Thursday, April 24, 2025
Thursday, April 24, 2025
Home » महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता २०११

महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता २०११

0 comment

अधिसूचना
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ (सन १९५९ चा मुंबई अर्धानयम क्रमांक तीन) च्या कलम १७६ च्या पोट-कलम (१) व पोट-कलम (२) च्या खंड (सोळा), (सब्बीस), (एक्केचाळीस) व (सत्तेचाळीस) याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा व यापूर्वी या संदर्भात करण्यात आलेल्या नियमांना व आदेशांना अधिक्रमित करून आणि त्याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन ग्रामपंचायतींचे लेखे ठेवण्यासंदर्भात खालील नियम करीत आहे. त्या नियमांचा पुढील मसुदा त्याद्वारे बाधा पोहोचण्याचा संबंध असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी उक्त कलम १७६ चे पोट-कलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे याद्वारं प्रसिद्ध करण्यात आला आहे.

प्रकरण एक

प्रारंभिक

१ संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ.

२ व्याख्या.

प्रकरण दोन

सर्वसाधारण तत्वे

3 पंचायतीचे लेखे व वित्तीय अभिलेख ठेवणे.

४ संहितेमध्ये विहित केलेल्या नोंदवहीत किंवा नमुन्यात भर घालणे, फेरफार करणे किवा फेरबदल करणे.

५ लेखा पुस्तकांना सहाय्यकारी नोंदवह्या ठेवणे.

६ मुख्य लेखा परीक्षकांचे मार्गदर्शन.

प्रकरण तीन

सर्वसाधारण वित्तीय तत्वे

७ ग्राम निधीचा विनियोग.

8 ग्रामनिधीतून करावयाचा खर्च.

९ वित्तीय औचित्याची सूत्रे.

१० पंचायतीचे लेखे ठेवण्याबाबत सूचना. १० -१ क मध्ये सुधारणा

११ पावती पुस्तके इत्यादींचा हिशोब.

१२ प्रतिभूतींचे प्रमाण व नमुने.

प्रकरण चार

ग्रामनिधी

१३ ग्रामनिधी.

१४ स्थायी अग्रिम. [ मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मध्ये सुधारणा- सुधारणा अध्यादेश २००७ अधिसूचना दिनांक २१-१२-२००६]

१५ ग्रामनिधी सहकारी बँकेत ठेवणे.

१६ गुंतवणूक नोंदवही.

प्रकरण पाच

अर्थसंकल्प

१७ अर्थसंकल्प तयार करणे.

१८ अर्थसंकल्प तयार करताना प्राधिकरणाने अनुसरावयाची रीत.

१९ अर्थसंकल्पातील जमेची बाजू तयार करताना अनुसरावयाची कार्यपद्धती.

२० मर्थसंकल्पातील खर्चाची बाजू तयार करताना अनुसरावयाची कार्यपद्धती.

२१ सुधारित अर्थसंकल्प.

प्रकरण सहा

वित्तीय व्यवहार व पंचायत लेखा

२२ वित्तीय व्यवहार.

२३ मनीऑर्डर नोंदवही.

२४ प्रदानाची पद्धती.

२५ वर्गीकृत मासिक लेखे.

२६ वार्षिक लेखे.

प्रकरण सात

निधी व कर्जे

२७ जिल्हा ग्रामविकास निधी.

२८ ग्रामसेवा योजना निधी.

२९ कर्ज व कर्जाची नोंदवही.

प्रकरण आठ

कर, फी व इतर मागण्या

३० कर आकरणी, कराची मागणी, कर वसुली व लेखे.

३१ कर व फी यांची आकरणी.

३२ जमिनी व इमारती यांवरील कर.

३३ इतर कर व फी वसुलीचा हिशोब.

३४ कर आणि फी परतावा.

३५ कोंडवाडा.

३६ कर व फी खेरीज इतर किरकोळ मागण्या.

३७ लेख्याचा मासिक व वार्षिक गोषवारा.

प्रकरण नऊ

अनुदाने

३८ प्राप्त झालेली अनुदाने.

प्रकरण दहा

आस्थापना, वेतन व भत्ते

३९ सेवाशर्ती.

4० कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते.

४१ वेतनवाढ

४२ चंतन व भत्त्याचे देयक.

४३ प्रवास भत्ता.

प्रकरण अकरा

आकस्मिक व इतर खर्च

४४ आकस्मिक व इतर खर्च

४५ निविदा किंवा दरपत्रके.

४६ डाक मुद्रांक.

४७ उपभोग्य वस्तूंची खरेदी.

४८ दूरध्वनी नोंदवही.

प्रकरण बारा

बांधकामे

४९ बांधकामे व बांधकामांचे लेखे.

५० तांत्रिक जबाबदारी व मार्गदर्शन.

५१ बांधकामांना प्रशासकीय मंजुरी.

५२ तांत्रिक मंजुरी.

५३ बांधकामाच्या कार्यवाही संबंधातील सर्वसाधारण तत्वे.

५४ बांधकामे कार्यान्वित करण्याच्या पद्धती.

५५ कामगारांचा / मजुरांचा हजेरीपट

५६ निविदा मागवून बांधकाम सुरू करणे.

५७ मान्य विनिर्देशनानुसार कामे पार पाडणे.

५८ कामाचे लेखे.

५९ मोजमाप पुस्तक ठेवणे.

६० रोजंदारीवर केलेल्या कामासाठी हजेरीपत्रक.

६१ कंत्राटदाराचे देयक तयार करणे व त्याचे प्रदान करणे.

प्रकरण – तेरा

ग्रामपंचायत निधीमधून केलेल्या कामाव्यतिरिक्त इतर विविध विकास योजना

६२ इतर विकास योजनांसाठी अनुसरावयाची कार्यपद्धती.

प्रकरण चौदा

अग्रिम ठेवी, परतावे

६३ अग्रिम देणे.

६४ अग्रिम देताना अनुसरावयाची कार्यपद्धती.

६५ स्थायी अग्रिमे.

६६ प्रतिभूती ठेव.

प्रकरण पंधरा

पंचायतीची मालमत्ता

६७ स्थावर मालमत्ता नोंदवही.

६८ रस्त्याची नोंदवही.

६९ जमिनीची नोंदवही.

७० झाडांची नोंदवही.

७१ इतर मालमत्तांपासून मिळणारे उत्पन्न.

प्रकरण सोळा

ग्रामपंचायतीकडे सोपविलेल्या योजना

७२ पंचायतीकडे सोपविलेल्या योजना.

प्रकरण सतरा

लेखापरीक्षा, आक्षेप व अनुपालन

७३ लेखापरीक्षा, आक्षेप व अनुपालन

७४ पंचायतींचा पैसा किंवा भांडार यांसंबंधातील अफरातफर किंवा नुकसान याबाबत प्रतिवृत्त देणे

प्रकरण अठरा

संकीर्ण

७५ निर्लेखित करणे.

७६ पंचायतीच्या अभिलेख्यांची वर्गवारी व परीरक्षण आणि नाशन.

७७ रास्त भावाचे दुकान.

७८ उपसरपंचाचे कर्तव्य.

७९ सरपंचाचे प्रशासकीय कर्तव्य.

