Saturday, October 24, 2026
Saturday, October 24, 2026
Home » लॉक सेल्स किंवा  Protect Worksheet-Lock Cells or Protect Worksheet

लॉक सेल्स किंवा  Protect Worksheet-Lock Cells or Protect Worksheet

0 comment 723 views

मायक्रोसॉफ्ट एक्सेलमधील सेल्स लॉक केल्यामुळे त्या शीटमधील सूत्रे बदलली जाणार नाहीत. ज्या सेलमधील एडीट करावयाच्या असतील त्या तेवढ्या बदलण्यासाठी खुल्या ठेऊ शकतो. यामुळे चुकूनही सूत्रे लिहलेली सेल सिलेक्ट होऊन त्यातील सूत्र बदलले जाणार नाही.

1. सुरुवातीस तुमचे शीट तयार करून घ्या.

2. ज्या सेलमधील किंमती वारंवार बदलावयाच्या असतील त्या सेल सिलेक्ट करा.

3. जर सेल वेगवेगळ्या क्रमाने असतील तर सेल सिलेक्ट करतानाCtrl बटणाचा वापर करा.

4.   सिलेक्ट केलेल्या सेलला राईट क्लिक करून Format cells निवडा

5.   Protection टॅब मध्ये जाऊन Locked चा चेकमार्क काढा आणि OK निवडा. 

6.   Review मेनुतून Protect Sheet निवडा.

7. Select Locked Cells चा चेकमार्क काढा.Select unlocked cells ठेवणे ला चेक मार्क कायम ठेवणे .

8. आवश्यक वाटल्यास पासवर्ड टाका. ओके करा. फाईल सेव करा. तुमचे वर्कशीट प्रोटेक्ट झाले आहे. आता तुम्ही सूत्रे लिहिलेली अथवा इतर सेल्स सिलेक्ट करू शकत नाही

You may also like

Leave a Comment