महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत ग्राम रोजगार सेवकांच्या तक्रारीसंदर्भात अनुसरावयाची कार्यपध्दती. शासन निर्णय दिनांक 04.09.2017 साठी येथे CLICK करा
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत असलेले ग्राम रोजगार सेवक यांच्या कामासंदर्भात या योजनेचे लाभार्थी, मजूर, ग्रामपंचायतीचे ग्राम सेवक, सरपंच व पदाधिकारी, जिल्हा परिषद/पंचायत समितीचे पदाधिकारी, अशासकीय संस्था, सामान्य नागरिक व या योजनेशी संबंधित इतर घटक यांच्याकडून तक्रार अर्ज प्राप्त होतात. अशी तक्रार प्राप्त झाल्यास अथवा त्यांना गैरवर्तणुकीमुळे पदावरुन काढून टाकण्याची मागणी झाल्यास विस्तार अधिकारी (पंचायत) यांनी सदर तक्रारीची चौकशी करण्याबाबत शासन निर्णय दिनांक २२ जानेवारी, २०१४ अन्वये कार्यपध्दती निर्गमित करण्यात आली आहे. मा. मंत्री (रोहयो) यांचेकडे बैठकीत झालेल्या निर्णयान्वये आता ग्राम रोजगार सेवकांची चौकशी विस्तार अधिकारी यांचेमार्फत करण्याऐवजी संबंधित गट विकास अधिकारी यांनी चौकशी करावी असा निर्णय घेण्यात आला आहे.
ग्राम रोजगार सेवकांच्या तक्रारीसंदर्भात दिनांक २२ जानेवारी, २०१४ च्या शासन निर्णयामधील अ.क्र.१ ते ७ येथे नमूद केल्यानुसार विहित केलेल्या कार्यपध्दतीचा अवलंब न करता ग्राम रोजगार सेवक यांना पदावरुन दूर करण्याचा निर्णय घेण्यात आल्यास अशा प्रकरणी उप मुख्य
शासन निर्णय क्रमांकः मग्रारो-२०१६/प्र.क्र.१७३/रोहयो-१०अ,
कार्यकारी अधिकारी यांचेकडे फेरविचारार्थ अर्ज करता येईल. उप मुख्य कार्यकारी अधिकारी हे अशा प्रकरणाची गुणवत्ता तपासून संबंधित ग्रामपंचायतीकडे उचित कार्यवाहीची शिफारस करतील.
ग्राम रोजगार सेवक यांच्या कामासंदर्भात अनियमितता निदर्शनास आल्यास उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अशा अनियमिततांबाबत स्वतःहून दखल घ्यावी व त्यांनी संबंधित ग्राम रोजगार सेवकांच्या चौकशीचे निर्देश गट विकास अधिकारी (पंचायत) यांना द्यावेत.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत ग्राम रोजगार सेवकांच्या तक्रारीसंदर्भात अनुसरावयाची कार्यपध्दती. शासन निर्णय दिनांक २२.०१.२०१४ साठी येथे CLICK करा
१ ग्रामरोजगार सेवक यांच्यासंदर्भात ग्रामपंचायतीकडे तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित ग्राम सेवक यांनी सदर तक्रार विस्तार अधिकारी (पंचायत), पंचायत समिती यांचेकडे त्वरीत पाठवावी.
२ या तक्रारीच्या अनुषंगाने विस्तार अधिकारी (पंचायत) यांनी संबंधित ग्रामरोजगार सेवक यांचेकडून १५ दिवसांच्या मुदतीत खुलासा मागवावा.
३ विस्तार अधिकारी (पंचायत) यांनी सदर तक्रारीची चौकशी प्रक्रीया, खुलासा प्राप्त झाल्यापासून ३० दिवसांच्या मुदतीमध्ये पूर्ण करावी.
