परिपत्रक
शासन सवेतील निरनिराळया सेवेतील/संवर्गातील/श्रेणीमधील पदावर सरळ सेवेने/नामनिर्देशनाने सेवाभरती करण्याकरिता आवश्यकतेनुसार सेवा प्रवेश नियमाद्वारे अनुभवाचा कालावधी विहित केलेला असतो. तथापि अनुभवाच्या कालावधीची गणना करताना कोणत्या प्रकारचा अनुभव ग्राहय धरण्यात यावा याबाबत निश्चित आदेश सध्या उपलब्ध नाहीत.
२. शासन प्रवेशासाठी अनुभव विहित करण्यामागे शासनाची भूमिका नव्याने सेवेत, संवर्गात प्रवेश करणाऱ्या उमेदवारांचे ज्ञान त्या विविक्षित पदाकरिता पुरेसे असून त्या पदाची कर्तव्ये,जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी तो सक्षम आहे किंवा कसे याची पडताळणी व्हावी ही आहे. त्यामुळे अल्पकालावधीची किंवा तासिका तत्वावर, अतिरिक्त कार्यभार, प्रशिक्षण अभ्यागत किंवा अशदानात्मक अशा स्वरुपाचे काम केलेल्या उमेदवारांना जर ते काम पूर्ण वेळ केलेले नसेल तर तो अनुभव नियुक्तीसाठी पुरेसा अनुभव असल्याचे गृहित धरणे योग्य होणार नाही. त्यामुळे या प्रश्नाचा सर्वकष विचार करुन शासन आता असे आदेश देत आहे की, यापुढे सरळ सेवेने,नामनिर्देशनाने नियुक्तीसाठी उमेदवारांच्या अनुभवाच्या कालावधीची गणना करताना रोजंदारी, कार्यव्ययी, करार पध्दतीवर, मानधन इ. स्वरुपात केवळ पूर्णवेळ काम केले असल्यासच असा कालावधी नियुक्तीसाठी विहित केलेल्या अनुभवासाठी ग्राहय धरण्यात यावा. मात्र तासिका (on hour basis), नियतकालिक (periodical), अंशकालीन (part time), विद्यावेतन (on stipend), अभ्यागत (visiting), अंशदानात्मक (contributory), विनावेतन (without pay) तत्वावर केलेल्या अंशकालीन सेवेचा कालावधी, तसेच प्रभारी (incharge) म्हणून नेमणूकीचा कालावधी, अतिरिक्त कार्यभाराचा (additional charge) कालावधी अनुभवासाठी ग्राहय धरता येणार नाही.
-
2.2K
-
2.6K
-
1.3K
-
717
-
612
-
1.1K