८० प्रशासकीय निरीक्षणे

परिशिष्ट-१

१ पंचायत सचिवांची कर्तव्ये

परिशिष्ट-२

२ सरपंचाची कर्तव्ये

परिशिष्ट-३

3 वित्तीय अधिकार

परिशिष्ट-४

४ पंचायतीचा सखोल तपासणीचा नमुना

परिशिष्ट-५

५ प्रतिभूती बंधपत्राचा नमुना

नमुने

१ अर्थसंकल्प

२ पुनर्विनियोजन व नियतवाटप

३ ग्रामपंचायत जमा व खर्च

४ पंचायतीचे भत्ते व दायित्त्वे

५ सामान्य रोकड वही

५ क दैनिक रोकड वही

६ वर्गीकृत नोंदवही

७ सामान्य पावती

८ कर आकारणी नोंदवही

९ कर मागणी नोंदवही

९ क कराची मागणी पावती

१० कर व फी बाबत पावती

११ किरकोळ मागणी नोंदवही

१२आकस्मिक खर्चाचे प्रमाणक

१३ कर्मचारी वर्गाची सूची व वेतनश्रेणी नोंदवही

१४ मुद्रांक हिशेब नोंदवही

१५ उपभोग्य वस्तूसाठी नोंदवही

१६ जडवस्तु संग्रह व जंगम मालमत्ता नोंदवही

१७ अग्रीम दिलेल्या/अनामत रकमा ठेवलेली नोंदवही

१८ किरकोळ रोकड वही

१९ कामावर असलेल्या व्यक्तीचा हजेरीपट

२० कामाच्या अंदाजाची नोंदवही

२० क मोजमाप वही

२० ख कामाचे देयक

२० ख-१ कामाचे देयक

२१ कर्मचा-यांच्या देयकाची नोंदवही

२२ स्थावर मालमत्ता नोंदवही

२३ ताव्यातील रस्त्यांची नोंदवही

२४ जमीनीची नोंदवही

२५ गुंतवणूक नोंदवही

२६ क जमा व खर्चाचे मासिक बिबरण

२६ ख वर्षाचे मासिक खचांचे विवरण

२७ लेखा परीक्षणातील आक्षेपांच्या पूर्ततेचे मासिक विवरण

२८ मागासवर्गीयांसाठी १५% व महिला बालकल्याण १०% करावयाचे खर्चाचे मासिक विवरण.

२९ कर्जाची नोंदवही

३०ग्रामपंचायत लेखा परीक्षण आक्षेप पूर्तता नोंदवही

३१ प्रवासभत्ता देयक

३२ रकमेच्या परताव्यासाठीचा आदेश

३३ वृक्ष नोंदवही

महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता २०११ चे सविस्तर पुस्तकाचे विवरण खालील प्रमाणे

महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता २०११

अधिसूचना

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ (सन १९५१ चा मुंबई अर्थिनयम क्रमांक तीन) च्या कलम १७६ च्या पोट-कलम (१) व पोट-कलम (२) च्या खंड (सोळा), (सब्बीस), (एक्केचाळीस) व (सत्तेचाळीस) याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा यापूर्वी या संदर्भात करण्यात आलेल्या नियमांना व आदेशांना अधिक्मत करून आणि त्याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन ग्रामपंचायतोंचे लेखे ठेवण्यासंदर्भात खालील नियम करीत आहे. त्या नियमांचा पुढील मसुदा त्याद्वारे बाधा पोहोचण्याचा संबंध असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी उक्त कलम १७६ चे पोट-कलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे याद्वारे प्रसिद्ध करण्यात आला आहे.

प्रकरण – एक

प्रारंभिक

१. (१) या नियमास. महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता, २०११ असे म्हणावे. संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ

   (२) हे नियम तात्काळ अंमलात येतील.

२. या संहितेत, संदर्भानुसार, दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर                व्याख्या

(क) ” अधिनियम” याचा अर्थ, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ (सन १९५१ चा मुंबई अधिनियम क्रमांक तीन), असा आहे;

(ख) परिशिष्ट” याचा अर्थ, या नियमांना जोडलेले परिशिष्ट, असा आहे;

(ग) लेखापरीक्षक” याचा अर्थ अधिनियमाचे कलम ३. उप खंड (अ-२) अन्वये नियुक्त केलेला लेखापरीक्षक, असा आहे;

(घ) “बैंक” याचा अर्थ राष्ट्रीयकृत बैंक, अनुसूचित बैंक, डाक बचत खाते, शासनाने वेळोवेळी प्राधिकृत केलेली सहकारी बैंक असा आहे:

(ड) “मुख्य लेखापरीक्षक” याचा अर्थ, मुख्य लेखापरीक्षक, स्थानिक निधी, सहमुख्य लेखा परीक्षक, आणि उपमुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी असा आहे, आणि त्यात या सर्वांचा समावेश होतो;

(च) “अभियंता” याचा अर्थ, ग्रामपंचायतीची बांधकामे सोपविलेला जिल्हा परिषदेचा शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, उप अभियंता व कार्यकारी अभियंता असा आहे;

