शासकीय अधिकारी/ कर्मचारी घर बांधणी अग्रीमासाठीचे प्रस्ताव नमुना
घर बांधणी अग्रीमासाठीचे प्रस्ताव. मुख्य लेखाशिर्ष 7610 – शासकिय कर्मचारी
विवरणपत्र
1 | अर्जदाराचे संपूर्ण नांव | |
2.1 | अर्ज करतेवेळी असलेले पद | |
2.2 | सध्याचे पद | |
3. | वेतन श्रेणी | |
3.1 | सध्याचे मुळ वेतन + ग्रेड पे (महागाई भत्ता व इतर भत्ते वगळून) | |
4 | जन्म दिनांक | |
4.1 | प्रथम नियुक्तीचा दिनांक | |
4.2 | नियम वयोमान निवृत्तीचा दिनांक | |
5 | सध्याच्या नियुक्तीचा संपूर्ण कार्यालयीन पत्ता | |
6 | यापूर्वी अग्रीम घेतले आहे किंवा कसे | |
7 | प्रयोजन:- (उदा.नवीन घर बांधणे, तयार घर खरेदी,भूखंड घेऊन त्यावर घर बांधणे,घर बांधण्यासाठी भूखंड घेणे, स्वत:च्या मालकीच्या राहत्या घराचे नवीन बांधकाम करुन विस्तार करणे, सध्याचे राहते घर योग्य करण्यासाठी असाधारण व विशेष स्वरुपाची दुरुस्ती करणे, जुने घर विकत घेणे व घरासाठी वित्तीय संस्थेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे इ्.) | |
8 | ” सध्याचे राहते घर योग्य करण्यासाठी असाधारण व विशेष स्वरुपाची दुरुस्ती करणे ” या प्रयोजनासाठी अग्रीम आवश्यक असल्यास नैसर्गिक आपत्ती घोषीत केल्याबाबतचे सक्षम प्राधिका-याचे प्रमाणपत्र आवश्यक | |
9 | अर्जदारास आवश्यक अग्रीम | रुपये |
10 | नियंत्रक अधिका-याची अग्रीमाबाबत शिफारस | रुपये |
11. अर्जदाराचे प्रमाणपत्र
मी, नांव,—————————————– पद ————————— याद्वारे असे प्रमाणित करतो की, उपरोक्त तालिकेत नमुद केलेली माहिती व त्यासंदर्भात सादर केलेली बांधकामाशी संबंधीत सर्व मुळ कागदपत्रे खरी व वस्तुस्थितीदर्शक आहेत यापैकी कोणताही दस्तऐवज अथवा माहिती खोटी असल्याचे भविष्यात दिसून आल्यास, संपूर्ण शिल्लक अग्रीमाची रक्कम एकरकमी, त्यावरील दंडनीय व्याजासह शासन वसूल करील आणि यासाठी मी शिस्तभंगविषयक कारवाईस पात्र ठरेन, याची मला पूर्णपणे जाणीव आहे व ते मला मान्य आहे.
दिनांक सही
स्थळ:- नांव व पदनाम
12. नियंत्रक अधिका-याचे प्रमाणपत्र:-
श्री/श्रीमती/कु. ———————————————- पद ————————– यांनी उपरोक्त तालिकेत नमूद केलेली माहिती व त्या संदर्भात सादर केलेली बांधकामाशी संबंधीत सर्व मुळ कागदपत्रे खरी व वस्तुस्थितीदर्शक आहेत याबाबत मी खात्री केली आहे. घरबांधणी अग्रीमा संबंधात शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशामधील तरतुदीनुसार शासकिय कर्मचा-याच्या घराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर त्यावर अर्जदाराचा पूर्ण मागणी हक्क पणन योग्य असेल (Good & Marketable) याविषयी माझे पूर्ण समाधान झाल्यानंतरच मी अर्जदारास (रुपये ———————————/- (रुपये अक्षरी) घर बांधणी अग्रीम मंजूर करण्याची शिफारस करीत आहे.
दिनांक सही
स्थळ:- नांव व पदनाम
शासकीय अधिकारी/ कर्मचारी घर बांधणी अग्रीमासाठीचे प्रस्ताव नमुना pdf मध्ये मिळविण्यासाठी येथे click करा