Thursday, September 4, 2025
Thursday, September 4, 2025
Home » अनुकंपा नोकरीसाठी आवशक कागदपत्रे

अनुकंपा नोकरीसाठी आवशक कागदपत्रे

0 comment 684 views

अनुकंपा नोकरीसाठी आवशक कागदपत्रे यादी मिळविण्यासाठी येथे Click करा

अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी केलेल्या अर्जा संदर्भात कागदपात्रांची पूर्तता करणेबाबत
१) शासन निर्णय दि २६/१०/१९९४ मधील परीशिष्ठ व नुसार विहित नमुन्यातील अर्ज पूर्णतः भरून सादर करावा.
२) जिल्हा परिषद कर्मचारी वैद्यकीय कारणास्तव सेवानिवृत्त झाले असल्यास त्यानुसार कागदपत्र (जसे) कार्यालयाचे सेवानिवृत्ती आदेश, संबंधित कार्यालयाचा कर्मचाऱ्याचे जन्म तारखेबाबत दाखला
३) जिल्हा परिषद कर्मचारी मयत झाले असल्यास त्याचा मृत्यु दाखला
४) मयत कर्मचारी जिल्हा परिषद सेवेत असतांना मृत झाले बाबत संबंधित कार्यालयाचे अधिकार्याचा दाखला (मुळ दाखला)
५) तहसीलदार यांनी दिलेला संबंधित कर्मचाऱ्याचे वारस दाखला अथवा में उच्च न्यायालायचे वारसा बाबत सक्सेशन सर्टिफिकेट (वारस दाखला)
६) संबधित कर्मचारी यांचे निवृत्तीवेतन आदेशाची प्रत
७) कुटुंबातील कोणीही व्यक्ती सरकारी अथवा निमसरकारी नोकरीत नाही याबाबत तहसीलदार यांचे समक्ष करून दिलेले रु १००/- चे स्टॅम्पपेपर वरील अर्जदार यांनी केलेले मुळ प्रती प्रतिज्ञापत्र
८) अर्जदारास नोकरी देण्यास हरकत नाही असे कुटुंबातील इतर सर्व वारसाचे रु १००% च्या स्टॅम्पपेपर तहसीलदार यांचे समक्ष करून दिलेले मूळ संमतीपत्र
९) अर्जदार भविष्यात कुटुंबातील सर्व सद्स्याचे पालन पोषण करेल याची हमी देणारे (अर्जदाराचे) रु १००/-च्या स्टॅम्पपेपर कलेले मूळ प्रतिज्ञापत्र
१०) मयत कर्मचाऱ्याची पत्नी असल्यास पुर्नविवाह न केल्या बाबतचे रु १०० च्या स्टॅम्पपेपर कलेले मूळ प्रतिज्ञापत्र
११) संबंधित अविवाहित शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीत, त्याचेवर सर्वस्वी अवलंबून असणारा भाऊ बहीण यांचा अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी अर्ज असल्यास अर्जदार स्वतः अविवाहित असलेबाबत तसेच संबंधित अविवाहित शासकीय कर्मचारी याचेवर सर्वस्वी अवलंबून असलेबाबत रु १००/- स्टॅम्पपेपर कलेले मूळ प्रतिज्ञापत्र
१२) अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला, तसेच सर्व शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र (असल्यास टंकलेखन /संगणक विहित
१३) अर्जदार मागासवर्गीय प्रवर्गातील असल्यास जातीचा दाखला व असल्यास संबंधीत पडताळणी समितीचे वैधता प्रमाणपत्र
१४) दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्याच्या वारस दाखल्यात नमूद वारसाच्याबाबतीत स्वतंत्र कागदावर नावे, नाते, व जन्मतारीख सदर करावी.
१५) अनुकंपा नियुक्तीसाठी संबधित कर्मचाऱ्याचे पत्नी, या नातेवाईकांचे व्यतिरिक्त विवाहित एकमेव मुलीने अर्ज केला असल्यास (कुटुंबामध्ये फक्त विवाहित मुलगी हे एकमेव अपत्य असल्यास) विवाहित एकमेव मुलीच्या बाबतीत तिच्या सह तिच्या पतीकडून) दिवंगत शासकीय कुटुंबीयाचा तो / ती सांभाळ करील असे रु १०० च्या स्टॅम्पपेपर तहसीलदर यांचे संमक्ष करून दिलेले मूळ प्रतिज्ञापत्र
१६) मयत कर्मचारी यांच्या पत्नीच्या नावात बदल असल्यास रु १००. ०० च्या स्टॅम्पपेपर तहसीलदर यांचे संमक्ष करून दिलेले मूळ प्रतिज्ञापत्र
You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

80817

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare.