435
महाराष्ट्र विकास सेवा गट ब संवर्गातील अधिका-याचे बदल्याचे अधिकार विभागीय आयुक्त यांना प्रत्यार्पित करण्याबाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक ०४-०२-२०१५
महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ च्या कलम ६ मधील परंतुक २ नुसार महाराष्ट्र विकास सेवा, गट-ब संवर्गातील संबंधीत महसूली विभागात कार्यरत असलेल्या बदलीपात्र अधिकाऱ्यांच्या विभागांतर्गत बदल्यांचे अधिकार संबंधित महसुली विभागाच्या विभागीय आयुक्त यांना प्रत्यार्पित करण्यांत येत आहेत.
२) परंतु, महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन अधिनियम, २००५ मधील कलम ४(४) व (५) नुसार सदर संवर्गातील एखादया अधिकाऱ्याची प्रशासकीय कारण/विनंती या अनुषंगाने मुदतपूर्व बदली करावयाची झाल्यास असा प्रस्ताव शासन मान्यतेस्तव सादर करावा.
३) विभागीय आयुक्त यांनी त्यांच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र विकास सेवा, गट-ब मधील बदलीपात्र अधिकाऱ्यांच्या बदल्या, बदली अधिनियम २००५ मधील तरतूदी विचारात घेऊन समुपदेशनाद्वारे कराव्यात.
You Might Be Interested In