Friday, August 14, 2026
Friday, August 14, 2026
Home » सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY)

सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY)

0 comment 897 views

सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) खरीप हंगाम, २०२६ व रब्बी हंगाम, २०२६-२७ करिता राज्यात राबविण्याबाबत.
महाराष्ट्र शासन कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग शासन निर्णय क्र. बैठक-२०२६/प्र.क्र.१२२/का.११ ए/ई-१६६७००३ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२ दिनांक : ०३ जुलै, २०२६

) योजनेची उद्दिष्टेः-
१. नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे.
२. फळपिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे.
३. शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारीत मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे.
४. कृषि क्षेत्रासाठीच्या पत पुरवठ्यात सातत्य राखणे, जेणेकरुन उत्पादनातील जोखमींपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा, पीकांचे विविधीकरण आणि कृषि क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मकतेत वाढ हे हेतू साध्य करणे.

अधिक माहिती साठी पीडीएफ download करून घ्यावी.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राज्यात सन २०२६-२७ या १ वर्षाच्या कालावधीकरिता मृग बहार व आंबिया बहाराकरिता अधिसूचित फळपिकांना लागू करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग
शासन निर्णय क्रमांक : बैठक-२०२६/प्र.क्र.१२२ (भाग-१)/का. ११ ए/ई-१६७५६५८ मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय (विस्तार), मुंबई-४०० ०३२. दिनांक : २७ जून, २०२६

१. योजनेची उद्दीष्ट्ये :-
१. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पीकांचे नुकसान झाल्यास, शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे.
२. पीकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे.
३. शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे.
४. कृषि क्षेत्रासाठीच्या पत पुरवठ्यात सातत्य राखणे, जेणेकरुन उत्पादनातील जोखमींपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा, पीकांचे विविधीकरण आणि कृषि क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मकतेत वाढ हे हेतू साध्य होण्यास मदत होईल.
अधिक माहिती साठी पीडीएफ download करून घ्यावी.

सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) खरीप हंगाम २०२५ व रब्बी हंगाम २०२५-२६ करीता राज्यात राबविणेबाबत महाराष्ट्र शासन कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग शासन निर्णय क्र. प्रपीवियो-२०२५/प्र.क्र.६६/११-अ, ई.ऑ.क्र. १०३५९५६ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ दिनांक : २४ जून, २०२५

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

500615

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions