151
१. मंत्रालय तसेच क्षेत्रीय आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाशी संबंधित क्षेत्रीय कार्यालयात ई- ऑफिस कार्यप्रणाली राबविण्यासाठी Nodal Officer नियुक्त करण्यात यावा. ई-ऑफिस प्रणाली राबविण्याची जबाबदारी Nodal Officer यांच्यावर राहील
२. ई-ऑफिस बाबतची पूर्व तयारी जसे विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे ई-मेल तयार असणे, Digital Signature, ई-ऑफिस अकाऊंट, प्रशिक्षण या बाबी सर्व कर्मचाऱ्यांच्या पूर्ण असल्याबाबत खात्री करून घ्यावी.
३. अधिकारी / कर्मचारी यांनी त्यांच्या ई ऑफिस खात्यामधील Team सदरांतर्गत नमूद अधिकारी/कर्मचारी यांची नावे अद्ययावत करून घ्यावीत
४. विषयाचे ३ अक्षरी संकेताक्षर (Nomenclature) अद्ययावत करून घ्यावीत
५. ई-ऑफीस प्रणालीमध्ये काम करतांना काही तांत्रिक सहाय्य / प्रशिक्षणाची पुन्हा आवश्यकता भासल्यास माहिती तंत्रज्ञान विभागातील ई-ऑफीसशी संबंधित नोडल अधिकारी तसेच सपोर्ट टीमकडे संपर्क साधावा. ई ऑफिस कार्यप्रणाली (SOP) संबंधित सा.प्र.वि./माहिती तंत्रज्ञान संचालनालयाकडून वेळोवेळी निर्गमित User Manual, 11. नि/परिपत्रके/पत्रे इ. चा अभ्यास करावा
६. विधानमंडळ / न्यायालयीन / सेवा हमी /माहिती अधिकार मा. मंत्री कार्यालयाकडून प्राप्त होणारे टपाल इ. महत्त्वाच्या विषयाशी संबंधित प्राप्त संदर्भ / नस्त्या तसेच शासनाकडून क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठविण्यात येणारे असे महत्त्वाचे शासन पत्र/संदर्भयांच्या निपटा-याकरीता कालावधी निश्चित करण्यात यावा.
७. ज्या प्रकरणी सचिव स्तरावर मान्यता आवश्यक आहे, त्याप्रकरणी सर्व नवीन नस्त्या दि. २९.२.२०२४ पर्यंत पूर्णत ई-ऑफिसद्वारेच सुरू करण्यात यावे. इतर विभागाकडे अभिप्रायार्थ पाठविल्या जाणा-या नस्त्या, मंत्रीमंडळ मान्यतेच्या नस्त्या, विधानमंडळ कामकाज, तसेच न्यायालय प्रकरणे, माहिती अधिकारांतर्गत कामकाज इ. संबंधित नस्त्या दि. १५.०३.२०२४ पर्यंत पूर्णत ई-ऑफिसद्वारेच सुरू करण्यात यावे. उर्वरित सर्व जुन्या / नवीन नस्त्या दि. ३१.०३.२०२४ पर्यंत पूर्णत ई-ऑफिसद्वारेच सुरू करण्यात यावे.
८. अधिकारी / कर्मचारी यांनी त्यांच्या ई-ऑफिस खात्यामधील KMS सदरामध्ये वारंवार लागणारे संदर्भित करावयाचे संबंधित विषयाचे अधिनियम/नियम/शा.नि./परिपत्रके /पत्रे इ. संग्रही करावे.
९. यापूर्वीच्या अभिलेखातील नस्त्या वर्गीकरण करून दफ्तरी दाखल कराव्यात. महत्वाच्या / पुढे चालू ठेवावयाच्या / अन्य प्रकरणी संदर्भ म्हणून उपयुक्त अशा नस्त्या स्कैन करून अधिकारी/कर्मचारी यांनी त्यांच्या ई ऑफिस खात्यामधील MIGRATION सदरामध्ये संग्रही करावे.
१०. ई-ऑफिसद्वारे काम करताना, e sign द्वारे नस्ती पुढे पाठविताना प्रत्येक e sign करीता ०.८५ रू. इतकी रक्कम खर्ची पडते. त्यामुळे नस्ती पुढे पाठविताना e sign ऐवजी send अथवा DSC sign चा वापर करावा
You Might Be Interested In