४ चौकशीच्या प्रक्रियेमध्ये विस्तार अधिकारी यांनी रोहयो विभागाच्या दि. २ मे, २०१३ च्या शासन निर्णयामधील परिच्छेद क्र. (४) मध्ये नमूद केल्यानुसार ग्रामरोजगार सेवक यांनी कर्तव्याचे पालन केले आहे किंवा नाही याची खात्री करावी. तसेच विहित कार्यपध्दतीचा अवलंब केला नसल्यास त्यांना दंड आकारुन सुधारण्याची संधी देण्याबद्दल सुचवावे, परंतु गंभीर गैरवर्तणूक केली असल्यास या शासन निर्णयामधील परिच्छेद क्र. (५) मध्ये नमूद केल्यानुसार ग्राम रोजगार सेवक यांना द्यावयाच्या शिक्षेचे स्वरुप निश्चित करावे.
५ विस्तार अधिकारी (पंचायत) यांनी आपला चौकशी अहवाल निष्कर्षासह व स्वयंस्पष्ट शिफारशीसह ग्रामपंचायतीकडे पाठवावा.
६ विस्तार अधिकारी (पंचायत) यांचा अहवाल नजीकच्या आठवड्यात/महिन्यात होणान्या ग्रामसभेसमोर विचारार्थ ठेवण्यात यावा. याकरिता या विषयाचा समावेश ग्रामसभेच्या बैठकीच्या विषयसूचीमध्ये आगाऊ करण्यात यावा व ग्राम रोजगार सेवकालाही त्याची सूचना द्यावी.
७ ग्रामसभेने विस्तार अधिकारी (पंचायत) यांच्या अहवालावर सविस्तर चर्चा करुन ग्रामरोजगार सेवक यांच्याबाबत निर्णय घ्यावा; तसेच चौकशी अहवालामध्ये तथ्य आढळल्यास संबंधित ग्रामरोजगार सेवक यांना शिक्षा सुनावण्याचा अथवा त्यांना पदावरुन दूर करण्याचा निर्णय घ्यावा.
८ ग्राम रोजगार सेवक यांना पदावरुन दूर करण्यापूर्वी उपरोक्त क्र. (१) ते (७) येथे नमूद केलेल्या कार्यपध्दतीचा अवलंब करण्यात यावा.
९ ग्राम रोजगार सेवकांच्या कर्तव्यासंदर्भात या विभागाच्या दि. २ मे, २०११ च्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्यानुसार व प्रस्तुत शासन निर्णयामध्ये नमूद केल्यानुसार विहित केलेल्या कार्यपध्दतीचा अवलंब न करता ग्राम रोजगार सेवक यांना पदावरुन दूर करण्याचा निर्णय घेण्यात आल्यास अशा प्रकरणी संबंधित गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांचेकडे फेरविचारार्थ अर्ज करता येईल. गट विकास अधिकारी हे अशा प्रकरणाची गुणवत्ता तपासून संबंधित ग्रामपंचायतीकडे उचित कार्यवाहीची शिफारस करतील.
१० ग्राम रोजगार सेवक यांच्या कामासंदर्भात अनियमितता निदर्शनास आल्यास गट विकास अधिकारी, पंचायत समिती किंवा तहसिलदार यांनी अशा अनियमिततांबाबत स्वतःहून दखल घ्यावी व त्यांनी संबंधित ग्राम रोजगार सेवकांच्या चौकशीचे निर्देश विस्तार अधिकारी (पंचायत) यांना द्यावेत.
ग्रामरोजगार सेवकांची कर्तव्य व जबाबदाऱ्यांबाबत मार्गदर्शक सूचना शासन निर्णय दिनांक 17.05.2012 साठी येथे CLICK करा
ग्राम रोजगार सेवकांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या :
१) मग्रारोहयोच्या संदर्भातील ग्रामपंचायत पातळीवर सर्व प्रकारचे अभिलेख तयार करणे, ते जतन करणे व त्यावर स्वाक्षरी करणे.
२) ग्राम रोजगार सेवकाने ग्राम सेवकाचे मार्गदर्शनाखाली अभिलेखांमध्ये सर्व प्रकारच्या नोंदी घ्याव्यात. तसेच सर्व अभिलेख योग्य प्रकारे, व्यवस्थितपणे व परिपूर्ण ठेवण्याची प्राथमिक जबाबदारी ग्रामरोजगार सेवकाची राहील. तथापि, त्यावर नियंत्रण व प्रती स्वाक्षरी ग्रामसेवकाची राहील.
३) भविष्यात मजूरांच्या हजेरीसाठी वापरावयाची यांत्रिक व इलेक्ट्रॉनिक उपकरणे हाताळण्याची क्षमता व तयारी असावी.
४) मजूरांचे हजेरीपत्रक तयार करणे, ते भरणे व सांभाळणे.
५) रोजगार कार्यक्रम गावात सुरळीतपणे व सुनियोजितपणे राबविण्यासाठी व यशस्वी करण्यासाठी ग्राम सेवकाच्या मार्गदर्शनाखाली सर्वतोपरी प्रयत्न करणे.
६) मोजमाप घेण्यासाठी कनिष्ठ अभियंत्यांना व तत्सम तांत्रिक अधिकाऱ्यांना मदत करणे, व शासनाच्या आणि पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांना रोजगार कार्यक्रमा संदर्भात सहाय्य करणे.
७) मस्टर रोल गट विकास अधिकारी कार्यालयात घेऊन जाणे आणि बँक व पोस्ट ऑफिसशी संपर्क साधून मजूरांच्या मजूरी प्रदानास विलंब होणार नाही याबाबत दक्ष राहणे.
८) मस्टरची प्राथमिक जबाबदारी ग्रामरोजगार सेवकाची राहील. मात्र प्रतिस्वक्षरीबाबत खालीलप्रमाणे व्यवस्था राहील.
कामे स्वाक्षरी प्रतिस्वाक्षरी
ग्रामपंचायत ग्राम रोजगार सेवक ग्राम सेवक
यंत्रणा ग्राम रोजगार सेवक यंत्रणांचे तांत्रिक अधिकारी
९) दैनंदिन कामाची नोंद असलेली डायरी ग्रामरोजगार सेवकाने लिहीणे, व ग्रामसेवकास सादर करणे अनिर्वाय राहील.
१०) ग्रामरोजगार सेवकाने ठराविक दिवशी / वेळी ग्रामपंचायत कार्यालयात हजर राहून कामाचे नियोजन करावे आणि त्याबाबतची माहिती ग्रामसेवकास देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली कामे पूर्ण करणे.
तसेच संदर्भाधीन शासन निर्णय दि. २ मे, २०११ मधील परिच्छेद क्र. ७ नुसार ग्रामरोजगार सेवकांना प्रदाने करण्याच्या संदर्भात दिलेल्या सूचना कायम ठेऊन त्याअनुषंगाने खालील प्रमाणे अधिक सूचना देण्यात येत आहेत.
अ) गटविकास अधिकाऱ्यांकडून ग्रामरोजगार सेवकांना अदा करण्यात येणारे मानधन ग्रामसेवकांकडून त्यांच्या कामाचा अहवाल घेतल्यानंतर अदा करण्यात यावे.
ब) यंत्रणांद्वारे केल्या जाणाऱ्या कामाची गणना करुन विहीत दराने ग्रामरोजगार सेवकांना मानधन अदा करण्याबाबत कार्यवाही तहसिलदार यांनी करावी.
ग्रामरोजगार सेवकांनी नियमीत कामकाजात वरील प्रमाणे कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पाडाव्यात तसेच ग्रामसेवकांनी त्यांच्यावर नियंत्रण ठेऊन त्यांच्यावर सोपविलेली कामे त्यांच्याकडून पूर्ण करुन घ्यावीत. तसेच त्यांच्या कामाचा आढावा वेळोवेळी घेऊन त्यांना आवश्यक असेल तेथे मार्गदर्शन ग्रामसेवकांनी करावे.
ग्राम रोजगार सेवकांची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या व त्यांच्या नियुक्तीच्या संदर्भात मार्गदर्शक सूचना शासन निर्णय दिनांक 02.05.2011 साठी येथे CLICK करा
વિશ્વH BI
शासन निर्णय
ग्राम रोजगार सेवकांची कर्तव्य व जबाबदाऱ्या आणि त्यांच्या नियुक्तीच्या संदर्भात देण्यांत आलेले आदेश अधिक्रमीत करून ग्राम रोजगार सेवकांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या आणि त्यांच्या नियुक्तीच्या संदर्भात पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यांत येत आहेत.
१. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे अभिलेख व नोंदवह्या ठेवण्याची जबाबदारी सरपंच व ग्राम सेवकांची असेल. मात्र या कामात मदत करण्याची व प्रत्यक्ष काम करण्याची जबाचदारी प्राम रोजगार सेवकाची असेल. त्यांच्या कामाचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल.
अ) ग्राम रोजगार सेवकाचे काम हे अर्धवेळ स्वरूपाचे असेल.
ब) ग्राम रोजगार सेवक पदाच्या मानधनातून त्याची किंवा त्याच्या कुटुंबाची उपजीविका चालेल, अशी अपेक्षा त्याने धरू नये. ग्राम रोजगार सेवकाचे उत्पन्नाचे अन्य मार्ग असल्यास ते करून ग्राम रोजगार सेवक पदाचे काम करण्यास मुभा राहील. ग्राम रोजगार सेवक पदाचे हे मानधन त्याचे अधिकचे उत्पन्न असेल.
क) कामाच्या प्रमाणानुसार त्याला मानधन प्रदान केले जाईल.
ड) ग्राम रोजगार सेवकांची सेवा तात्पुरत्या स्वरुपाची असेल. ते राज्य शासन/जिल्हा परिषद पंचायत समितीचे कर्मचारी नसतील तसेच ते ग्रामपंचायतीचेही नियमीत कर्मचारी नसतील.
२. नियुक्ती प्राधिकारी
अ) ग्राम रोजगार सेवकांच्या सेवा उपलब्धते संदर्भात ग्राम सभा (ग्रामपंचायत नव्हे) निर्णय घेईल.
ब) त्याला काढून टाकण्याच्या संदर्भात प्रामपंचायत किंवा सरपंच यांना निर्णय घेण्याचा अधिकार नसून केवळ प्रामसभेस त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार असेल.
क) ग्रामपंचायतीचे पदाधिकारी बदलले तरी ग्राम रोजगार सेवक बदलू नये.
ड) सबळ कारणावरून ग्राम रोजगार सेवकाला काढून टाकण्यापूर्वी त्याला नैसर्गिक न्यायानुसार ग्रामसभेत त्याचे म्हणणे मांडण्याची संधी द्याची आणि त्याबाचत प्राम सेवकाचे अभिप्राय ध्यावेत.
इ) गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) किवा तत्सम अधिकारी यांनी त्यांना नियुक्तीचे आदेश देऊ नयेत.
३.१ शैक्षणिक अर्हता व इतर आवश्यकता-
राम्रारोहयोचे अभिलेख ठेवणे व ग्राम रोजगार सेवकांना मदत करणे हे ग्राम रोजगार सेवकाचे काम असल्याने तो किमान दहावी पास असावा. (१२ वी पास असलेल्यास प्राधान्य राहील.)
अ) जर दहावी पास नसलेल्या उमेदवाराची नियुक्ती पूर्वी करण्यांत आलेली असेल तर त्याची नियुक्ती पुढे चालू ठेवण्यास हरकत नाही.
च) त्याला वेबसाईटवर ग्रामपंचायत क्षेत्रातील राम्रारोहयोच्या कामाची माहिती भरण्याचे काम करावयाचे असल्याने पुढील ६ महिन्यामध्ये त्याने MS-CIT किया तत्सम संगणक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. गटविकास अधिकारी लेखी कारणे नमूद करून फक्त अपवादात्मक परिस्थितीमध्ये सदर कालावधी पुढील ६ महिनेपर्यंत वाढवू शकेल. अन्यथा त्याची सेवा समाप्त करण्यात येईल.
क) भविष्यात त्याच्या कामाच्या संदभांत काही चाचण्या किंवा परीक्षा घेण्यांत येतील. जर या परीक्षांमध्ये तो पास झाला नाही तर त्याला कामावरून कमी करण्यास तो पात्र राहील.
३.१ शैक्षणिक अर्हता व इतर आवश्यकता -
राग्रारोहयोचे अभिलेख ठेवणे व ग्राम रोजगार सेवकांना मदत करणे हे ग्राम रोजगार सेवकाचे काम असल्याने तो किमान दहावी पास असावा. (१२ वी पास असलेल्यास प्राधान्य राहील.)
अ) जर दहावी पास नसलेल्या उमेदवाराची नियुक्ती पुर्वी करण्यांत आलेली असेल तर त्याची नियुक्ती पुढे चालू ठेवण्यास हरकत नाही.
ब) त्याला वेबसाईटवर ग्रामपंचायत क्षेत्रातील राग्रारोहयोच्या कामाची माहिती भरण्याचे काम करावयाचे असल्याने पुढील ६ महिन्यामध्ये त्याने MS-CIT किंवा तत्सम संगणक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. गटविकास अधिकारी लेखी कारणे नमूद करून फक्त अपवादात्मक परिस्थितीमध्ये सदर कालावधी पुढील ६ महिनेपर्यंत वाढवू शकेल. अन्यथा त्याची सेवा समाप्त करण्यात येईल.
क) भविष्यात त्याच्या कामाच्या संदर्भात काही चाचण्या किंवा परीक्षा घेण्यांत येतील. जर या परीक्षांमध्ये तो पास झाला नाही तर त्याला कामावरून कमी करण्यास तो पात्र राहील.
३.२ नियुक्तीच्या संदर्भात इतर अटी-
अ) उमेदवाराचे चारित्र्य निष्कलंक असावे, तसेच गांवकऱ्यांचे त्याच्याबद्दल मत चांगले असावे.
ब) उत्तम आरोग्य असावे.
क) गावातील अंगमेहनतीचे काम करण्यास सक्षम असलेल्या प्रौढ व्यक्तिना विशेषतः महिला, अनुसूचित जाती/जमातीच्या व अन्य तत्सम प्रवर्गातील ग्रामस्थांना ज्यांच्यामधून मुख्यतः मजूर उपलब्ध होणार असतात त्यांना संवेदनशिलतेने व व्यवस्थित हाताळण्याची क्षमता असावी.
हाताळण्याचा क्षमता असावा.
४) ग्राम रोजगार सेवकाची कर्तव्ये -
१) मग्रारोहयोच्या संदर्भातील ग्रामपंचायत पातळीवर सर्व प्रकारचे अभिलेख तयार करणे व तो जतन करण्यासाठी ग्राम सेवकाला मदत करणे,
२) त्याने ग्राम सेवकाच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रकारच्या नोंदी घ्याव्यात. तथापि सर्व अभिलेख योग्य प्रकारे, व्यवस्थितपणे व परिपूर्ण ठेवण्याची जबाबदारी ग्राम सेवकाची असेल.
३) ग्राम सेवकाच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीमध्ये सर्व अभिलेख सांभाळण्याचे काम ग्राम रोजगार सेवकाने करावे.
४) भविष्यात मजूरांच्या हजेरीसाठी वापरावयाची यांत्रिक व इलेक्ट्रॉनिक उपकरणे हाताळण्याची क्षमता व तयारी असावी.
५) मजुरांचे हजेरीपत्रक सांभाळावे.
६) रोजगार कार्यक्रम गांवात सुरळीतपणे व सुनियोजितपणे राबविण्यासाठी व यशस्वी करण्यासाठी ग्राम सेवकाच्या मार्गदर्शनाखाली सर्वतोपरी प्रयत्न करावेत.
७) मोजमाप घेण्यासाठी कनिष्ठ अभियंत्यांना व तत्सम तांत्रीक अधिकाऱ्यांना मदत करणे, व शासनाच्या आणि पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांना रोजगार कार्यक्रमा संदर्भात सहाय्य करणे.
८) आवश्यकता भासल्यास मस्टर रोल गट विकास अधिकारी कार्यालयात घेऊन जाणे व बँक आणि पोस्ट ऑफिसशी संपर्क साधून मजूरांच्या मजूरी प्रदानास विलंब होणार नाही याबाबत दक्ष रहाणे.
५) गैरवर्तणूक
१) मग्रारोहयोच्या अभिलेखाची नीट काळजी न घेणे व चांगल्या प्रकारे काम न करणे
२) भ्रष्टाचार व खोट्या हजेरी पत्रकाबाबत तक्रारी आल्यास त्या गैरवर्तणुकीशी संबंधित समजण्यात येतील..
३) मजुरांना वाईट वागणूक देणे.
४) मजुर व विशेषतः महिला मजुर यांचेशी गैरवर्तणुकीच्या तक्रारीत तथ्य आढळून आल्यास मानधनात कपात करण्यापासून कामावरून निष्कासित करण्यापर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
६) एका ग्रामपंचायतीमध्ये ग्राम रोजगार सेवकांची संख्या
शक्यतो एका ग्रामपंचायतीमध्ये एक ग्राम रोजगार सेवक असावा. तथापि ग्रामपंचायत मोठी असल्यास किंवा ग्रामपंचायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कामे असल्यास किंवा आदिवासी व मागास भाग असल्यास किंवा जेथे ग्रामपंचायतीमध्ये जास्त गांवे विखुरलेल्या स्वरूपात असतील तर एकापेक्षा जास्त ग्राम रोजगार सेवक घेता येतील.
७) ग्राम रोजगार सेवकांना प्रदाने -
१) ग्रामपंचायत स्तरावर झालेल्या मजुरीच्या प्रदानावर वेळोवेळी निश्चित केलेल्या दराने मानधन.
२) सदर मानधन ६% प्रशासकीय खर्चाच्या निधीमधून देण्यांत येईल.
३) गट विकास अधिकाऱ्यांकडून शक्यतो दर पंधरा दिवसांनी मानधन अदा करण्यांत येईल. परंतु १ महिन्यापेक्षा जास्त कालावधीत प्रदाने करू नयेत.
४) गट विकास अधिकारी कार्यालयात जाण्यासाठी किंवा ग्राम सेवकांच्या सूचनेप्रमाणे प्रवास करण्यासाठी केलेल्या खर्चाची तसेच अन्य तत्सम खर्चाची देयके ६% प्रशासकीय खर्चाच्या निधीमधून अदा करण्यांत येतील.
ग्राम रोजगार सेवकांच्या सेवा उपलब्धतेबाबत वरीलप्रमाणे कार्यवाही करून, त्यांच्या सेवेचा वापर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी करण्यांत यावा.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी ग्रामरोजगार सेवकांचे मानधन वितरीत करावयाची कार्यपद्धती शासन निर्णय दिनांक08.03.2021 साठी येथे CLICK करा
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्राम रोजगार सेवकांचे मानधन शासन निर्णय दिनांक 01.03.2014 साठी येथे CLICK करा
कंत्राटी तत्वावरील कर्मचाऱ्यांना अनुद्नेय प्रवास भत्ता व दैनिक भत्ता प्रदान करण्याबाबत शासन निर्णय दिनांक 21.08.2012 साठी येथे CLICK करा
ग्रामरोजगार सेवकांना मानधन अदा करण्याच्या संदर्भात मार्गदर्शक सूचना व कार्यपद्धती शासन निर्णय दिनांक 30.08.2011 साठी येथे CLICK करा