महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून “शोषखड्डे” चे काम करणेबाबत नियोजन विभाग शासन परिपत्रक दिनांक 20-04-2021
२. सर्वसाधारणपणे गावातील प्रत्येक घरामधून नियमित वापरलेले पाणी / सांडपाणी हे उघड्यावरुन नालीमध्ये सोडले जाते. त्यामुळे गावात, रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचून राहते व त्यामुळे दुर्गंधी, डास निर्माण होतात. या दुषित पाण्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता निर्माण होते. परंतु प्रत्येक गावातील प्रत्येक घराजवळ एक शोषखड्डा बांधून त्यात सांडपाणी, घराच्या छपरावरील पावसाचे पाणी सोडल्यास त्याचे खालीलप्रमाणे फायदे होतात.
१) घराजवळील उघड्यावरील सांडपाणी संपल्याने डासांची उत्पत्ती व प्रादुर्भाव पूर्णपणे बंद होऊन अनेक साथीच्या आजारांवर नियंत्रण आणता येईल.
२) भुगर्भामध्ये गारवा तयार होऊन नॅनो क्लाऊड प्रक्रिया झाल्याने पावसाच्या प्रमाणात वाढ होईल.
३) जलसंधारण होण्यासाठी शोषखड्डे हे एक शाश्वत प्रभावी साधन निर्माण होईल.
३. प्रत्येक गावातील प्रत्येक घराजवळ १००% शोषखड्डे तयार करण्यासाठी जागेच्या उपलब्धतेनुसार शोषखड्डयांचे आकारमान बदलावे लागेल. तसेच शोषखड्डयाच्या बदललेल्या आकारमानानुसार सिमेंटची टाकी / प्लास्टिकची टाकी किंवा टाकीशिवाय विट आणि दगड टाकून शोषखड्डा तयार करण्यात यावा. तथापि, टाकीशिवाय शोषखड्डे करणे टाळावे. टाकीचा पर्याय उपलब्ध नसेल तरच विट आणि दगडाचे शोषखड्डे करण्यात यावेत. जागेच्या उपलब्धतेनुसार वैयक्तिक शोषखड्डे तसेच सामुहिक शोषखड्डे तयार करण्यासाठी शोषखड्डयांचे आकारमान परिशिष्ट-१ मध्ये दिलेले आहेत. तसेच, त्यासाठीचे टाईप इस्टिमेट परिशिष्ट-२ मध्ये दिलेले आहेत. त्यानुसार शोषखड्डे तयार करण्यात यावेत. [परिशिष्ट-१ & परिशिष्ट-२अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी………]
शोषखड्डा कुठे करावा :- १) वरच्या भागात माती, खालच्या भागात मुरुम असेल त्या ठिकाणी २) पूर्ण मुरुमाचा भाग असेल त्या ठिकाणी शोषखड्डा कुठे करु नये :- १) काळी चिकन माती असेल त्या ठिकाणी २) खडक असेल त्या ठिकाणी ३) विहिर व बोअरवेलच्या जवळ (किमान १० मीटर अंतर राखून करण्यास हरकत नाही.) ४. राज्यातील २२ जिल्ह्यांमधील एकूण १४३ गट (Blocks) हे १००% तीव्र पाणीटंचाई असलेले आहेत. परिशिष्ट-३ पहावे. या सर्व १४३ गटातील (Blocks मधील) १००% गावातील १००% घराजवळ वैयक्तिक शोषखड्डे तसेच आवश्यक असेल तेथे सामुहिक शोषखड्डे सुद्धा तयार करण्यात यावेत. या १४३ पलीकडील गटांमध्ये अधिकाधिक गावांमध्ये १००% घराजवळ शोषखड्डे करण्यात यावे. या दोन्ही बाबींचा Google Form द्वारे पाठपुरावा करण्यात येईल. ५. राज्यातील काही गावांमध्ये १००% शोषखड्डे तयार करण्यात आलेले आहेत. त्यामुळे त्यांना झालेल्या व यापुढेही निरंतर फायदा होत असलेल्या तीन गावांची माहिती उदाहरणादाखल खाली देण्यात येत आहे, जेणेकरुन शोषखड्डे तयार करण्याची गरज आवश्यक असल्याची समाजामध्ये जाणीव निर्माण होईल व यातून एक प्रकारची लोकचळवळ उभी राहू शकेल.अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….