Friday, July 25, 2025
Friday, July 25, 2025
Home » निर्लेखन

निर्लेखन

0 comment

जिल्हा परिषदेच्या अधिनस्थ मोडकळीस आलेल्या / धोकादायक झालेल्या इमारत बांधकामाबाबत मार्गदर्शक सूचना 08 -06- 2012

जिल्हा परिषदेच्या अधिनस्थ विविध प्रशासकीय विभागाच्या, विविध योजनांच्या निधीतुन इमारतींचे बांधकाम हाती घेण्यात आलेले असुन कालौघात काही इमारतींची बांधकामे जीर्ण होवून मोडकळीस आलेली आहेत. मात्र, अशी बांधकामे पाडण्यासंबधात जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम तसेच ग्रामपंचायत अधिनियमात स्पष्ट तरतुद नसल्याने, त्या ठिकाणी नविन बांधकाम हाती घेण्याच्या दृष्टीने अस्तित्वातील बांधकाम पाडण्याबाबत अडचणी निर्माण होत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आणण्यात आल्याने, अस्तित्वातील मोडकळीस आलेले / धोकादायक झालेले इमारत बांधकाम पाडण्यासंबधातील सविस्तर मार्गदर्शक सूचना संदर्भीय दिनांक ९जानेवारी, २०१२ च्या शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आहेत. मात्र, त्यानुसार कार्यवाही करताना संदर्भीय दिनांक २४मे, १९८४ च्या शासन निर्णयासोबतच्या वित्तीय अधिकार नियम पुस्तिका-१९७८, भाग-पहिला, उपविभाग-एक, अ.क्र.९, नियम-११४ खाली प्रदान करण्यात आलेल्या वित्तीय शक्ती/अधिकारांचे अनुपालन क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडुन करण्यात येत नसल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे.
२. यास्तव, वित्तीय अधिकार नियम पुस्तिका-१९७८, भाग-पहिला, उपविभाग-एक, अ.क्र.९, नियम-११४ खाली प्रदान करण्यात आलेल्या वित्तीय शक्ती/अधिकारानुसार रुपये १०.०० लाखाच्या पुस्तकी मुल्यांपर्यंत प्रादेशिक कार्यालय प्रमुख व रुपये २०.०० लाखाच्या पुस्तकी मुल्यांपर्यंत विभाग प्रमुख यांनी अस्तित्वातील मोडकळीस आलेले / धोकादायक झालेले इमारत बांधकाम पाडण्या संबधातील प्रस्तावास संदर्भीय दिनांक ९जानेवारी, २०१२ च्या शासन परिपत्रकातील मार्गदर्शक सुचनांचे अनुपालन करुन मान्यता देण्याची कार्यवाही करावी. रुपये २०.००लाखाच्या पुढील पुस्तकी मुल्यांपर्यंतचे अस्तित्वातील मोडकळीस आलेले / धोकादायक झालेले इमारत बांधकाम पाडण्या संबधातील प्रस्ताव व संदर्भीय शासन परिपत्रकातील अ.क्र. (viii) येथील प्रस्ताव विहीत कार्यपध्दती अनुसरुन शासनास सादर करणे बंधनकारक राहील.

जीर्ण इमारतीचे निर्लेखन 9 जानेवारी 2012

-: शासन परिपत्रक :-
(1) जिल्हा परिषदेच्या अधिनस्थ ज्या योजनेची/खात्याची अस्तित्वातील इमारत मोडकळीस आलेली असेल, त्याबाबत संबधित खातेप्रमुखांनी त्यासाठीचा सविस्तर प्रस्ताव तयार करावा. सदर प्रस्ताव कार्यकारी अभियंता (बांध), जि.प. यांच्या मार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रथम सादर करावा.
(ii) त्यामध्ये कार्यकारी अभियंता (बांध) जिल्हा परिषद व संबधित खातेप्रमुख यांनी सदर इमारत बांधकामाच्या दर्जाबाबत (स्ट्रक्चरल ऑडिट) संयुक्त तपासणी करुन, त्याबाबत अहवाल प्रस्तावा सोबत सादर करणे आवश्यक आहे.
(iii) या अहवालामध्ये अस्तित्वातील इमारत बांधकामाचे वर्ष, सदर इमारत बांधकाम ज्या जागेवर असेल त्या जागेच्या मालकीचा तपशिल, सदर इमारतीचे बांधकाम कोणत्या योजनेतुन करण्यात आले होते त्याचा तपशिल, बांधकामाचे क्षेत्रफळ, त्यावरील खर्च, इमारत बांधकामाच्या सद्यःस्थिती बाबतचे सविस्तर वर्णन, मोडकळीस आलेल्या इमारत बांधकामाचे घसारा मुल्य/मुल्यांकन व सदर बांधकाम पाडण्याची आवश्यकता नमूद करावी.
(iv) तसेच वरील संयुक्त तपासणी अहवालाच्या आधारे सदर बांधकाम भविष्यात कार्यालयीन / निवासी वापरास योग्य/अयोग्य असल्याचे स्वयंस्पष्ट अभिप्राय तसेच अस्तित्वातील बांधकाम धोकादायक झालेले असल्यास ते पाडण्यास हरकत नसल्याबाबतचे सविस्तर प्रमाणपत्र कार्यकारी अभियंता (बांध) यांनी विभागीय अधिक्षक अभियंता, सा.बां.वि. किंवा प्र.मं.ग्रा.स.यो. यांच्याकडुन प्राप्त करुन घेवुन प्रस्तावासोबत सादर करणे आवश्यक आहे.
(v) मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रस्तावास मान्यता दिल्यानंतर अस्तित्वातील मोडकळीस आलेले बांधकाम पाडण्या संबधातील सविस्तर प्रस्तावास जिल्हा परिषदेच्या सर्व साधारण सभेची मान्यता घ्यावी.
(vi) तद्नंतर संबधित खातेप्रमुखांनी अस्तित्वातील इमारत बांधकाम पाडण्यास परवानगी मिळण्याबाबत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह (संयुक्त तपासणी अहवाल, कार्यकारी अभियंता (बांध) जि.प. यांचे प्रमाणपत्र, अस्तित्वातील मोडकळीस आलेल्या इमारत बांधकामाचे फोटो, सदर इमारत बांधकाम दर्शविणाऱ्या जागेचा ले-आऊट प्लॅग, संबंधित प्रशासकीय विभागाच्या सहमतीचे पत्र, जि.प. सर्वसाधारण सभेचा ठरावाची प्रत इ. सह) सविस्तर प्रस्ताव शासनास सादर करावा.
(vii) ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या मोडकळीस आलेल्या इमारत बांधकामाबाबत, पंचायत समितीच्या संबधित गट विकास अधिकारी यांनी खातेप्रमुख म्हणुन वरील प्रमाणे कार्यवाही करावी.
(viii) अन्य प्रयोजनार्थ इमारत बांधकाम पाडावयाचे असल्यास, त्या बांधकामाची कोणत्याही सार्वजनिक उपयोगासाठी आवश्यकता नाही किंवा ते तसेच राहू देणे / ठेवणे सार्वजनिक हिताला बाधक ठरेल असे लेखी प्रमाणपत्र संबधित कार्यकारी अभियंता (बांध), जिल्हा परिषद यांनी विभागीय अधिक्षक अभियंता, सा.बां.वि. किंवा प्र. मं. ग्रा. स. यो. यांच्याकडुन प्राप्त करुन घेण्यात घ्यावे व त्यानुसार प्रस्ताव शासनास सादर करावा.
(1x) अस्तित्वातील मोडकळीस आलेले इमारत बांधकाम पाडण्यास शासन मान्यता प्राप्त झाल्यानंतर सवर बांधकामा बाबतची आवश्यक ती नोंद विहीत रजिस्टर मध्ये घेण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंता (बांध) जिल्हा परिषद यांची राहील.
(x) तद्नंतर प्रचलित लिलाव कार्यपध्दतीचा अवलंब करून सवरील इमारत बांधकाम पाडण्याविषयक आवश्यक ती पुढील कार्यवाही कार्यकारी अभियंता (बांध), जि.प. यांनी करावी.

जीर्ण इमारतीचे निर्लेखन 08 जानेवारी 2012

निरुपयोगी वस्तू वाहने लिलाव शा नि 22 नोव्हेंबर 2000

निरुपयोगी वस्तू वाहने लिलाव शा नि 18 जून 1991

संगणक ई वस्तू आयुष्यमान आणि विल्हेवाट

शासकीयआश्रमशाळावस्तीगृहातील वस्तूंच्या निर्लेखानाबाबत व_आयुर्मानाबाबत दिनांक ०७-१२-२०१८

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

46928

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare.