Friday, July 25, 2025
Friday, July 25, 2025
Home » आरोग्य सेविका 

आरोग्य सेविका 

0 comment

जिल्हा परिषद सरळसेवा पद भरती २०२३ आरोग्य सेवक (महिला ) शैक्षणिक अहर्ता बाबत ग्रामविकास विभाग शासन पत्र दिनांक ३०-०९-२०२४

आपले संदर्भीय पत्राचे अनुषंगाने कळविण्यात येते की, विषयांकित प्रकरणी संदर्भ क्र.४ येथील अनौपचारिक संदर्भान्वये सार्वजनिक आरोग्य विभागाने खालीलप्रमाणे अभिप्राय दिले आहेत:
१) एएनएम, जीएनएम व बीएससी नर्सिंग या अभ्यासक्रमाची पात्रता, कालावधी व अभ्यासक्रम (Syllabus) हे वेगवेगळे आहे. जीएनएम व बीएससी (नर्सिंग) ही शैक्षणिक अर्हता भारतीय परिचर्या परिषदेच्या मार्गदर्शक सुचना व सार्वजनिक आरोग्य विभाग सेवा प्रवेश नियम अधिसूचना दि.२७.०२.२०२१ नुसार अधिपरिचारीका या पदाकरीता आवश्यक आहे व एएनएम ही मुलभुत शैक्षणिक अर्हता एएनएम या पदाकरौला आवश्यक आहे. यास्तव, जीएनएम व बीएससी नर्सिंग ही जरी उच्च शैक्षणिक अर्हता असली व ते एएनएमचे कामे जरी करु शकत असले तरीही मानांकानुसार व सेवा प्रवेश नियम १९६७ अनुसार एएनएम प्रदावी शैक्षणिक अर्हता ठरत नाही.
२) जीएनएम व बीएससी नर्सिंग अभ्यासक्रम उत्तीर्ण उमेदवारांची नोंदणी व नुतनीकरण त्या त्या अभ्यासक्रमानुसार महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलद्वारे करण्यात येते. तसेच एएनएम अभ्यासक्रम उत्तीर्ण
अभ्यासक्रमाची नोंदणी एएनएम महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलद्वारे करण्यात येते. दोन्ही अभ्यासक्रमांची नोंदणी स्वतंत्र असल्याने जीएनएम पदाकरीता असलेली नोंदणी एएनएम पदाकरीता ग्राह्य धरता येणार नाही.
३) जीएनएम व बीएससी नर्सिंग ही एएनएम पदाकरीता उच्च शैक्षणिक अर्हता असली तरी दोन्ही पदांचे सेवा प्रवेश नियम, कामाचे स्वरुप (कर्तव्ये व जबाबदाऱ्या) भिन्न आहेत. जीएनएम ही जरी उच्च शैक्षणिक अर्हता असली तरी सदर अर्हता एएनएम पदाशी निगडीत नाही. त्यामुळे भारतीय परिचर्या परिषद अभ्यासक्रम, एएनएम पदाचे सेवाप्रवेश नियम व संचालक, आरोग्य सेवा, मुंबई यांचे पत्र दि.२९.२.२०१६ नुसार एएनएम शैक्षणिक अर्हताधारक व महाराष्ट्र परिचर्या परिषद नोंदणीकृत एएनएम उमेदवार हेच एएनएम पदाकरीता पात्र ठरतात.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........

बंधपत्रित आरोग्य सेविका (ए एन एम) यांच्या सेवा नियमित करण्याचे अधिकारी मा विभागीय आयुक्त यांना

विभागीय आयुक्त यांना अधिकार प्रदान करणे जिल्हा परिषदातील बंधपत्रित आरोग्य सेविका ए एन एम यांच्या सेवा नियमित करण्याबाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय दि ०२-०५-२००९

शासन निर्णय :-
जिल्हा परिषद, सोलापूर व जिल्हा परिषद, बीड यांच्या अखत्यारीतील भरण्यात आलेल्या सहायक परिचारिका प्रसाविका ए. एन. एम. पदाच्या सेवा नियमित करण्याबाबतच्या या विभागाच्या प्रस्तावासंदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाने असे विशद केले आहे की, त्या विभागाच्या दिनांक १६/१/२००३ च्या शासन निर्णयान्वये राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राचा आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला आहे त्यानुसार प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये प्रत्येकी एक ए. एन. एम. चे एक पद मंजूर केले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक ६/८/२००७ च्या सुधारित आकृतीबंधामध्ये निश्चित केलेल्या आरोग्य सेविकांच्या पदांचा आढावा हा "२२१०" या मुख्य लेखाशिर्षाखालील आहे. "२२११" या मुख्य लेखाशिर्षाखालील पदांचा आढावा अद्याप झालेला नाही. याचा विचार करता त्या विभागाने असे कळविले आहे की, बंधपत्रित ए.एन.एम. यांचा बंधपत्र कालावधी संपुष्टात आल्यानंतर बंधपत्रित उमेदवारांची संख्या विचारात घेऊन त्यांच्या नेमणूका मंजूर रिक्त पदावर नियमित करण्याबाबत पुढीलप्रमाणे पध्दत अवलंबिण्यात यावी :-
अ) प्रत्येक जिल्हयासाठी मंजूर असलेल्या उपकेंद्राच्या संख्येएवढी उपकेंद्राच्या ए. एन. एम. ची पदे मंजूर आहेत. या व्यतिरिक्त प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या लोकसंख्येसाठी त्या त्या लोकसंख्येनुसार एक किंवा जास्त उपकेंद्रे मंजूर झालेली आहेत. तेथील पदांना सुध्दा उपकेंद्राच्या आरोग्य सेविका असे संबोधण्यात येते. या व्यतिरिक्त प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आकृतीबंधामध्ये आरोग्य सेविकेचे एक पद संस्थेसाठी मंजूर आहे ते २२१० मुख्य लेखाशिर्षांतर्गत आहे.
ब) दरवर्षी प्रत्येक जिल्हयामध्ये बंधपत्रित उमेदवारांना नेमणूकीचे आदेश दिले जातात. त्याची साधारणपणे आकडेवारी प्रत्येक जिल्हयाकडे उपलब्ध असते.
क) त्या सरासरी संख्येनुसार थोडयाफार फरकाने दरवर्षी त्या त्या जिल्हयाने जुन्या उमेदवारांच्या बंधपत्र कालावधी संपल्यानंतर नवीन बंधपत्रित ए. एन. एम. यांना केवळ बंधपत्र कालावधीसाठी नेमणूक देणे बंधनकारक आहे.
ड) एकूण मंजूर पदांमधून ही संख्या वजा केल्यानंतर येणारी उरलेली आकडेवारी ही त्या त्या जिल्हा परिषदेला नियमित स्वरुपी नेमणूका देण्यासाठी उपलब्ध असलेली ए. एन. एम. ची पदे दर्शविते.
ई) सदर नियमित स्वरुपी भरावयाच्या पदांमध्ये जी पदे रिक्त आहेत ती जिल्हा परिषद स्तरावर त्यांनी विहित केलेल्या पध्दतीनुसार भरण्यात यावीत. २. उपरोक्त बाबी विचारात घेता ग्राम विकास व जलसंधारण विभागामध्ये शासनाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे :-
१) नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी परिच्छेद १ मध्ये विहित केलेल्या पध्दतीप्रमाणे आरोग्य सेविकांची (ए.एन.एम.) भरती करावी.
२) मंजूर पदसंख्या व भरती करावयाची आरोग्य सेविकांची (ए.एन.एम.) पदे यांचा नियमित आढावा घेऊन त्यांच्या सेवा नियमित करण्याची जबाबदारी सर्वस्वी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांची राहील.
३) उपरोक्त (१) व (२) बाबत आवश्यक ती पडताळणी करुन त्यानुसार मंजूरी देण्याचे अधिकार विभागीय आयुक्त यांना महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा नियम १९६८ अन्वये देण्यात आलेले आहेत.
४) जिल्हा परिषद, सोलापूर व बीड संदर्भात आरोग्य संचालकांनी दिनांक १६/१/२००६ पूर्वी सदर पदावर जिल्हा परिषदेमध्ये अलॉटमेंटचे पत्र दिल्याची बाब तपासून विभागीय आयुक्त, पुणे व औरंगाबाद यांनी तसेच इतर विभागीय आयुक्त यांनीही अशाच प्रकारे कार्यवाही करावी.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी.

सहाय्य्य्क परिचारिका प्रसविका  या संवर्गातील कर्माचाऱ्याना महिला आरोग्य अभ्यागत या पदावर सेवातर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत सा आ वि शा नि क्र बढती २००२/२२५/सेवा ५ दि २७/२/२००३

वर नमूद करण्यात आलेली पार्श्वभूमी लक्षात घेऊन राज्यातील सहाय्यक परिचारीका प्रमाविका (वेतनश्रेणी रु.४०००-१००-६०००) या पदावर काम करणाऱ्या' कर्मचा-यांना देवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेनुसार " महिला आरोग्य अभ्यांगता' (वेतनश्रेणी रु.४५००-१२५-०७०००) या पदोत्रारीवरील पदाची वेतनश्रेणी उपरोक्त अ.क. २ पेधोल आदेशानुसार त्या पदादरील पदोन्नतीकरिता प्रशिक्षण पूर्ण करणे ८ विहित परिक्षा उत्तीर्ण होण्याची अट शिथिल करुन खालील अर्थीच्या आधीन राहून मंजूर करण्यास एक विशेष बाय म्हणून शासनाचो मान्यता देण्यात येत आहे.
१२ वर्षे नियमित सेवा पूर्ण केलेल्या परंतु प्रशिक्षणाची संधी उपलब्ध झालेल्या सहाय्यक परिचारीका प्रसाविकांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ त्यांची १२ वर्षाची नियमित सेवा ज्या दिनांकास पूर्ण होईल त्या दिनांकापासून अनुज्ञेय राहिल. . तेथापि भविष्यात सेवा ज्येष्ठतेनुसार विहित प्रशिक्षण देण्यात आल्यावर ते पूर्ण करुन विहित परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील अन्यथा बरिष्ठ वेतनश्रेणीचे लाभ काढून घेण्यात येईल.

"महिला ओरोग्य अध्यांगता" या पदावरील पदोत्रतीकरिता प्रशिक्षण पूर्ण करणे व विहित परिक्षा उत्तीर्ण होण्याची अट शिथिल करण्यात आली असली तरी त्या व्यतिरिक्त शासन निर्णय, वित्त विभाग क. वेतन १२५०/प्रक्र२/९९/सेवा-३ दिनांक २० जुलै २००१ अन्वये विहित केलेल्या इतर सर्व अटी व शर्तींचे पालन करण्यान याने.
क पोचतीसाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण नाकारलेल्या तसंच प्रशिक्षणानतंरधी परिक्षा उत्तीर्ण न झालेल्या सहाय्यक परिचारीका प्रसाविका यांना या योजनेतंर्गत वरिष्ठ बेतनश्रेणी अनुज्ञेय राहणार नाही.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी.

आरोग्य सेवक (महिला) व आरोग्य सहय्यक (महिला) या पद्नामाचे नवीन संवर्ग निर्माण करण्या बाबत सा आ वि शा नि क्र एनयूआर १०९०/२०५/प्र क्र ४८/९/सेवा ६ दि २१/९/१९९३

शासन निर्णयः बहुउद‌शिय आरोग्य सेवा योजना पुरुष कर्मचा-यांना लागू करून त्यानुसार पुरुष कर्मचा-यांच्या पदनामात बदल करण्यात आला. याच अधिकारावर प्राथमिक आरोग्य केंद्र / उपकेंद्र स्तरावरील महिला कर्मचा-यांच्या पदनामात बदल करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता, शासन आता असे आदेश देते कीं, प्रमथमिक आरोग्य केंद्र /उपकेंद्र स्तरावरील सहायात परिचारिका प्रसाविका या पदाचे पढ़नाम आरोग्य सेवक (महिला) व स्त्री आरोग्य अभ्यागता या पदाचे पदमाम आरोग्य सहायक (महिला) असे बदलण्यात यावे. वरील प्रमाणे बदल केलेल्या पदनामाच्या आरोग्य सेवक (महिला) या पदरसारूपये १२००--१८०० व आरोग्य सहायक (महिला) या पटास संप्रये १४०००-२३०७ ही वेतनश्रेणी लागू राहील.
शासन असंही आदेश देते कीं, प्राथमिक आरोग्य केंद्र/ उपकेंद्र स्तरातर असलेल्या" परिचारिका प्रसाविका" हा संवर्ग सुप्त संवर्ग (डाईग फेडर) म्हणून समजण्यांत यावा, सध्या परिचारिक प्रसाविका ही पदे धारण करणा-या व्यक्ती सेवेत असे पर्यन्त या पदाचे सध्या वे पदनाम चालू ठेवण्यात यावे. त्यानंतर सध्याच्या परिचारिका प्रसाविळा या पदावर काम करणारे संबंधीत कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यावर अथवा ही पदे अन्य कोणत्याही कारणांनी रिक्त झाल्यावर हया रिक्त पदांचे पदनाम बदलण्यात यावे व ते आरोग्य सहाय्यक (महिला) असे करण्यात यावे.
३/- नव्याने निर्माण करण्यांत आलेल्या संवर्गाचे सेवाप्रवेश नियम तयार करण्याची कारवाई ग्रामविकास विभागामार्फत करण्यात येईल तो पर्यंत आरोग्य लेवक (भहिला) ही पदे सहायक परिचारिका प्रलाविकांच्या पदासाठी विहित करण्यात आलेल्या सेवा प्रवेश नियमातील तरतूदींनुसार भरावीत. तसेच आरोग्य सहायक (महिला) ही पदे महिला आरोग्य अभ्यागता साठी विहित करण्यात आलेल्या सेवा प्रवेश नियमातील तरतुदीनुसार भरण्यांत यावीत.
वरील प्रमाणे पदनामाच्या बदलानुसार सेवा प्रवेश नियमात आवश्यक त्या सुधारणा करण्याची कार्यवाही ग्राम विकास विभागाने तात्काळ करावी.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

46627

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare.