२. योजनेचे लाभार्थी :– (अ) सदर योजनेअंतर्गत सर्व नोंदित सक्रिय (जिवित) बांधकाम कामगार तसेच, त्यांच्या कुटुंबामधील पत्ती अथवा पत्नी व १० वर्षावरील प्रथम दोन अपत्ये ही लाभार्थी म्हणून नणण्यात येतील. (4) सदर योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांच्या सक्रिय (जिवित) नोंदणी कालावधीमध्ये वर्षातून एकदा सदर योजनेच्या लाभासाठी लाभार्थी पात्र राहील. (क) सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक २८.०७.२०२३ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार नोंदीत सक्रिय (जिवित्त) बांधकाम कामगार अथवा त्याच्या कुटुंबातील पात्र व्यक्तींनी आरोग्य योजनेचा लाभ घेतला असल्यास त्यांना शासकीय योजनेची द्विरुक्ती टाळण्यासाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही. मात्र, त्या बांधकाम कामगाराचा अथवा कुटुंबातील पात्र लाभार्थ्यांच्या उपचारावरील खर्च रुपये ५.०० लक्षपेक्षा अधिक होणार असल्यास या योजनेच्या खर्चाच्या मर्यादेत नियुका संस्थेने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सहमतीने सूचीबद्ध केलेल्या रुग्णालयांमार्फत उपचाराकरीता सदर लाभार्थी पात्र राहील. (ङ) सदरची योजना मंडळाकडे नोंदित सक्रिय (जिविता बांधकाम कामगारांकरीता ऐच्छिक स्वरूपाची ☆ राहील.
४. योजनेचे टप्पे :– सदरची योजना खालील तीन टप्प्यामध्ये राबविण्यात येईल. (अ) प्राथमिक आरोग्य तपासणी चाचणी अ.१- तपासणी पूर्व आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन (Pre-Health Camp) – नियुक्त संस्था, जिल्हा कामगार सुविधा केंद्राचे प्रमुख कामगार उपायुक्त/सहायक कामगार आयुक्त/सरकारी कामगार अधिकारी यांच्या मान्यतेने शिबीराची ठिकाणे, दिनांक व वेळ निश्चित करतील. अ.२- आरोग्य तपासणी शिबीरामधील उपक्रम –
अ.२.१ नियुक्त संस्था, शिबीराकरीता निश्चित केलेल्या लाभार्थ्यांना एकत्रित करतील व त्यांची नोंदणी करण्यात येईल.
अ.२.२ नियुक्त संस्था, शिबीरामध्ये आवश्यकतेनुसार डॉक्टर व वैद्यकीय सहाय्यक उपलब्ध करून देतील.
अ.२.३ शिबीरामध्ये लाभाथ्यर्थ्यांची शारीरीक तपासणी करण्यात येईल व त्यांच्या पूर्व आजार तथा वैद्यकीय इतिहासाबाबत माहिती नोंदविण्यात येईल. अ.२.४ शिबीरामध्ये नियुक्त संस्थेमार्फत लाभार्थ्यांच्या तपासणीसाठीचे नमुने (Samples) गोळा करण्यात येतील.
अ.२.५ बांधकाम कामगारांच्या करावयाच्या प्राथमिक आरोग्य तपासणी चाचण्या ह्या वरील नमूद शिबीरामध्ये अथवा बांधकाम कामगारांच्या घरोघरी जाऊन नियुक्त संस्थेकडून करण्यात येतील.
अ.३- प्रयोगशाळेमधील तपासणी – अ.३.१ शिबीरामध्ये अथवा बांधकाम कामगारांच्या घरोघरी जाऊन लाभार्थ्यांच्या प्राथमिक आरोग्य तपासण्यांच्या नमुन्यांच्या (Samples) अनुषंगाने करावयाच्या चाचण्या शासनाच्या मान्यतेने निश्चित करण्यात येतील.
अ.३.२ चाचण्यांचे दर हे CGHS (Central Government Health Scheme) च्या दराच्या मर्यादेत राहतील. अ.४- तपासणी नंतर सल्लामसलत (Consultation) शिबीराचे आयोजन (Post-Health Camp) – अ.४.१ लाभार्थ्यांच्या आरोग्य तपासणीचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर नियुक्त संस्थेमार्फत तपासणीनंतर सल्लामसलत (Consultation) शिबीराचे (Post-Health Camp) आयोजन करण्यात येईल. अ.४.२ सदर शिबीरामध्ये तपासणी अहवालाचे वितरण लाभार्थ्यांना करण्यात येईल. अ.४.३ तपासणी अहवालाच्या अनुषंगाने लाभार्थ्यांचे डॉक्टरांसोबत सल्लामसलत (Consultation) करण्यात येईल.
अ.४.४ तपासणी अहवाल, लाभार्थ्यांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठविण्यात येईल. तसेच, संगणक प्रणालीमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. अ.४.५ प्राथमिक आरोग्य तपासणी चाचणीमध्ये सामान्य अहवाल (Normal Report) असलेल्या लाभार्थ्यांची पुढील कार्यवाही (Case) बंद करण्यात येईल.
अ.४.६ प्राथमिक आरोग्य तपासणी चाचणीमध्ये असामान्य अहवाल (Abnormal Report) असलेल्या लाभार्थ्यांस आवश्यकतेनुसार लाभार्थ्याच्या सहमतीने औषधोपचाराची शिफारस करण्यात येईल अथवा प्रगत पुष्ठीकरण आरोग्य तपासणी चाचणी (Advanced Confirmatory Test) करीता सूचविण्यात येईल.
(ब) प्रगत पुष्ठीकरण आरोग्य तपासणी चाचणी (Advanced Confirmatory Test)
ब.१. प्राथमिक आरोग्य तपासणी चाचणीमधील ज्या चाचणीचा अहवाल असामान्य (Abnormal Report) असेल अशा चाचणीची दुबार चाचणी करण्याची मागणी लाभार्थ्यांने केल्यास, नियुक्त संस्था विनाशुल्क एकवेळेस अशी चाचणी करेल.
ब.२ प्राथमिक आरोग्य तपासणी चाचणीमध्ये असामान्य अहवाल (Abnormal Report) असलेल्या लाभार्थ्यांची सहमती असल्यास त्यास प्रगत पुष्ठीकरण आरोग्य तपासणी चाचणी (Advanced Confirmatory Test) करीता शिफारस करण्यात येईल.
ब.३ नियुक्त संस्थेने सूचीबद्ध (Empanelled) केलेल्या रुग्णालयामध्ये/तपासणी प्रयोगशाळांमध्ये/सूचीबद्ध (Empanelled) प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रगत पुष्ठीकरण आरोग्य तपासणी चाचणी (Advanced Confirmatory Test) करण्यात येईल.
ब.४ प्रगत पुष्ठीकरण आरोग्य तपासणी चाचण्या (Advanced Confirmatory Test) ह्या केवळ जिवीतास धोका निर्माण करणाऱ्या आजाराच्या (Life Threatening Diseases) बाबतीत करावयाच्या चाचण्या शासन मान्यतेने निश्चित करण्यात येतील.
ब.५ चाचण्यांचे दर हे CGHS (Central Government Health Scheme) च्या दराच्या मर्यादेत राहतील.
ब.६ प्रगत पुष्ठीकरण आरोग्य तपासणी चाचणीमध्ये (Advanced Confirmatory Test) सामान्य अहवाल (Normal Report) असलेल्या लाभार्थ्यांची पुढील कार्यवाही (Case) बंद करण्यात येईल.
ब.७ प्रगत पुष्ठीकरण आरोग्य तपासणी चाचणीमध्ये (Advanced Confirmatory Test) असामान्य अहवाल (Abnormal Report) असलेल्या लाभार्थ्यांस, आवश्यकतेनुसार लाभार्थ्याच्या सहमतीने औषधोपचाराची शिफारस करण्यात येईल अथवा उपचाराकरीता सूचिबद्ध रूग्णालयामध्ये भरती करण्यात येईल.
(क) वैद्यकीय उपचार (क-१) औषधोपचार क-१.१ प्राथमिक आरोग्य तपासणी चाचणीमध्ये तसेच, प्रगत पुष्ठीकरण आरोग्य तपासणी चाचणीमध्ये (Advanced Confirmatory Test) असामान्य अहवाल (Abnormal Report) असलेल्या लाभार्थ्यांस आवश्यकतेनुसार लाभार्थ्याच्या सहमतीने औषधोपचार करण्यात येईल. ३ क-१.२ सदर योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या जन औषधी/अम्रित (AMRIT) योजनेअंतर्गत निश्चित केलेल्या दराच्या मर्यादेत औषधांचा पुरवठा लाभार्थ्यांना करेल. क-१.३ सदर योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी (जिवित सक्रिय नोंदणी कालावधी) प्रति वर्ष रक्कम रू. ५,०००/- च्या मर्यादेत नियुक्त संस्था औषधांचा पुरवठा करेल.
(क-२) रूग्णालय भरती क-२.१ प्रगत पुष्ठीकरण आरोग्य तपासणी चाचणीमध्ये (Advanced Confirmatory Test) असामान्य अहवाल (Abnormal Report) असलेल्या लाभार्थ्यांस, त्याच्या सहमतीने उपचाराकरीता संस्थेने सूचीबद्ध (Empanelled) केलेल्या रुग्णालयामध्ये भरती करण्यात येईल. क-२.२ लाभार्थीवर उपचार करण्यात येणारी रुग्णालये ही नियुक्त संस्थेकडे सूचीबद्ध असणे आवश्यक राहील. क-२.३ रुग्णालयामध्ये लाभार्थ्यास भरती केल्यानंतर त्याची नोंदणी करण्यात (Admission) यावी तसेच, उपचाराअंती Discharge Paper व झालेला एकूण खर्च याच्या नोंदी नियुक्त संस्थेमार्फत संगणक प्रणालीवर ठेवण्यात येतील. क-२.४ उपचारावर झालेल्या खर्चाच्या रक्कम रू.२.०० लक्ष च्या मर्यादेमध्ये रूग्णालयास नियुक्त संस्थेकडून अदायगी करण्यात येईल व सदर रकमेची प्रतिपुर्ती मंडळाकडून नियुक्त संस्थेस करण्यात येईल. क-२.५ विशिष्ठ आजाराच्या प्रकरणी उपचाराचा खर्च रक्कम रू.२.०० लक्ष पेक्षा जास्त मात्र रु.७.०० लक्ष च्या मर्यादेत होणार असल्यास, संबधित रुग्णालयाच्या वैद्यकीय प्रमुख यांची शिफारस तसेच, जिल्हा कामगार सुविधा केंद्राचे प्रमुख कामगार उप आयुक्त /सहायक कामगार आयुक्त / सरकारी कामगार अधिकारी यांच्या मान्यतेने व संबधित जिल्ह्याच्या शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता यांच्या शिफारशीने अशी प्रकरणे “बांधकाम कामगार आरोग्य समिती” कडे सादर करण्यात यावीत
“महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत पात्र बांधकाम कामगारांस बांधकामासाठी उपयुक्त/आवश्यक असलेली अवजारे खरेदी करण्याकरीता रु. ५०००/- चे अर्थसहाय्य हे बांधकाम कामगारांच्या नोंदणी नंतर लगेच देण्यात यावे. तसेच पुढील तीन वर्षानंतर लाभ घेण्यासाठी अशा बांधकाम कामगारांची मंडळाकडे सलग तीन वर्षे नोंदणी असणे अनिवार्य आहे” संगणक संकेतांक २०१८०३०६१४५८४४७०१०
महाराष्ट्र इमारत व इतर बाांधकाम कामगार कल्याणकारी मांडळातील नोंदणी जीतवत असलेले बाांधकाम कामगार व त्याांच्यावर अवलांतबत कुटुबयाांचा समावेश महात्मा ज्योततबा फुले जन आरोग्य योजनेंतगवत करण्यास मान्यता देण्यात येत आहे
सांकेताक 201706021314126517
कामगार नोंदणी साठी आवश्यक असलेले सर्व form, प्रपत्रा साठी येथे क्लिक करा
बांधकाम कामगार शासन निर्णय मिळविण्यासाठी येथे click करावे.
- आदिवासी विकास विभाग
- आरोग्य अधिनियम पुस्तक
- आरोग्य कर्मचारी दालन
- आरोग्य कार्यक्रम शासननिर्णय
- आरोग्य योजना
- आरोग्य विभाग पदनिर्मिती
- आरोग्य संख्या शास्त्र
- आरोग्य सेवा
- इतर योजना
- उपयुक्त नमुने
- एक्सेल फॉर्मुला
- कर्मचारी व्यक्तिगत उपयोगी दालन
- कायदे व नियम
- कार्यालयीन संहीता
- कृषी विभाग योजना
- गृह विभाग
- गृह-पोलिस
- ग्रा प अधिनियम
- ग्रा पं शासननिर्णय
- ग्रामपंचायत विभाग योजना
- ग्रामविकास
- ग्रामविकास सेवा
- जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा-घरकुल
- जिल्हा परिषद-पंचायत समिती
- तंत्रज्ञान शिक्षण
- नोकरी विषयी
- पाणी पुरवठा विभाग
- पॉवर पॉईंट
- प्रशासकीय नमुने
- बांधकाम विभाग
- बांधकाम विभाग
- महसूल
- महसूल योजना
- महसूल सेवा
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
- महाराष्ट्र विकास सेवा
- महाराष्ट्र विकास सेवा
- महिला व बाल कल्याण विभाग योजना
- मे न्यायालय निर्णय
- मे न्यायालय निर्णय
- मोटार वाहन विभाग
- लाभार्थीसाठी प्रस्ताव
- लेखाविषयक
- वित्त आयोग
- विभागनिहाय शासननिर्णय
- वैद्यकीय अधिकारी
- शासकीय पुस्तक-अधिनियम
- शासकीय योजना
- शिक्षण विभाग
- शिक्षण सेवा
- संकीर्ण
- समाजकल्याण विभाग योजना
- सार्वजनिक आरोग्य
- सार्वजनिक बांधकाम
- सेवा प्रवेश: अर्हता, निकष
- सेवाप्रवेश नियम
- सेवाविषयक
Leave a Reply