Monday, July 14, 2025
Monday, July 14, 2025
Home » महाराष्ट्र विकास सेवा कामकाज वाटपाबाबत

महाराष्ट्र विकास सेवा कामकाज वाटपाबाबत

0 comment

महाराष्ट्र विकास सेवा गट अ व गट ब सर्वगातील पद रिक्त असल्यास सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्याबाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक २६-०५-२०२३

 
महाराष्ट्र विकास सेवा गट-अ व गट-ब संवर्गातील पद रिक्त असल्यास सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार हा इतर संवर्गातील अधिकाऱ्यांकडे सुपुर्द करीत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे.
२. महाराष्ट्र विकास सेवा गट-अ मध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (निवडश्रेणी), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी/प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उप मुख्य कार्यकारी अधिकारी व गट विकास अधिकारी या संवर्गातील अधिकाऱ्यांचा समावेश होतो. तसेच महाराष्ट्र विकास सेवा गट-ब मध्ये सहायक गट विकास अधिकारी या संवर्गातील अधिकाऱ्यांचा समावेश होतो.
३. उपरोक्त अधिकाऱ्यांकडे ग्राम विकास विभागाच्या धोरणाची अंमलबजावणी करणे, ग्राम विकास विभागातील विविध योजनांचे संनियंत्रण करणे व राबविणे तसेच शासनाने ठरवून दिलेले उद्दिष्टे प्राप्त करणे अशा विविध महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आलेल्या आहेत. शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांना अनुसरून कर्तव्ये व जबाबदाऱ्या पार पाडणे हे महाराष्ट्र विकास सेवा गट-अ व गट-ब संवर्गातील अधिकाऱ्यांचे काम आहे. त्यामुळे उपरोक्त पदांचा अतिरिक्त कार्यभार इतर संवर्गातील अधिकारी/कर्मचारी यांना देणे योग्य नाही.
४. महाराष्ट्र विकास सेवा, गट-अ व गट-ब संवर्गातील पद रिक्त असल्यास अथवा सदर अधिकारी मोठ्या कालावधीकरिता अनुपस्थित / रजेवर असल्यास, संबंधित पदाचा कार्यभार सोबत जोडलेल्या परिशिष्ट-अ प्रमाणे महाराष्ट्र विकास सेवा गट-अ व गट-ब संवर्गातील अधिकाऱ्यांकडेच सोपविण्याची जबाबदारी संबंधित विभागीय आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांची राहिल. तद्नुषंगाने संबंधित विभागीय आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी कार्यवाही करावी.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........

गटकविकास अधिकारी व सहाय्य्क गटविकास अधिकारी यांच्या कामाच्या सुधारित वाटप करणेबाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक २१/११/२०१४

सहाय्यक गट विकास अधिकारी यांच्या कामांची तीन भागांत विभागणी करण्यात येत आहे:-
१) विशिष्ट विषयांचा स्वतंत्र कार्यभार अनुसूची १ मधील ४ विषयांचा स्वतंत्र कार्यभार
सहाय्यक गट विकास अधिकारी यांना देण्यात येत असून या विषयाचे संपूर्ण आर्थिक व प्रशासकीय अधिकार सहाय्यक गट विकास अधिकारी यांना असतील. जिल्हा तालुका स्तरावर अनुसूची १ मधील विषयामध्ये बदल करण्याचे/फेरफार करण्याचे अधिकार असणार नाहीत. अपवादात्मक परिस्थितीत विषवामध्ये बदल करावयाचा असल्यास अशा बदलास त्या पंचायत समितीच्या संबंधित गट विकास अधिकारी (गट अ) यांनी शिफारस केल्यास आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची तशी खात्री झाल्यास विभागीय आयुक्तांच्या मान्यतेने अनुसूची १ मधील विषयामध्ये बदल/फेरफार करता येतील. त्यासाठी शासनाकडे मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविण्याची आवश्यकता नाही. मात्र हा बदल ज्या गट विकास अधिकारी (गट अ) यांच्या शिफारशीच्या आधारावर केलेला आहे त्या गट विकास अधिकाऱ्याच्या कालावधीपुरताच मर्यादीत असेल, म्हणजेच विभागीय आयुक्तांनी विषयाच्या फेरफारास दिलेली मान्यता त्या गट विकास अधिकाऱ्याच्या सहाय्यक गट विकास अधिकाऱ्याच्या कालावधीपुरतीच मर्यादीत असेल. अशी मान्यता नियमित बाब असणार नाही
२) सहाय्यक गट विकास अधिकाऱ्यांमार्फत विविध विषयांच्या संचिका सादर करणे अनिवार्यः अनुसूची २ मध्ये दिलेल्या विषयाच्या संचिका सहाय्यक गट विकास अधिकारी यांच्यामार्फत गट विकास अधिकाऱ्यांकडे सादर करणे बंधनकारक असेल. या अनुसूची २ मध्ये दिलेल्या विषयांमध्ये फेरफार करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना असणार नाहीत. तथापि या विषयांमध्ये काही अतिरिक्त विषयाच्या संचिकांचा समावेश करावयाचा असल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी सक्षम असतील. सहाय्यक गट विकास अधिकान्यांना भविष्यात सक्षम करण्याचा उद्देश असल्याने अनुसूची २ मधील विषयात स्थानिक पातळीवर वाढ करणे अपेक्षित आहे.
3) वरिष्ठ प्रशासकीय अधिकान्यांनी दिलेली कामे:: मुख्य कार्यकारी अधिकारी/ अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी / गट विकास अधिकारी यांना आवश्यकता वाटल्यास, वरील अनुसूर्य १ व २ व्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त काम सहाय्यक गट विकास अधिकारी यानकडे सोपवू शकतील.
सहाय्यक गट विकास अधिकारी यांचे गोपनीय अहवाल लिहिणे :-
सहाय्यक गट विकास अधिकारी (गट-ब) यांचे गोपनीय अहवाल गट विकास अधिकारी (गट-अ) यांनी लिहावेत. अनुसूची 1 मधील बहुतांश विषय हे जिल्हा स्तरावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडील असल्यामुळे सहाय्यक गट विकास अधिकारी (गट ब) यांच्या गोपनीय अहवालाचे पुनर्विलोकन करण्याचे अधिकार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना असतील. कृषि, समाज कल्याण, महिला व बाल कल्याण आणि पशुसंवर्धन विभागातील सर्व अधिका-यांचा/कर्मचाऱ्यांचा गोपनीय अहवाल सहाय्यक गट विकास अधिकारी यांनी लिहावा आणि पुनर्विलोकनासाठी संबंधित खाते प्रमुखांकडे सादर करावा.
सहाय्यक गट विकास अधिकारी यांचेकडे अतिरिक्त कार्यभार सोपविणेः-
गट विकास अधिकारी (गट-अ) ज्यावेळी रजेवर असतील किंवा सदरचे पद रिक्त असेल अशावेळी गट विकास अधिकारी (गट-अ) या पदाचा कार्यभार सहाय्यक गट विकास अधिकारी यांचेकडे सोपविणे अनिवार्य असेल. यामध्ये बदल करावायाचा असल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी ठोस कारणासह प्रस्ताव विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे मान्यतेसाठी सादर करणे बंधनकारक असेल.
महाराष्ट्र विकास सेवेतील सहाय्यक गट विकास अधिकारी हे भविष्यात पदोन्नतीने गट विकास अधिकारी, पंचायत समिती या पदाचा कार्यभार सांभाळणार असल्याने त्यांना भविष्यासाठी सक्षम करणे हा राज्य शासनाचा हेतू आहे. त्यामुळे वरील शासन निर्णयाची तंतोतंत अंमलबजावणी करण्याची जबाबदारी विभागीय स्तरावर उपआयुक्त (आस्थापना) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची राहील. वरील शासन निर्णयाची सर्व संबंधितांनी अंमलबजावणी करावी.

नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सहाय्य्क गटविकास अधिकारी गट ब या पदाची कामे ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक २४/०७/२०१३

गटकविकास अधिकारी व सहाय्य्क गटविकास अधिकारी यांच्या कामाच्या सुधारित वाटप करणेबाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक २१/११/२०१४ ह्य शासन निर्णया नुसार हा शासन निर्णय सुधारित करण्यात आलेला आहे

मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार ज्येष्ठतेनुसार सोपविणेबाबत ग्रामविकास विभाग, शासन निर्णय दिनांक 08-01-2007

विषयः-मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार ज्येष्ठतेनुसार सोपविणेबाबत.
महोदय,
वरील विषयाबाबत मला असे कळविण्याचे आदेश आहेत की, महाराष्ट्र विकास सेवा वर्ग-१ मधील अधिका-यांच्या निवडश्रेणीतील ज्येष्ठतेनुसार प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ही जिल्हा परिषदेकडील पदे भरण्यात येतात. यास्तव " मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवितांना या पुढे ज्येष्ठतेनुसार, ज्येष्ठतम अधिका-याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात यावा. तसेच अशा ज्येष्ठतम अधिका-यांविरुध्द गंभीर तक्रारी असतील अशा अपवादात्मक परिस्थितीत मुख्य कार्यकारी अधिका-यांनी कारणे नमूद करुन कनिष्ठ अधिका-यांकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात यावा,

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलेले विषय ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक ०२/०५/२०००

प्रपत्र "अ"
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे देण्यांत आलेले विषय/विभाग
अ) विभाग
१) कृषि विभाग
२) बांधकाम विभाग
३) पशुसंवर्धन विभाग
४) समाजकल्याण विभाग
५) लघुसिंचन विभाग
आस्थापना
१) सर्व विभागप्रमुखांचे गोपनीय अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी लिहितील
२) अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे सोपविण्यात आलेल्या विभागाशी संबंधित वर्ग-२ अधिका-यांचे गोपनीय अहवाल संबंधित विभागप्रमुख लिहितील व त्याचे पुनर्विलोकन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी करतील.
३) अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे गोपनीय अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी लिहितील व त्याचे पुनर्विलोकन विभागीय आयुक्त करतील.
क)आर्थिक: महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ व जिल्हा परिषद लेखा संहिता १९६८ मध्ध मुख्य कार्यकारी अधिका-यांना प्रशासकीय व आर्थिक मंजूरीचे असणारे अधिकार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिका-यांना त्यांच्या अधिपत्याखालील विभागापुरते राहतील.
ड)मुख्य कार्यकारी अधिका-यांना आक्तस्मिक खर्चाच्या ज्या मर्यादा आहेत त्याच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिका-यांना लागू राहतील.
टिप- वर नमूद करण्यांत आलेले अधिकार वगळता उर्वरित सर्व अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे राहतील.

             

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

40230

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare.