271
महा गां रा ग्रा रोज हमी योज अंतर्गत शेततळ्यांच्या अस्तरीकरणास परवानगी देण्याबाबत नियोजन विभाग शासन निर्णय दिनांक 06.04.2021
शासन निर्णय -:
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कृषी विभागामार्फत भूस्तराप्रमाणे शेततळे घेण्याबाबत दि. २८ फेब्रुवारी, २०१४ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली असून, महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थिती भिन्न-भिन्न स्वरुपाची असल्यामुळे व सर्व ठिकाणी सारखाच भूस्तर आढळून येत नसल्यामुळे भूस्तराच्या वर्गवारीनुसार शेततळे खोदण्याचे एकूण ६ उपाय सूचविण्यात आलेले आहेत. सदर उपायांपैकी १०० % मजूरामार्फत करावयाच्या शेततळ्याच्या उपाय क्र.१ मधील (इनलेट आऊटलेटसह अ व इनलेट आऊटलेट विरहीत-ब) (एकूण ९ -आकारमानांपैकी ८ आकारमानच्या) शेततळ्यांचे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अस्तरीकरणास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. कृषि विभागाने प्लास्टीक अस्तरीकरणासाठी निश्चित केलेले निकष व प्रस्तावित केलेले प्लास्टीक अस्तरीकरणाचे दर विचारात घेऊन तयार करण्यात आलेले सदर घटकाचे आर्थिक मापदंड परिशिष्ट-अ सोबत जोडण्यात आलेले आहेत.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
मागेल त्याला-शेततळे योजनेंतर्गत अभिसरणाद्वारे शेततळे घेणेबाबत-अंतर्गत कृषि विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या शेततळयाांचे आर्थिक नियोजन विभाग शासन निर्णय दिनांक 29.12.2020
You Might Be Interested In