Thursday, July 24, 2025
Thursday, July 24, 2025
Home » महाराष्ट्र विकास सेवा: विभागीय संवर्ग वाटप

महाराष्ट्र विकास सेवा: विभागीय संवर्ग वाटप

0 comment

महाराष्ट्र शासकीय गट अ व गट ब पदांवर सरळसेवेने व पदोन्नती नियुक्ती म वि विभाग वाटप ग्रामविकास विभाग, शासन निर्णय दिनांक14 07 2021

६. महसूल विभाग वाटप करताना अनुसरावयाची कार्यपध्दतीः- गट "अ" व गट "ब" मधील पदांवर सरळसेवेद्वारे
आणि पदोन्नतीद्वारे विहित कार्यपध्दतीनुसार नियुक्ती करताना, सदर नियमावली नुसार पुढीलप्रमाणे कार्यपध्दतीचा अवलंब करुन महसूल विभाग वाटप करण्यात येईल.
अ.क्र. (१)
महसूल विभाग वाटपाचे टप्पे (२)
(१)महसूल विभाग वाटपासाठी पात्र उमेदवार/अधिकाऱ्यांची पदसंख्या :-
(क) सरळसेवेने नियुक्तीकरिता, यथास्थिती, आयोग किंवा निवडसमिती यांच्याकडून प्राप्त शिफारस किंवा गुणवत्ता यादी नुसार प्रत्यक्ष रुजू होणाऱ्या व नियुक्तीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांची संख्या म्हणजेच महसूल विभाग वाटपासाठी पात्र उमेदवारांची पदसंख्या होय.
(ख) पदोन्नतीने नियुक्तीकरिता, निवडसूचीनुसार उपलब्ध अधिकाऱ्यांची संख्या म्हणजेच महसूल विभाग वाटपासाठी पात्र अधिकाऱ्यांची पदसंख्या होय.
(२)रिक्त पदांची संख्या :- महसूल विभाग वाटपाच्या वेळेस, नियम ५ नुसार महसूल विभाग निहाय निश्चित केलेल्या मंजूर पदांपैकी प्रत्यक्षात भरलेली पदे वगळून महसूल विभाग निहाय रिक्त पदे.
(३)गुणवत्तायादी/ निवडसूचीतील संबंधित अधिकाऱ्यांना कळविण्याच्या बाबी :-
(क) नियम ६(१) नुसार महसूल विभाग वाटपासाठी अधिकाऱ्यांची पदसंख्या
(ख) नियम ६(२) नुसार महसूल विभाग निहाय रिक्त पदांची संख्या
(ग) वाटप करण्यासाठी उपलब्ध असणारी पदे ही महसूल विभागनिहाय रिक्त पदांच्या समप्रमाणात वाटप करण्यात येतील.
(घ) संबंधित अधिकाऱ्यांकडून केवळ एकाच महसूल विभागाची पसंती मागविण्यात येईल.
(ङ) संबंधित अधिकाऱ्यांकडून अशी पसंती मागविताना नियम ७ नुसार त्यांना महसूल विभाग वाटपातून सूट अनुज्ञेय आहे किंवा कसे याची माहिती मागविण्यात येईल. जर सूट अनुज्ञेय असेल तर त्या बाबतचे कारण व त्या पुष्ट्यर्थ कागदपत्रेही संबंधितांकडून मागविण्यात येईल.
(४)महसूल विभागनिहाय वाटप करावयाच्या पदांची संख्या निश्चित करणे :-
(क) वाटपामधून सूट दयावयाची प्रकरणे सर्वप्रथम नियम ७ नुसार महसूल विभाग वाटपातून सूट अनुज्ञेय असणाऱ्या अधिकाऱ्यांना, त्यांनी पसंती दिलेला महसूल विभाग वाटप करण्यात येईल.
(ख) वाटप करावयाच्या पदांची संख्या निश्चित करणे उपरोक्त नियम ६ (१) नुसार महसूल विभाग वाटपासाठी पात्र उमेदवार/अधिकाऱ्यांच्या पदसंख्येतून वरील नियम ६(४) (क) नुसार सूट द्यावयाच्या पदांची संख्या वजा केल्यानंतर जी पदे शिल्लक राहतात ती पदे म्हणजे वाटप करावयाच्या पदांची संख्या होय.
(ग) महसूल विभाग निहाय शिल्लक रिक्त पदांची संख्या निश्चित करणे- उपरोक्त नियम ६(२) नुसार महसूल विभागनिहाय रिक्त पदांच्या संख्येतून, नियम ६ (४) (क) नुसार सूट दिलेल्या प्रकरणांची महसूल विभाग निहाय पदांची संख्या वजा करुन, महसूल विभाग निहाय शिल्लक रिक्त पदांची संख्या निश्चित येईल.
(घ) वाटप करावयाची पदे महसूल विभागनिहाय शिल्लक रिक्त पदांच्या समप्रमाणात निश्चित करणे वरील नियम ६(४) (ख) नुसार वाटप करावयाची पदे, ही उपरोक्त नियम ६ (४) (ग) नुसार महसूल विभाग निहाय रिक्त पदांच्या समप्रमाणात वाटप करण्यासाठी निश्चित करण्यात येतील.
(५)
महसूल विभाग निहाय वाटपाची कार्यवाही- उपरोक्त नियम ६(४) नुसार, महसूल विभागनिहाय वाटप करावयाच्या पदांची संख्या निश्चित झाल्यानंतर खालीलप्रमाणे महसूल विभाग निहाय वाटपाची कार्यवाही करण्यात येईल.
(क) पसंतीनुसार महसूल विभाग वाटप वरील नियम ६ (४) (घ) नुसार महसूल विभागनिहाय रिक्त पदांच्या समप्रमाणात वाटपासाठी निश्चित केलेल्या पदसंख्येच्या मर्यादेत, गुणवत्ता यादीतील क्रमानुसार / निवडसूचीतील क्रमानुसार अधिकाऱ्यांची पसंती विचारात घेऊन महसूल विभाग वाटप करण्यात येईल.
(ख) चक्राकार पध्दतीने महसूल विभाग वाटप वरील नियम ६ (५) (क) नुसार कार्यवाही केल्यानंतर, ज्या अधिकाऱ्यांनी पसंती दिलेल्या महसूल विभागात वाटपासाठी पद उपलब्ध नसेल, अशा अधिकाऱ्यांना वाटपासाठी शिल्लक राहिलेल्या महसूल विभागांमध्ये चक्राकार पध्दतीने महसूल विभाग वाटप करण्यात येईल. चक्राकार पध्दतीने विभाग वाटप करताना त्याची क्रमवारी नागपूर, अमरावती, औरंगाबाद, कोकण-१, नाशिक, कोकण-२, पुणे अशी राहील. या क्रमवारीनुसार अधिकाऱ्यांना त्यांच्या गुणवत्ता यादी/निवडसूचीतील क्रमानुसार प्रत्येकी एक महसूल विभाग वाटप करण्यात येईल.
(६)महसूल विभागांतर्गत पदस्थापना देणे महसुल विभाग वाटपानुसार, संबंधित महसूल विभागातील निरनिराळ्या जिल्हयातील रिक्त पदे विचारात घेऊन प्रशासकीय विभाग पदे भरण्याचे प्राधान्य ठरवेल. महसूल विभागांतर्गत पदस्थापना करताना, प्रशासकीय विभाग नियम ९ येथील निकष विचारात घेतल्याची खातरजमा करेल.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........

महाराष्ट्र शास गट अ व गट ब पदांवर सरळसेवेने व पदोन्नती नियुक्तीसाठी महसूली विभाग ग्रामविकास विभाग, शासन निर्णय दिनांक १५-०६-२०१७

"६. नियम ५ नुसार निश्चित केलेल्या पदांवर नियुक्ती देताना महसूली विभागाचे वाटप पुढीलप्रमाणे करण्यात येईल:-
(अ) सरळसेवेने नियुक्तीकरिता.-
(१) गट "अ" व गट "ब" पदावर सरळसेवेने नियुक्तीकरिता, यथास्थिती, आयोग किंवा निवड समिती यांच्याकडून शिफारस किवा गुणवत्ता यादी प्राप्त झाल्यावर, विहित प्रमाणपत्रे व अन्य कागदपत्रांची पडताळणी करून, शिफारस किंवा गुणवत्तावादीनुसार महसुली विभाग वाटपासाठी उपलब्ध उमेदवारांची यादी तयार करावी त्यानंतर, वाटपाच्या वेळी महसूल विभागनिहाय रिक्त पदांची संख्या सर्व उमेदवारांना कळवून, नियुक्तीच्या अनुषंगाने त्यांच्याकडून नागपूर, अमरावती, औरंगाबाद, कोकण विभागाचा भाग असलेला कोकण-१, नाशिक, कोकण विभागाचा भाग असलेला कोकण-२, पुणे या पैकी कोणत्याही एकाच महसुली विभागाची पसंती घेण्यात यावी. तसेच, नियम ७ नुसार प्रकरण येत असल्यास, त्याबाबतचीही माहिती घेण्यात यावी.
(२) गुणवत्ता यादीतील नियम ७ नुसार विहित केलेल्या प्रकरणातील उमेदवारांना, त्यांनी पसंती दिलेल्या महसुली विभागात पद रिक्त असल्यास त्यांना प्रथम त्यांच्या सोयीचा महसुली विभाग वाटप करावा.
(३) उपरोक्त उपखंड (२) नुसार महसुली विभाग वाटप केल्यानंतर, नागपूर, अमरावती व औरंगाबाद महसुली विभागातील मंजूर पदांच्या ८० टक्के इतकी पदे भरण्यासाठी, आवश्यक असलेल्या पदांची संख्या निश्चित करावी.
(४) (i) वरील उपखंड (२) प्रमाणे पदे भरण्यासाठी आवश्यक असलेली पद संख्या व उपखंड (३) प्रमाणे तीन महसुली विभागात पदे भरण्यासाठी आवश्यक असलेली पद संख्या, यथास्थिती, आयोग किंवा निवड समिती यांच्याकडून प्राप्त झालेल्या शिफारस किंवा गुणवत्ता यादी पैकी एकूण वाटपासाठी उपलब्ध असलेल्या उमेदवारांच्या पदसंख्येतून वजा करण्यात यावी, त्यानंतर वाटपासाठी उपलब्ध असलेल्या उर्वरित पदसंख्येच्या ८० टक्के पदे पाच महसुली विभागांसाठी म्हणजे नागपूर, अमरावती, औरंगाबाद, कोकण विभागाचा भाग असलेला कोकण १ व नाशिक या महसुली विभागांकरिता सुनिश्चित करण्यात यावी आणि २० टक्के पदे दोन महसुली विभागांसाठी म्हणजे कोकण विभागाचा भाग असलेला कोकण २ व पुणे या महसुली विभागांसाठी सुनिश्चित करण्यात यावी.
(ii) वरील उपखंड (i) प्रमाणे उर्वरित वाटपासाठी उपलब्ध पदसंख्येच्या ८० टक्के पदे नागपूर, अमरावती, औरंगाबाद, कोकण विभागाचा भाग असलेला कोकण-१ व नाशिक या महसुली विभागांकरिता सुनिश्चित केल्यानंतर, या पाच महसूली विभागांतील रिक्त पदांच्या प्रमाणात (Proportionately) या पाच महसुली विभागात वाटप करण्यात यावे. तसेच, उर्वरित वाटपासाठी उपलब्ध पदसंख्येच्या २० टक्के पदे कोकण विभागाचा भाग असलेला कोकण २ व पुणे या महसुली विभागांकरिता सुनिश्चित केल्यानंतर, वा दोन महसुली विभागांतील रिक्त पदांच्या प्रमाणात (Proportionately) या दोन महसुली विभागात वाटप करण्यात यावे.
(५) नियम ७ नुसार सूट दिलेली प्रकरणे वगळून, उर्वरित उमेदवारांना त्यांनी दिलेल्या पसंतीनुसार, महसुली विभागात वाटपासाठी उपलब्ध पदांच्या मर्यादित, आयोग किंवा निवड समिती यांच्याकडून प्राप्त झालेल्या शिफारस किंवा गुणवत्ता यादीतील क्रमांकानुसार, महसुली विभाग वाटप करण्यात यावे.
(६) उपरोक्त उपखंड (५) नुसार महसुली विभाग वाटप केल्यानंतर, उमेदवारांनी पसंती दिलेल्या महसुली विभागात वाटपासाठी पद उपलब्ध नसल्यास, अशा शिफारस किंवा गुणवत्ता यादीतील उर्वरित उमेदवारांना, त्यांच्या गुणवत्ता यादीतील क्रमांकानुसार, सर्व महसुली विभागातील वाटपासाठी उपलब्ध उर्वरित रिक्त पदे विचारात घेऊन, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, कोकण विभागाचा भाग असलेला कोकण १, नाशिक, कोकण विभागाचा भाग असलेला कोकण-२ व पुणे महसुली विभाग या क्रमाने चक्राकार पध्दतीने महसूली विभाग वाटप करण्यात यावे.
(७) वाटप केलेल्या महसुली विभागामधील जिल्ह्यांतील रिक्त पदे, अनुसूचीमध्ये महसूली विभागासमोर दर्शविलेल्या जिल्ह्यांच्या क्रमवारीनुसार भरली जातील याची प्रशासकीय विभाग दक्षता घेईल.
परंतु असे की, प्रशासकीय विभागास प्राचम्याने फक्त अनुसूचीत क्षेत्रातील रिक्त पदे भरण्याची आवश्यकता असल्यास, सर्व प्रथम अनुसूचीत क्षेत्रात रिक्त पदे असलेले महसुली विभाग, उमेदवारांना त्यांनी दिलेल्या पसंतीनुसार महसुली विभागात वाटपासाठी उपलब्ध पदांच्या अधीन राहून आयोग किंवा निवडसमिती यांच्याकडून प्राप्त झालेल्या शिफारस किंवा गुणवत्ता यादीतील क्रमांकानुसार वाटप करण्यात यावे. उमेदवारांनी पसंती दिलेल्या महसुली विभागात अनुसूचीत क्षेत्रातील रिक्त पदे नसल्यास, अशा शिफारस किंवा गुणवत्ता यादीतील उमेदवारांना, त्यांच्या गुणवत्ता यादीतील क्रमांकानुसार, अनुसूचीत क्षेत्रात रिक्त पदे असलेले उर्वरित महसुली विभाग नागपूर, अमरावती, औरंगाबाद, कोकण विभागाचा भाग असलेला कोकण-१, नाशिक, कोकण विभागाचा भाग असलेला कोकण-२ व पुणे महसुली विभाग या क्रमाने चक्राकार पद्धतीने वाटप करण्यात यावे. अनुसूचीत क्षेत्रातील रिक्त पदे भरल्यानंतर गुणवत्ता यादीतील उर्वरित उमेदवारांना या नियमाच्या वरील खंड (अ) प्रमाणे महसुली विभाग वाटप करावा.
(व) पदोन्नतीने नियुक्तीकरिता.-
(१) गट "अ" व गट "ब" पदावर पदोन्नतीने नियुक्तीकरिता, महसुली विभाग वाटपासाठी उपलब्ध अधिकाऱ्यांची यादी तयार करावी. त्यानंतर, वाटपाच्या वेळी महसूल विभागनिहाय रिक्त पदांची संख्या निवडसूचीतील सर्व अधिकाऱ्यांना कळवून, नियुक्तीच्या अनुषंगाने त्यांच्याकडून नागपूर, अमरावती, औरंगाबाद, कोकण विभागाचा भाग असलेला कोकण १, नाशिक, कोकण विभागाचा भाग असलेला कोकण-२, पुणे या पैकी कोणत्याही एकाच महसुली विभागाची पसंती घेण्यात यावी. तसेच, नियम ७ नुसार प्रकरण येत असल्यास, त्याबाबतचीही माहिती घेण्यात यावी.
(२) निवड यादीतील नियम ७ नुसार विहित केलेल्या प्रकरणातील अधिकाऱ्यांना, त्यांनी पसंती दिलेल्या महसुली विभागात पद रिक्त असल्यास त्यांना प्रथम त्यांच्या सोयीचा महसुली विभाग वाटप करावा.
(३) उपरोक्त उपखंड (२) नुसार महसुली विभाग वाटप केल्यानंतर, नागपूर, अमरावती व औरंगाबाद महसुली विभागातील मंजूर पदांच्या ८० टक्के इतकी पदे भरण्यासाठी, आवश्यक असलेल्या पदांची संख्या निश्चित करावी.
(४) (1) वरील उपखंड (२) प्रमाणे पदे भरण्यासाठी आवश्यक असलेली पदसंख्या व उपखंड (३) प्रमाणे तीन महसुली विभागात पदे भरण्यासाठी आवश्यक असलेली पदसंख्या, निवडयादीतील एकूण वाटपासाठी उपलब्ध असलेल्या अधिकाऱ्यांच्या पदसंख्येतून वजा करण्यात यावी. त्यानंतर वाटपासाठी उपलब्ध असलेल्या उर्वरित पदसंख्येच्या ८० टक्के पदे पाच महसुली विभागांसाठी म्हणजे नागपूर, अमरावती, औरंगाबाद, कोकण विभागाचा भाग असलेला कोकण-१ व नाशिक या महसुली विभागांकरिता सुनिश्चित करण्यात यावी आणि २० टक्के पदे दोन महसुली विभागांसाठी म्हणजे कोकण विभागाचा भाग असलेला कोकण-२ व पुणे या महसुली विभागांसाठी सुनिश्चित करण्यात यावी.
(ii) वरील उपखंड (i) प्रमाणे उर्वरित वाटपासाठी उपलब्ध पदसंख्येच्या ८० टक्के पदे नागपूर, अमरावती, औरंगाबाद, कोकण विभागाचा भाग असलेला कोकण-१ व नाशिक वा महसूली विभागांकरिता सुनिश्चित केल्यानंतर, या पाच महसुली विभागांतील रिक्त पदांच्या प्रमाणात (Proportionately) या पाच महसुली विभागात वाटप करण्यात यावे. तसेच, उर्वरित वाटपासाठी उपलब्ध पदसंख्येच्या २० टक्के पदे कोकण विभागाचा भाग असलेला कोकण २ व पुणे या महसूली विभागांकरिता सुनिश्चित केल्यानंतर, या दोन महसुली विभागांतील रिक्त पदांच्या प्रमाणात (Proportionately) या दोन महसुली विभागात वाटप करण्यात यावे.
(५) नियम ७ नुसार सूट दिलेली प्रकरणे वगळून, उर्वरित अधिकाऱ्यांना त्यांनी दिलेल्या पसंतीनुसार, महसुली विभागात वाटपासाठी उपलब्ध पदांच्या मर्यादेत, निवड यादीतील क्रमांकानुसार, महसुली विभाग वाटप करण्यात यावे.
(६) उपरोक्त उपखंड (५) नुसार महसुली विभाग वाटप केल्यानंतर, अधिकाऱ्यांनी पसंती दिलेल्या महसुली विभागात वाटपासाठी पद उपलब्ध नसल्यास, अशा निवडयादीतील उर्वरित अधिकाऱ्यांना, त्यांच्या निवडयादीतील क्रमांकानुसार, सर्व महसुली विभागातील वाटपासाठी उपलब्ध उर्वरित रिक्त पदे विचारात घेऊन, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, कोकण विभागाचा भाग असलेला कोकण-१, नाशिक, कोकण विभागाचा भाग असलेला कोकण-२ व पुणे महसुली विभाग या क्रमाने चक्राकार पध्दतीने महसुली विभाग वाटप करण्यात यावे.
(७) वाटप केलेल्या महसुली विभागामधील जिल्ह्यांतील रिक्त पदे, अनुसूचीमध्ये महसुली विभागासमोर दर्शविलेल्या जिल्हयांच्या क्रमवारीनुसार भरली जातील याची प्रशासकीय विभाग दक्षता घेईल.
परंतु असे की, एका निवडसूचीत समाविष्ट असलेले परंतु गोपनीय अहवालाअभावी, जातवैधता प्रमाणपत्र प्राप्त नसल्याने आणि विभागीय चौकशी चालू असल्याने किंवा न्यायालयीन कार्यवाही सरू असल्याने खुल्या ठेवलेल्या प्रकरणातील अधिकारी वगळून उर्वरित अधिकाऱ्यांना एकाचवेळो महसुली विभाग वाटप करण्यात यावे. अशाप्रकारे वगळण्यात आलेल्या प्रकरणी, अंतिम निर्णयानंतर त्यांना स्वतंत्रपणे महसुली विभाग वाटप करण्यात यावे.
या नियमाच्या खंड (अ) व (ब) मधील कार्यपद्धतीनुसार महसुली विभाग वाटप करण्यासाठी स्पष्टीकरणात्मक उदाहरण या नियमास जोडलेल्या परिशिष्टामध्ये देण्यात आले आहे.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........

महाराष्ट्र शासकीय गट अ व गट ब पदांवर सरळसेवेने व पदोन्नती नियुक्ती म वि वाटप ग्रामविकास विभाग, शासन निर्णय दिनांक २८-०४-२०१५

६ सरळसेवा कोट्याच्या व पदोन्नती कोट्याच्या पदांवर नियुक्ती देताना सहा महसुली विभागांतील वाटप पुढीलप्रमाणे करण्यात येईल :-
(अ) गट “अ” व गट “ब” पदावर सरळसेवेने नियुक्तीकरिता, यथास्थिती, आयोग किंवा निवडसमिती यांच्याकडून शिफारस किंवा गुणवत्ता यादी प्राप्त झाल्यावर, विहित प्रमाणपत्रे व अन्य कागदपत्रांची पडताळणी झाल्यावर, प्रत्यक्ष महसुली विभाग वाटप करण्यात येईल त्यावेळेस त्या संवर्गात सरळसेवा कोट्यातील एकूण रिक्त पदांची संख्या विचारात घेऊन, गुणवत्ता यादीतील क्रमांकानुसार अनुसूचीमध्ये नमूद केल्याप्रमाणे नागपूर, अमरावती, औरंगाबाद व नाशिक या क्रमानुसार चक्राकार पद्धतीने, महसुली विभाग वाटप करण्यात यावे. वा चारही महसुली विभागांतील सरळसेवा कोट्याची रिक्त पदे भरल्यानंतर गुणवचा यादीतील उर्वरित उमेदवारांना कोकण विभाग व पुणे विभाग या क्रमाने विभाग वाटप करावा.
(ब) गट “अ” व गट “ब” पदावर पदोन्नतीने नियुक्तीकरिता निवडसूचीत समावेश असलेल्या अधिका-याला प्रत्यक्ष महसुली विभाग वाटप करण्यात येईल त्यावेळेस त्या संवर्गात पदोन्नती कोट्यातील एकूण रिक्त पदांची संख्या विचारात घेऊन, त्याच्या संबंधित निवडसूचीतील क्रमांकानुसार, अनुसूचीमध्ये नमूद केल्याप्रमाणे नागपूर, अमरावती, औरंगाबाद व नाशिक या क्रमानुसार चक्राकार पद्धतीने, महसुली विभाग वाटप करण्यात यावे. या चारही महसुली विभागांतील पदोन्नती कोट्याची रिक्त पदे भरल्यानंतर निव्रडसूचीतील उर्वरित अधिकाऱ्यांना कोकण विभाग व पुणे विभाग या क्रमाने विभाग वाटप करावा :
परंतु असे की, निवडसूचीतील गोपनीय अहवाला अभावी खुली ठेवलेली, जातवैधता प्रमाणपत्र प्राप्त नसलेली आणि विभागीय चौकशी किंवा न्यायालयीन कार्यवाही चालू असलेली प्रकरणे वगळून उर्वरित अधिकाऱ्यांना एकाचवेळी महसुली विभाग वाटप करण्यात यावे, अशाप्रकारे वगळण्यात आलेल्या प्रकरणी अंतिम निर्णयानंतर स्वतंत्रपणे महसुली विभाग चाटप करण्यात यावे.
७ खालील प्रकरणे नियम ४ व ६ मधून वगळण्यात यावीत :-

  1. ज्या अधिकाऱ्यास विभाग वाटपाच्यावेळी सेवानिवृत्तीस १ वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे;
    II. जे अधिकारी स्वतः अपंग आहेत:
    III. ज्या अधिकान्याचा जोडीदार किंवा त्याचे मूल मतिमंद आहे:
    IV. ज्या रवी अधिकारी विधवा किंवा परित्यक्त्या आहेत,
    महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ. एप्रिल २८, २०१५/वैशाख ८, शके १९३७
    अशा प्रकरणी संबंधित प्रशासकीय विभागाने रिक्त पदांची उपलब्धता विचारात घेऊन, अशा अधिकाऱ्यास त्याच्या सोयीचा महसुली विभाग वाटप करावा,
    ८. (१) सरळसेवेने नियुक्त झालेल्या उमेदवारांच्या बाबतीत, –
    (अ) गट “अ” संवगांत नियुक्त झालेल्या उमेदवारांनी त्या महसुली विभागात किमान सहा वर्षे इतका सेवा कालावधी पूर्ण करणे आवश्यक राहील:
    (ब) तसेच, गट “ब” संवर्गात नियुक्त झालेल्या उमेदवारांनी त्या महसुली विभागात किमान नऊ वर्ष इतका सेवा कालावधी पूर्ण करणे आवश्यक राहील
    (२) वरीलप्रमाणे पदस्थापना दिल्यावर यथास्थिती सहा वर्षे अथवा नऊ वर्षे सेवा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी पुढील पदोन्नती मिळत असल्यास पदोन्नती नंतरही त्याच महसुली विभागात पदस्थापना करण्यात येईल:
    परंतु, पुढील पदोन्नतीच्यावेळी त्या महसुली विभागात पद उपलब्ध नसल्यास यथास्थिती सहा अथवा नऊ वर्षे सेवा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी पदोन्नतीने अन्य महसुली विभागात पदस्थापना देता येईल
    परंतु असे की, पद उपलब्ध नसल्याने त्या महसूली विभागात यथास्थिती सहा वर्षे अथवा नऊ वर्षे सेवा कालावधी पूर्ण झालेला नाही अशा अधिका-यांच्या बाबतीत उर्वरित कालावधीकरिता पुन्हा मूलतः वाटप झालेल्या महसुली विभागात पदोन्नतीने अथवा बदलीने पदस्थापना करता येईल:
  2. अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

महाराष्ट्र विकास सेवा गट अ व गट ब पदावर पदोन्नती ने नियुक्तीसाठी विभागीय संवर्ग वाटप नियमावली २०१० नुसार वाटप केलेला महसुली विभागीय संवर्ग बदलून देण्याबाबत तात्पुरती कार्यपद्धती ग्रामविकास विभाग, शासन निर्णय दिनांक 11-08-2014


दि. ३१.०७.२०१२ च्या शासन निर्णयामध्ये व संदर्भ क्र. ५ येथील दि.२६.११.२०१२ च्या शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या विभागीय संवर्ग बदलून देण्याबाबतच्या तात्पुरत्या कार्यपध्दतीमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.
(अ) विभागीय संवर्ग वाटप बदलून देण्याबाबतची कारणे : सामान्य प्रशासन विभागाच्या सहमतीने
विभागीय संवर्ग वाटप अंतिम केल्यावर, पसंतीक्रमानुसार विभागीय संवर्ग वाटप न झालेल्या अधिकारी /कर्मचाऱ्यांना खालील ९ नमुद कारणांपैकी कोणत्याही एका कारणास्तव विभागीय संवर्ग बदलून देण्यासाठी विनंती अर्ज करता येईल :-
(१) सेवानिवृत्तीस एक वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे.
(२) शासकीय अधिकारी / कर्मचारी स्वतः वा शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्याचे आई / वडील, यथास्थिती पती / पत्नी वा त्यांच्यावर पूर्णतः अवलंबून असलेला जवळचा नातेवाईक यांचे पुढील आजार.
१) हृदय शस्त्रक्रियांची प्रकरणे (Heart Surgery)
२) हृदय उपमार्ग शस्त्रक्रिया (Bypass Surgery)
३) अॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया
४) मुत्रपिंड प्रतिरोपण शस्त्रक्रिया (Kidney Transplantation)
५) सर्व प्रकारचे कर्करोग
६) किडनी डायलेसिस
७) ब्रेन ट्युमर
८) मेंदू वरील शस्त्रक्रिया
९) निश्चेतनावस्था (कोमा)
१०) मनोविकृतीने (मनोविकार) ग्रस्त
(३) शासकीय अधिकारी/ कर्मचारी स्वतः अथवा त्याची पत्नी / तिचा पती वा मूल / मुले अपंग आहेत किंवा जीवनसाथी अथवा मूल मतिमंद आहे.

