Monday, June 22, 2026
Monday, June 22, 2026
Home » वैयक्तिक गाऱ्हाणी

वैयक्तिक गाऱ्हाणी

0 comment 843 views

प्रकरणाशीसंबंधित नसलेल्या व्यक्ती अथवात त्संबंधितांकडून प्राप्त झालेल्या तक्रारी, अर्ज,निवेदना बाबत उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन परिपत्रक दिनांक १८-02-२०२५

शासनाकडे किंवा क्षेत्रीय कार्यालयाकडे आलेल्या तक्रारी हाताळणे बाबत मार्गदर्शन कृषी व पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्सव्यवसाय विकास विभाग शासन निर्णय दिनांक २४-०९-२०२

वैयक्तिक गाऱ्हाण्यासंबंधीच्या अर्जावरील कार्यवाहीबाबत स्पष्टीकरण. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांकः संकीर्ण २०१९ / प्र.क्र.७१/१८ (र. व का.) हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. दिनांक : १४ ऑक्टोबर, २०१९

परिपत्रक :
असे निदर्शनास आले आहे की, काही त्रयस्थ व्यक्ती / संस्था अन्य व्यक्तींच्या वैयक्तिक गाहाण्यासंबंधी पत्रव्यवहार तसेच पाठपुरावा करतात. अशा पत्रांची दखल घ्यावी किंवा कसे, या बाबत अनेक विभागांकडून या विभागास विचारणा होत असते. सबब यासंदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत स्पष्टता आणण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
२. शासनास करावयाचे अर्ज तयार करणे, सादर करणे व त्याची विल्हेवाट लावणे याविषयीच्या दिनांक ३ डिसेंबर, १९५८ च्या अधिसूचनेन्वये, याबाबतचे नियम विहित करण्यात आले असून त्यातील अनुक्रमांक १ येथील नियमान्वये, वैयक्तिक गाऱ्हाण्यासंबंधीचे अर्ज, ज्या व्यक्तीवर अन्याय झालेला असेल त्याच्याकडून स्वीकारण्यात यावेत. एजंटांकडून किंवा त्यांच्यामार्फत शासनास करण्यात आलेल्या अर्जाची सामान्यतः दखल घेण्यात येऊ नये, अशी तरतूद करण्यात आलेली आहे.
३. सबब सर्व मंत्रालयीन विभाग तसेच क्षेत्रिय कार्यालयांना सूचित करण्यात येते की, त्रयस्थ व्यक्ती / संस्था यांचेकडून अन्य व्यक्तींच्या वैयक्तिक गाऱ्हाण्यासंबंधी पत्रव्यवहार किंवा पाठपुरावा करण्यात आल्यास उक्त नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी.

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

448353

Recent Articles

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions