Wednesday, November 18, 2026
Wednesday, November 18, 2026
Home » महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना: न.पा/ म.न.पा Ι Ι MGNREGS: Municipal Council / Municipal Corporation

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना: न.पा/ म.न.पा Ι Ι MGNREGS: Municipal Council / Municipal Corporation

11 comments 1.8K views

महाराष्ट्र रोजगार हमी कायदा १९७७ नुसार क नगरपरिषद ,नगर पंचायत क्षेत्रात राज्य रोजगार हमी योजनेची राज्यात अमलबजावणी करणे बाबत नगरविकास विभाग शासन निर्णय दिनांक १८-११-२०२१

महाराष्ट्र रोजगार हमी कायदा १९७७ नुसार शासन निर्णय दिनांक ०३ मार्च, २०१४ अन्वये राज्यातील "क" वर्ग नगरपरिषदा/नगरपंचायत क्षेत्रात राज्य रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सदर योजनेच्या परिणामकारक अंमलबजावणीच्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी :-
राज्यातील सर्व "क" वर्ग नगरपरिषदा व नगरपंचायत क्षेत्रात रोहयो अंतर्गत कामे करताना कुशल कामावर करावयाच्या ४० टक्के खर्चापैकी २५ टक्के रक्कम संबंधित “क” वर्ग नगरपरिषद/नगरपंचायत यांनी त्यांच्या स्वनिधीतून उपलब्ध करावा.
याबाबतच्या कार्यवाहीवर आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांनी त्यांच्या यंत्रणेमार्फत सनियंत्रण करावे.

महाराष्ट्र ‘क’ वर्ग नगर परिषद/ नगर पंचायत क्षेत्र राज्य रोजगार हमी योजनेची राज्यात अंमलबजावणी करणेबाबत …. महाराष्ट्र शासन नियोजन विभाग (रोहयो प्रभाग) शासन शुध्दीपत्रक क्र. मग्रारोहयो-२०१२/प्र.क्र.५५/रेहयो-१० १६ वा मजला, नवीन प्रशासकीय भवन, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२. दिनांक : ११ ऑगस्ट, २०२१

महानगरपालीकेत समावीष्ट झालेल्या ग्रामपंचायतीमधील कामांना मनरेगा अंतर्गत अपूर्ण असलेल्या कामांना निधी देणेबाबत शासन निर्णय दिनांक 08.08.2019.

शासनाने राज्यात "क" वर्ग नगरपरिषद क्षेत्रात राज्य रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करणेबाबत सविस्तर सूचना संदर्भाधीन दिनांक ३ मार्च, २०१४ च्या शासन निर्णयान्वये दिलेल्या आहेत. त्यानुसार राज्यात "क" वर्ग नगरपरिषद/नगरपंचायत क्षेत्रात राज्य रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. तसेच राज्यामध्ये काही ग्रामपंचायतींचे रुपांतर नगरपरिषद/नगरपंचायत क्षेत्रात झालेले आहे, तर काही ग्रामपंचायतींचे क्षेत्र नगरपरिषद/नगरपंचायत क्षेत्रामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे, अशा नगरपरिषद/नगरपंचायत क्षेत्रामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जी कामे सुरू आहेत, ती कामे राज्य रोजगार हमी योजनेत रूपांतरीत करावी व अशा कामांच्या बाबतीत काय कार्यवाही करावी याबाबतच्या सुचना दिनांक २१ मे, २०१५ च्या पत्रान्वये देण्यात आलेल्या आहेत.
राज्यातील बऱ्याच महानगरपालिकेची हद्द वाढविल्यामुळे काही ग्रामपंचायती महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या आहेत. सदर ग्रामपंचायतीमार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक व सार्वजनिक कामे घेण्यात आली असून सदर कामे अपूर्ण आहेत. सदर ग्रामपंचायती महानगरपालिकेत समाविष्ट झाल्या असल्याने अपूर्ण असलेल्या कामांना मग्रारोहयो अंतर्गत निधी देता येत नाही. या कामांवर काम केलेल्या संबंधित लाभार्थ्यांना अद्यांप निधी मिळाला नसल्याने त्यांनी निधी मिळण्याची शासनाकडे मागणी केली आहे. सदर ग्रामपंचायती महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाल्यामुळे संबंधित ग्रामपंचायतीमधील अपूर्ण कामे पूर्ण करण्यास निधी मिळण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आलेले आहे.
उपरोक्त अडचणी विचारात घेता राज्यातील ज्या महानगरपालिकेची हद्द वाढल्याने महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या ग्रामपंचायतीमधील अपुर्ण असलेली कामे मनरेगाच्या निकषाप्रमाणे पूर्ण करावी तसेच अशा गावातील कामांना मग्रारोहयो अंतर्गत नव्याने प्रशासकीय मान्यता देण्यात येवु नये, अशा सूचना आयुक्त नरेगा, नागपूर यांना दिनांक ३ जून, २०१९ च्या पत्रान्वये देण्यात आलेल्या आहेत. मगांराग्रारोहयो अंतर्गत सदर निधी देता येत नसल्याने हा निधी राज्य रोजगार हमी योजनेअंतर्गत देण्याबाबतच्या शिफारशीसह आयुक्त, नरेगा, नागपूर यांनी निधी मागणी प्रस्ताव शासनास सादर करणे आवश्यक आहे.
त्यानुसार ग्रामपंचायतीमधील अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी शासनामार्फत आयुक्त नरेगा यांनी मागणी केल्यानुसार निधी उपलब्ध करून देण्यात येईल. आयुक्त नरेगा यांनी सदर निधी संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम समन्वयक यांच्या मागणीनुसार तात्काळ मंजूर करून वितरित करावा. आयुक्त नरेगा, नागपूर यांनी सदर निधी ज्या लाभार्थ्यांनी मागणी केली आहे त्या लाभार्थ्यांच्या खात्यावर FTO द्वारे जमा होईल याची दक्षता घ्यावी. निधी मागणीचे जसजसे प्रस्ताव आयुक्त नागपूर यांचेकडून प्राप्त होतील त्यानुसार आयुक्त नरेगा, नागपूर यांना निधी वितरित करण्यात येईल. सदर निधी आयुक्त नरेगा, नागपूर यांनी संबंधित जिल्ह्यातील अपूर्ण कामे पूर्ण करण्याकरिता तात्काळ मंजूर करण्याची कार्यवाही करावी. उपरोक्त सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.


महाराष्ट्र ‘क’ वर्ग नगर परिषद/नगर पंचायत क्षेत्र राज्य रोजगार हमी योजनेची राज्यात अंमलबजावणी करणेबाबत ….. महाराष्ट्र शासन नियोजन विभाग/रोहयो प्रभाग क्र. शासन निर्णय क्र. मग्रारोहयो २०१२/प्र.क्र.५५/रोहयो १० मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२ दि. ३ मार्च, २०१४

#governmentofmaharashtra#maharashtra#checklist#MaharashtraGovernment #GovernmentGR #GovernmentResolution #MaharashtraGR #GR #Maharashtra Government #Government Resolution #GR #Government Decision #Government Decision #Government Resolution #GR#Maharashtra Government

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Might Be Interested In

You may also like

11 comments

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना : मजुरी - ग्रामविकास E-सेवा October 10, 2026 - 11:17 pm

[…] ग्रामीण रोजगार हमी योजना: लेबर… महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजग… महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण […]

Reply
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना : गोठा Ι Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme: Cattle Shed - ग्रामविकास October 10, 2026 - 11:26 pm

[…] ग्रामीण रोजगार हमी योजना : गोठा… महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजग… महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण […]

Reply
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना: लेबर बजेट Ι Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme: Labor Budget - ग्रामव October 10, 2026 - 11:31 pm

[…] ग्रामीण रोजगार हमी योजना : गोठा… महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजग… महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण […]

Reply
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना -रेन वॉटर हार्वेस्टिंग Ι Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme: October 10, 2026 - 11:39 pm

[…] ग्रामीण रोजगार हमी योजना -रेन… महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजग… महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण […]

Reply
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना- शोषखड्डे Ι Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme: Soak Pits - ग्रामवि October 10, 2026 - 11:44 pm

[…] ग्रामीण रोजगार हमी योजना -रेन… महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजग… महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण […]

Reply
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजने अंतर्गत गावांमध्ये सार्वजनिक ठिकाणी पेव्हर ब October 10, 2026 - 11:51 pm

[…] ग्रामीण रोजगार हमी योजना -रेन… महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजग… महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण […]

Reply
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना: ग्राम रोजगार सेवकांच्या तक्रारी संदर्भात अन October 11, 2026 - 7:38 am

[…] ग्रामीण रोजगार हमी योजना -रेन… महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजग… महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण […]

Reply
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना: विलंबाने अदा मजुरीवर नुकसान भरपाई Ι Mahatma Gandhi National Ru October 11, 2026 - 7:39 am

[…] ग्रामीण रोजगार हमी योजना -रेन… महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजग… महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण […]

Reply
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना: कामे शेल्फवर ठेवणे Ι Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme: To place October 11, 2026 - 7:45 am

[…] ग्रामीण रोजगार हमी योजना -रेन… महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजग… महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण […]

Reply
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना: सामाजिक अंकेक्षण Ι Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme: Social audit October 11, 2026 - 7:46 am

[…] ग्रामीण रोजगार हमी योजना -रेन… महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजग… ताज्या घडामोडी […]

Reply
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना : वैयक्तिक लाभाच्या कामासाठी लागणाऱ्या साहित October 11, 2026 - 9:25 am

[…] ग्रामिण रोजगार हमी योजना :… महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजग… महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण […]

Reply

Leave a Comment