तांडा वस्ती सुधार योजना 30-01-2018 वसंतराव नाईक तांडा/वस्ती सुधार योजनेमध्ये दलित वस्ती सुधारणा योजनेच्या धर्तीवर तांडा/वस्ती सुधार योजना सुधारित करण्याबाबत.
विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग शासन निर्णय क्र. तांसुयो २०१७/प्रक्र-८४/विजाभज-१,दिनांक- ३० जानेवारी, २०१८
महाराष्ट्र राज्यात भटक्या जमातीच्या अनेक जाती जमाती अजूनही भटकंती करुन स्थलांतरित स्वरुपाचे जीवन जगतात. लमाण, बंजारा, वंजारी, धनगर, पारधी अशा अनेक समूहांचे तांडे/वस्त्या असून अशा तांडयांमध्ये या जमाती अनेक वर्षांपासून रहात असल्या तरी अशा तांडे किंवा वस्त्यांना प्राथमिक सुविधा उपलब्ध होत नाहीत व त्यामध्ये आधुनिकतेकडे कल असला तरी बहुसंख्य समाज गरीबीचे जीवन जगत आहे. त्यासाठी तांडे, वाडी किंवा वस्त्या यामध्ये या समाजास स्थिर जीवन जगता यावे याकरिता सुधारणा होणे आवश्यक आहे. अनुसूचित जातीच्या वसाहतीत “दलित वस्ती सुधारणा योजना” सन १९७२ पासून राबविण्यात येत आहे व या योजनेची फलश्रुती चांगली असल्याचे मूल्यमापनात आढळून आले आहे. ही बाब विचारात घेऊन दलित वस्ती सुधार योजनेच्या धतीवर राज्यातील भटक्या समाजाच्या सुधारणेसाठी तांडा/वस्ती सुधार योजना उपरोक्त वाचा येथील 7-6-2003 च्या शासन निर्णयाद्वारे सुरु करण्यात आली आहे.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

-
532
-
278
-
625