(४) पती-पत्नी एकत्रिकरण केंद्र / राज्य, शासकीय / निमशासकीय कार्यालये, जिल्हा परिषद / पंचायत समिती/ मंडळ / महामंडळ, नगरपालिका/ महानगरपालिका अथवा शासकीय शैक्षणिक संस्थेमध्ये (शासकीय अनुदानीत खाजगी शिक्षणसंस्था नव्हे) कार्यरत पती-पत्नी.
(५) महिला अधिकारी / कर्मचारी गर्भवती आहे अथवा त्या महिला अधिकारी/ कर्मचाऱ्याचे मूल लहान (३ वर्षाच्या आतील) आहे.
(६) विभागीय संवर्ग आपसात बदली करून घेणे (Mutual Change) एका अथवा कोणत्याही दोन निवडसूचीतील अधिकारी / कर्मचाऱ्यांची आपसात विभागीय संवर्ग बदली बाबतची विनंती.
(७) शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचा/यांची, मुलगा/मुलगी इयत्ता १० वी १२ वी मध्ये शिकत असून त्या शैक्षणिक वर्षाची वार्षिक बोर्ड परीक्षा झालेली नसावी.
(८) विभागीय संवर्ग वाटपाच्या वेळी अविवाहित महिला अधिकारी/ कर्मचारी वा विधवा वा परित्यक्त्या /घटस्फोटीत आहेत व जिच्यावर अवलंबून असलेले वृध्द आई / वडील, सासू / सासरे.
(९) गडचिरोली/गोंदिया/चंद्रपूर/भंडारा/यवतमाळ नांदेड या जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागातील रिक्त पदांवर काम करण्यास इच्छुक असणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांच्या विनंती बाबत.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

महाराष्ट्र शासकीय गट अ व गट ब पदांवर सरळसेवेने नियुक्तीसाठी तसेच पदोन्नतीने नियुक्तीसाठी विभागीय संवर्ग वाटप याबाबत नियमावली २०१० ग्रामविकास विभाग, शासन निर्णय दिनांक २१-०६-२०१०

२.१ महाराष्ट्र शासकीय गट अ व गट ब (राजपत्रित व अराजपत्रित) पदावर सरळसेवेने नियुक्तीसाठी विभागीय संवर्ग संरचना व विभागीय संवर्ग वाटप याबाबतची नियमावली ही प्रसिध्द झाल्यापासून १ महिन्यानंतर, महाराष्ट्र लोकसेवा आयोगास पाठविण्यात येणा-या मागणीपत्रांच्या बाबतीत तसेच नियुक्ती प्राधिका-याकडून देण्यात येणा-या जाहिरातींच्या बाबतीत लागू आहे. त्यानुसार प्रशासकीय विभागांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगास मागणीपत्र पाठविताना, सदर अधिसूचनेतील नियम २ खालील परंतूक १ व २ मधील तरतुदीनुसार संबंधित पदास ही नियमावली लागू होत आहे अथवा लागू होत नाही ते स्पष्ट नमूद करावे. तसेच ही नियमावली संबंधित पदास लागू होत असल्यास पद राज्यस्तरावर बदलीपात्र असल्याचे, बिंदूनामावली राज्यस्तरावर ठेवण्यात येत असल्याचे व संवर्ग संख्या किती आहे त्याचा तपशील मागणीपत्रात स्पष्ट नमूद करावा. यापुर्वीच आयोगास पाठविलेली परंतू लोकसेवा आयोगाने त्रुटींची पूर्तता करण्यासाठी परत केलेली मागणीपत्रे, ही नियमावली प्रसिध्द झाल्यापासून १ महिन्यानंतर, त्रुटींची पूर्तता करुन आयोगास पाठविण्यात आल्यास अशा मागणीपत्रासंदर्भातही याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. तसेच नियमावलीतील नियम २ मधील तरतुदीनुसार, ज्या पदांसाठी ही नियमावली लागू होईल अशा पदांकरिता आयोगाकडून शिफारस झालेल्या उमेदवारांकडून अन्य विहित कागदपत्रांबरोबर सोबतच्या विहित नमुना "अ" मधील बंधपत्र (विभागीय संवर्गासाठीच्या पहिल्या पसंतीक्रमासह) घेण्यात यावे. 
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

45784

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare.