वाचा :
१) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक केमाअ २०११/४०८/प्र.क्र. २२९/सहा, दिनांक २२ नोव्हेंबर, २०११.
२) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक संकीर्ण २०१५/प्र. क्र.४७/१८ (र. व का.), दिनांक २४ जून, २०१५.
3) The Information Technology Act, 2000
प्रस्तावना :
कार्यालयीन कामकाज नियमपुस्तिका नियम १०२ अन्वये, केंद्र शासन, खाजगी व्यक्ती, राज्य शासनाचे अधिकारी यांना शासनामार्फत पाठवावयाच्या पत्रांसाठी वेगवेगळे नमुने विहित करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे उपरोक्त संदर्भ क्रमांक २ येथील दिनांक २४ जून, २०१५ च्या परिपत्रकान्वये, शासकीय पत्रव्यवहार करताना पत्रावर कार्यालयाचा संपूण पत्ता लिहिणे, दूरध्वनी क्रमांक, फॅक्स क्रमांक, ई-मेल आयडी इ. लिहिण्याबाबतच्या सर्वसाधारण सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.
तथापि मंत्रालयीन विभाग तसेच क्षेत्रिय कार्यालयांकडून निर्गमित होणाऱ्या पत्रांच्या नमुन्यामध्ये कोणतीही एकवाक्यता नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. याशिवाय शासकीय पत्रांवर बोधचिन्ह व चोषवाक्य मुद्रित करण्याबाबतचे कोणतेही धोरण / सूचना नसल्याने विविध मंत्रालयीन विभाग तसेच त्यांच्या नियंत्रणाखालील राज्य शासकीय कार्यालयांच्या पत्रांवर बोधचिन्ह / घोषवाक्य मुद्रित करण्याबाबतचे धोरण निश्चित करणे तसेच पत्राचा नमुना विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
परिपत्रक :
सदर परिपत्रकान्वये सूचित करण्यात येते की, सर्व मंत्रालयीन विभाग तसेच विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील शासकीय कार्यालयांनी यापुढे सोबतच्या नमुना “अ” मध्ये विहित केलेला पत्राचा नमुना पत्रव्यवहारात वापरावा. याकरीता महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील मुखपृष्ठावर (Home Page) “इतर दुवे या शीर्षाखाली उपलब्ध करून देण्यात आलेल्या Template चाच पत्राचा नमुना म्हणून उपयोग करण्यात यावा.
पत्रलेखना बाबत कार्यालयीन कामकाज नियमपुस्तिकेतील तरतुदीचे पालन करण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक ३०-05 -२०१८
करिता म्हणून स्वाक्षरी तसेच कोणत्याही परिस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्याचे पदनाम नमूद करुन “करीता” असा उल्लेख करून पत्रे निर्गमित करण्यात येणार नाही, याची काटेकोरपणे दक्षता घेण्यात यावी.
परिपत्रक :
कार्यालयीन कार्यपद्धती नियमपुस्तिकेतील ५३ (८) येथील तरतूदीनुसार शासकीय पत्रे निर्गमित करताना पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या अधिकाऱ्याने स्वाक्षरीखाली कंसामध्ये नाव व त्याखाली पदनामाचा उल्लेख करण्याबाबत संदर्भाकित दिनांक १६ जून, २००५ तसेच दिनांक १० फेब्रुवारी, २०१६ च्या परिपत्रकान्वये सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.
२. तथापि माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अनुसार राज्य माहिती आयुक्त, कोंकण खंडपीठ यांचेसमोर दाखल झालेल्या द्वितीय अपिल क्रमांक के. आर. ४३२४ / २०१७ संदर्भातील सुनावणीच्या वेळी माहितीच्या अधिकारांतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या फेरफारावर संबंधित तलाठी यांचे नाव लिहिलेले नसल्याने, संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांची नावे शोधण्यास आता अडचण निर्माण झालेली असल्याचे आयोगाच्या प्रकर्षाने निदर्शनास आले आहे.
३. सबब सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच त्यांच्या नियंत्रणाखाली सर्व विभाग /कार्यालये यांना पुन्हा सूचित करण्यात येते की, शासनाच्या वतीने करण्यात येणारा सर्व पत्रव्यवहार /प्रत्येक कागदपत्र / आदेश / पावती व इतर कोणत्याही प्रकारच्या दस्तऐवजावर सही करणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांनी सहीखाली स्वतःचे नाव, पदनाम व कार्यालय स्पष्ट शब्दात नमूद करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्याचे पदनाम नमूद करुन “करीता” असा उल्लेख करून पत्रे निर्गमित करण्यात येणार नाही, याची काटेकोरपणे दक्षता घेण्यात यावी.