(छ) “नमुना” याचा अर्थ, या संहितेला जोडलेला नमुना असा आहे

(ज) “शासन” याचा अर्थ, महाराष्ट्र शासन, असा आहे;

(झ) ” आवर्ती खर्च” पाचा अर्थ, मूलतः ज्या वित्तीय वर्षात एखाद्या खचर्चाला मंजूरी देण्यात आली असेल त्या वर्षानंतर ज्याचे दाँवत्व सतत चालू राहील, असा आहे;

(ञ) “सरपंच व उप सरपंच” याचा अर्थ, अधिनियमाचे कलम ३. खंड (१७) अन्वये नेमणूक झालेली व्यक्ती असा आहे;

(ट) “सचिव” याचा अर्थ, अधिनियमाचे कलम ३, खंड (२०) अन्वये त्या पदावर नियुक्त केलेली व्यक्ती असा आहे;

(ठ) ” वर्ष” याचा अर्थ, वित्तीय वर्ष, असा आहे;

(ड) “ग्रामनिधी” याचा अर्थ, अधिनियमाचे कलम ५७ अन्वये घटित केलेला निधी, असा आहे:

(ढ) या नियमात वापरण्यांत आलेले परंतु व्याख्या न केलेले शब्द व वाक्यप्रयोग यांना अधिनियमात जे अर्थ नेमून दिलेले असतील अनुक्रमे तेच त्यांचे अर्थ असतील.

प्रकरण दोन          

सर्वसाधारण तत्वे

ग्रामपंचायतीचे लेखे व वित्तीयअभिलेख ठेवणे.

३ पंचायतीचे लेखे व वित्तीय अभिलेख यात खाली विहित करण्यांत आलेल्या नमुन्यात व नोंदवहीमध्ये ठेवण्यांत येतील. हे अभिलेख पोग्य रीतीने व अचूक ठेवले जात आहेत आणि ते अदयावत आहेत याबाबत खात्री करण्याची जबाबदारी संबंधित सरपंच व पंचायत यांची असेल.

संहितेमध्ये विहित केलेल्नोंया नोदवहीत किंवा नमुन्यात भर घालणे फेरफार करणे किंवा फेरबदल करणे

४. ग्रामपंचायत, राज्य शासनाच्या पूर्व मंजूरीशिवाय संहितेमध्ये विहित करण्यांत आलेल्या किंवा समाविष्ट केलेल्या कोणत्याही नोंदवहीत किंवा नमुन्यात कोणतीही भर घालणार नाही, फेरफार करणार नाही किंवा फेरबदल करणार नाही.  

परंतु, ग्रामपंचायतीच्या लेख्यांच्या संगणकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये. या सहितेखालील नमुन्यामध्ये, कोणतेही महत्वाचे बदल न करता आवश्यक फेरफार करता येतील

लेखा पुस्तकांना सहाय्यकारी नोदवाह्या ठेवणे

५. ग्रामपंचायतीस प्रशासकीय कामाच्या सोईकरिता, या संहितेत विहित करण्यात आलेल्या लेखा पुस्तकांना सहाय्यकारी अशा नोदयक्षा ठेवता येतील. परंतु, अशा नोंदवहयांना संहितेमध्ये विहीत करण्यात आलेल्या लेखा नोंदवह्या म्हणून मान्यता दिली जाणार नाही.

मुख्य लेखापरीक्षकांचे. मार्गदर्शन,

६. मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी यांना कोणत्याही पंचायतीला, तिच्या विनंतीवरुन आवश्यक असे तपशीलवार मार्गदर्शन करता येईल

प्रकरण तीन

सर्वसाधारण वित्तीय तत्वे

७. (१) ग्रामपंचायत, अधिनियम व त्याखाली वेळोवेळी करण्यात आलेले नियम यामध्ये नमूद केलेल्या प्रयोजनाकरिता ग्रामनिधीचा वापर प्रामनिधीया विनियोग. करील.

(२) ग्रामनिधीचा वापर काटकसरीने, योग्य प्रकार व शिस्तबध्द रीतीने करणे हे ग्रामपंचायत, सरपंच व सचिव यांचे कर्तव्य असेल.

(३) ग्रामपंचायतीच्या व्यवहारात अंतर्भूत असलेल्या रुपयाच्या अपूर्णाकांचे पूर्णाकांत रुपांतर करण्यांत येईल.

स्पष्टीकरण. ५० पैशापेक्षा कमी असलेला भाग सोडून देण्यात येईल आणि ५० पैशांपेक्षा अधिक असलेल्या भागाचे पुढील पूर्ण रुपयात रुपांतर करण्यात येईल.

८. कोणताही खर्च:-

(क) आवश्यक असेल तेथे, सक्षम प्राधिकाऱ्यांकडून प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी मिळवली असल्याशिवाय,

ग्रामनिधीतून करावयाचा खर्च.

(ख) केलेल्या खांबाबत व आवश्यक खर्चाबाबत, अर्थसंकल्पामध्ये आवश्यक तेवढ्या रक्कमेची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली असल्याखेरीज,

(ग) वित्तीय औचित्याच्या सूत्रांचे अनुपालन करण्यात आले असल्याखेरीन ग्रामनिधीमधून खर्च करण्यात येणार नाही.

ग्राम निधीमधून खर्च करीत असेल किंवा खर्च प्राधिकृत करीत असेल अशा प्राधिकाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला वित्तीय औचित्याच्या

वित्तीय औचित्याची सूत्रे.

९ उच्च मानकाद्वारे मार्गदर्शन करण्यात यावे. प्रत्येक अधिकारी वित्त विषयक शिस्त पाळील आणि प्रत्येक टप्प्यावर अत्यंत काटकसरीचा अवलंब करोल आणि सर्व संबंधित वित्तीय नियमांचे व विनियमांचे पालन करण्यात येत आहे हे पाहील.

ज्या तत्वावर सर्वसाधारणपणे भर देण्यात येईल ती तत्वे पुढीलप्रमाणे आहेत :-

(एक) सर्वसाधारण समंजस व्यक्ती स्वतःच्या खर्चाच्या बाबतीत जी दक्षता व सावर्धागरी घेईल तोच दक्षता व सावर्धागरी, प्रत्येक अधिकाऱ्याने ग्राम निधीमधून करावयाच्या खर्चाच्या संबंधात घेणे अपेक्षित आहे.

(दोन) अत्यंत आवश्यक असेल तेव्हाच खर्च करण्यात यावा.

(तीन) कोणताही प्राधिकारी, प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे त्याच्या स्वतःच्या फायद्यासाठी असेल असा खर्च मंजुरीचा आदेश संमत करण्याकरिता आपल्या अधिकाराचा वापर करणार नाही.

(चार) पंचायतीने कोणतेही कर्ज उभारले असेल तर ज्या प्रयोजनासाठी ते उभारण्यात आले असेल त्याच प्रयोजनासाठी त्याचा वापर करण्यात येईल. अशा कर्जाची परतफेड करण्याकरिता अर्थसंकल्पामध्ये आवश्यक तरतूद करणे पंचायतीवर बंधनकारक असेल.

(पाच) कोणतेही कंत्राट मान्य करताना किंवा साहित्याची कोणतीही खरेदी करताना, ते कंत्राट किंवा खरेदी ही, लोकांच्या हिताची आहे हे पाहणे संबंधित अधिकाऱ्यांचे किंव् पदाधिकाऱ्यांचे कर्तव्य असेल आणि त्या प्रयोजनासाठी ते पुढील गोष्टींचे पालन करतील:-

(क) योग्य व रीतसर निविदा प्राप्त झाल्यानंतर ते स्पर्धात्मक दरांचा तक्ता तयार करतील.

(ख) खरोखरच आवश्यक असेल आणि पंचायतीच्या गरजांची समाधानकारकरीत्या पूर्तता ते साहित्य करीत असेल तरच अधिकारी साहित्याची खरेदी करतील.

(ग) पुरविलेल्या साहित्याचे प्रमाण, दर्जा व कालावधी विचारात घेता. साहित्याचे दर कमी व वाजवी असतील.

पंचायतीचे लेखे

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

19823

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare.