि जात वैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेल्या जलसंपदा विभागातील अधिकारी यांची सेवा अधिसंख्य पदावर वर्ग करण्याबाबत चे आदेश रद्द जलसंपदा विभाग शासन निर्णय दिनांक 10-01-2024

मा. उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद यांच्या दिनांक ०४.०५.२०२१ च्या आदेशाविरोधात शासनाने मा. सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुज्ञा याचिका क्र.००२५३०/२०२२ दाखल केली असून, सदर विशेष अनुज्ञा याचिका सद्यःस्थितीत न्यायप्रविष्ठ आहे. यास्तव, सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या मान्यतेस अनुसरुन मा. सर्वोच्च न्यायालयातील विशेष अनुज्ञा याचिका क्र.००२५३०/२०२२ मधील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून श्री. रविकुमार गजानन पराते, अधीक्षक अभियंता (स्थापत्य) यांच्या सेवा अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेले दिनांक १४.१०.२०२० चे आदेश याद्वारे रद्द करण्यात येत आहेत.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे/ अवैध ठरल्यामुळे अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी/ कर्मचान्यांना वेतवाढ व त्या अनुषंगाने देय फरकाबाबत. क्र .: ईएसटी-२०२३/प्र.क्र.११२/प्रशासन-१ सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई -४०० ०३२, दिनांक २६ फेब्रुवारी, २०२४.

अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या परंतु अधिसंख्य न केलेल्या कर्मचाऱ्यांना/वारसांना सेवा निवृत्ती/निवृत्तीवेतन/ कुटूंब निवृत्तीवेतन वेतनाचे लाभ देणे बाबत. क्र. संकीर्ण-२०२३/प्र.क्र.२८५/आस्था-७ दिनांक :- ११ ऑगस्ट, २०२३

अधिसंख्य पदावरील कर्मचा-यांना अदा करावयाच्या सेवाविषयक लाभाबाबत. जा.क्र. संलेको/कोषा/सलेअ-१/अधिसंख्य पदे/२०२३/214 दिनांक : 27 JUN 2023

अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे/अवैध ठरल्यामुळे अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना सेवा विषयक / सेवा निवृत्ती विषयक लाभ मंजूर करणेबाबत.
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक : बीसीसी २०१९/प्र.क्र.५८१ ए/१६-ब हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई- ४०००३२. दिनांक : १४ डिसेंबर, २०२२.

धीसंख्य पदावर सेवा वर्ग केलेले कर्मचारी हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना सेवानिवृत्तीवेतन देण्याबाबत. महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,मंत्रालय (विस्तार), दालन क्र.२६१-अ, मुंबई ४०० ०३२.
क्रमांक: सुकीर्ण-२०२०/प्र. क्र.३४/रो. आ.१ दिनांक:२६ ऑक्टोबर, २०२१.


अधिसंख्य पदावरील नियुक्त्यांना मुदतवाढ देताना एक दिवसाच्या तांत्रिक खंडाबाबत. क्र.संकिर्ण-२०१९/प्र.क्र.१६३/आस्था-८ बांधकाम भवन, २५, मर्झवान पथ,फोर्ट, मुंबई-४००००१ दिनांक :- २६/११/२०२१

अधिसंख्य पदावर वर्ग करण्पात आलेले अधिकारी/कर्मवारी योना सेवानिदृत्त/भृत्यूनंतर अंतिम भविष्य निर्वाह निधी रक्कम व गट बिना योजना रक्काम देष्यावाबत. दिनांक : ५१ जानेवारी, २०२१.

विषय-अधिसंख्य पदाधर वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी/कर्मचा-यांच्या सेवा विषयक बाबीबाबत. महाराष्र शासत वित्त विभाग, बादाम कामा मार्गे हुलात्या रागुत धौका, मंत्रालय,मुंबई — ४०० ०३२ दि.२२/१०/२०२०,

अधिसंख्य पदावरील अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतना बाबत वित्त विभाग शासन निर्णय दिनांक १६-०९-२०२०

शासन निर्णय सा.प्र.वि. क्रमांक बीसीसी २०१९/प्र.क्र.५८१/१६-ब, दि.१५.०६.२०२० मधील परिच्छेद क्रमांक ४ तसेच परिच्छेद क्रमांक ५ कडे वेधण्यात येत आहे. (सोबत, सदर शासन निर्णयाची प्रत सुलभ संदर्भासाठी जोडली आहे)
२. सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक ४ व ५ मध्ये नमूद केल्यानुसार, अधिसंख्य पदावर सेवा वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना वार्षिक वेतनवाढ व अन्य सेवाविषयक लाभ अनुज्ञेय करावेत किंवा कसे ? याबाबत शासनाने गठीत केलेल्या अभ्यासगटाच्या शिफारशी, शासनास प्राप्त होणे अपेक्षित आहे. सदर शिफारशी प्राप्त होण्यास व त्या अनुषंगाने सुधारीत शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाकडून निर्गमित होण्यास, किती कालावधी लागेल, हे ठामपणे सांगता येऊ शकत नाही. त्यामुळे सदर प्रकरणी साप्रविकडून पुढील आदेश प्राप्त होई पर्यंत अधिसंख्य पदावर सेवा वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना दि.०१ जुलै. २०२० रोजीची वार्षिक वेतनवाढ व त्यानंतर पुढील कालावधीमध्ये येणाऱ्या वार्षिक वेतनवाढी अनुज्ञेय करता येणार नाहीत.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी………

अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी/कर्मचारी यांच्या सेवा विषयक बाबींबाबत क्र. संलेको २०२०/प्रशा.कोषा/कार्या.८/अधिसंख्य पदनिर्मिती/६३२ महाराष्ट्र शासन वित्त विभाग संचालनालय, लेखा व कोषागारे ठाकरसी हाऊस,३ रा मजला, मुंबई पोर्ट ट्रस्ट, जे. एन.हेरेडिया मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई ४०० ००१ दि.०२.०९.२०२०

सामान्य प्रशासन विभागाच्या दि. १२.०६.२०२० व समक्रमांकित दि. १५.०६.२०२० नुसार अधिसंख्य पदावर नेमणूक दिल्यानंतर त्यांना नियमित कार्यरत असणा-या अधिकारी व कर्मचा-यांप्रमाणे आश्वासित प्रगती योजना, पदोन्नती, वार्षिक वेतनवाढ, सेवानिवृत्तीवेतन, कुटुंब सेवानिवृत्ती वेतन, अनुकंपा तत्वावरील नियुक्ती यासारखे व इतर सेवाविषयक लाभ देण्यात यावेत किंवा कसे ? याबाबत सविस्तर अभ्यास करून शासनास शिफारशी करण्यासाठी
मा.मंत्री (अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र अभ्यास गटाची स्थापना करण्यात आलेली असुन सदर अभ्यास गटाने आपल्या शिफारशी तीन महिन्यांत शासनास सादर करण्याबाबत नमूद केलेले आहे. त्यामुळे शासनाकडुन याबाबतचे अंतिम निर्णय प्राप्त
झाल्यानंतर अधिसंख्य पदावर नियुक्ती देण्यात आलेल्या अधिकारी/कर्मचारी यांना सेवाविषयक/सेवानिवृत्तीविषयक लाभ प्रदानाबाबतची योग्य ती कार्यवाही करण्यांत यावी.

माननीय सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपिल क्र.८९२८/२०१५ व इतर याचिका यामध्ये दिनांक ०६ जुलै, २०१७ रोजी दिलेल्या निर्णयाची राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक: बीसीसी २०१८/प्र.क्र.३०८/१६-ब मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई -४०० ०३२. दिनांक : २१ डिसेंबर, २०१९.

१. अधिपत्याखालील शासकीय/निमशासकीय कार्यालयातील अनुसूचित जमातीच्या खालील अधिकारी व कर्मचा-यांची संवर्गनिहाय संख्या निश्चित करून त्यांच्या सेवा दि. ३१.१२.२०१९ पर्यंत अधिसंख्य पदांवर वर्ग कराव्यात :-
अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेली पदे रिक्त करणे-सर्व प्रशासकीय विभागांनी खुद्द व त्यांच्या
(अ) अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरलेले अधिकारी/कर्मचारी,
(ब) अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर विशेष मागासप्रवर्गाचे अथवा अन्य कोणत्याही मागासवर्गाचे जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेले अधिकारी/ कर्मचारी,
(क) अनुसूचित जमातीचा दावा सोडून दिलेले अधिकारी/ कर्मचारी,
(ड) नियुक्तीनंतर जातप्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी विहित मुदतीत जात पडताळणी समितीकडे प्रस्ताव सादर न केलेले अनुसूचित जमातीचे अधिकारी व कर्मचारी.
(इ) ज्या अधिकारी व कर्मचान्यांनी त्यांचे अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्याच्या जात पडताळणी समितीच्या निर्णयाच्या विरोधात माननीय न्यायालयात याचिका दाखल केल्या असतील मात्र त्यांच्या प्रकरणी माननीय उच्च न्यायालयाने किंवा माननीय सर्वोच्च न्यायालयाने जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्याच्या समितीच्या निर्णयास कोणतीही स्थगिती दिली नसेल असे अधिकारी व कर्मचारी.

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

519725

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions