अपर आयुक्त (आस्थापना) यांना विभागीय आयुक्त कार्यालयातील विकास शाखेसाठी आहरण व संवितरण अधिकारी म्हणुन घोषित करणेबाबत.
महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांकः RDD-१३०११/१७५/२०२५/आस्था-३ बांधकाम भवन, २५ मर्झबान पथ, फोर्ट मुंबई-४००००१ दिनांक : २० जून, २०२५
ग्राम विकास विभाग, शासन निर्णय दिनांक १६.१०.१९९९ अन्वये विभागीय आयुक्त कार्यालयातील विकास शाखेचे बळकटीकरण करण्यासाठी उप आयुक्त (आस्थापना व अन्य वर्ग १) ची पदे निर्माण करण्यात आली आहेत. सदर शासन निर्णयान्वये त्यांना कार्यालयातील विकास शाखेसाठी आहरण व संवितरण अधिकारी असे नमूद केले आहे. तदानुषंगाने ग्राम विकास विभाग, शासन निर्णय दिनांक ०५.०५.२००१ अन्वये विभागीय आयुक्त कार्यालयातील विकास शाखेसाठी त्या शाखेतील उपायुक्त (आस्थापना) यांना आहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्यात आले आहे. ग्राम विकास विभाग, शासन निर्णय दिनांक १३.०५.२०२५ अन्वये विभागीय आयुक्त कार्यालयातील उप आयुक्त (आस्थापना) यांचे पदनामामध्ये अपर आयुक्त (आस्थापना) असा बदल करण्यात आला असल्यामुळे दि. ०५.०५.२००१ रोजीचा शासन निर्णय अधिक्रमित करुन अपर आयुक्त (आस्थापना) यांना विभागीय आयुक्त कार्यालयातील विकास शाखेसाठी आहरण व संवितरण अधिकारी म्हणुन घोषित करणे आवश्यक आहे.
२. त्यानुषंगाने संदर्भाधिन क्र.१ येथील दिनांक ०५.०५.२००१ रोजीचा शासन निर्णय अधिक्रमित करुन महाराष्ट्र विकास सेवा, गट-अ अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (निवडश्रेणी) (एस-२७) संवर्गातील विभागीय आयुक्त कार्यालयातील अपर आयुक्त (आस्थापना) यांना विभागीय आयुक्त कार्यालयातील विकास शाखेसाठी आहरण व संवितरण अधिकारी म्हणुन घोषित करण्यात येत आहे.३. अपर आयुक्त (आस्थापना) यांनी आवश्यक ते अधिकार पत्र महालेखापाल कार्यालयाकडून प्राप्त करुन घ्यावे
संकेताक २०२५०६२०१११००७३९२०