३. लाड समितीच्या शिफारशी नुसार सफाई कामगारांच्या वारसांना शासकीय / निमशासकीय सेवेत देण्यात येणाऱ्या नियुक्ती संदर्भात पुनर्विचार करून संदर्भीय दिनांक १०.११.२०१५ रोजीचा शासन निर्णय रद्द करुन सुधारीत निर्णय खालीलप्रमाणे घेण्यात येत आहे:-
१) वाल्मिकी, मेहेतर समाजाला सामाजिक, आर्थिक संरक्षण देण्यासाठी सफाई कामगारांच्या नियुक्तीबाबत लाड समितीने शिफारस केलेली वारसा पध्दत पुढे चालू ठेवण्यात यावी.
२) लाड समितीच्या शिफारशी जरी ४० वर्षांपूर्वी लागू केल्या असल्या तरी सद्य:स्थितीत सदर शिफारशी चालू ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार शासन परिपत्रक, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्र. सफाई २०१४/प्र.क्र.०७/महामंडळे दि.२६ फेब्रुवारी २०१४ अन्वये घेण्यात आलेली भूमिका कायम ठेवण्यात यावी.
३) सफाई कर्मचारी म्हणून सेवानिवृत्त झालेल्या किंवा होणाऱ्या अथवा स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या किंवा सेवेत असताना निधन पावलेल्या अनुसूचित जातीमधील इतर सफाई कर्मचाऱ्यांच्या वारस किंवा नातेवाईक यांस सदर योजनेचा लाभ देण्यात यावा.
४) सदरहू निर्णय राज्यातील सर्व विभागातील सफाई कामगारांच्या वारसांना लागू राहतील.
४. सर्व संबधित प्रशासकीय विभाग, शासकीय-निमशासकीय विभाग आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी वरील निर्देशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे बंधनकारक राहील.
५. सफाई कामगारांच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उन्नतीकरीता पागे समितीने केलेल्या शिफारशींच्या अनुषंगाने सविस्तर सूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील.अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
सफाई कामगाराच्या/ कर्मचाऱ्याच्या वारसास वारसा पद्धतीने नेमणूक देण्याची कार्यपद्धतीबाबतच्या शासन निर्णयात सुधारणा करण्यासाठी समिती गठीत करणे बाबत,सान्याव वी सहावि शा नि क्र सफाई२०१५/ प्र क्र २६८ / महामंडळे दि २/२/२०१६
सफाई कामगाराच्या / कर्मचाऱ्याच्या वारसास वारसा पद्धतीने नेमणूक देण्याची कार्यपद्धती यापुढे सुरु ठेवण्याबाबत,सा- न्या व विशेष सहय्य विभाग शा परिपत्रक क्र सफाई-२०१५/प्र क्र २६८ /महामंडळे दि १०/११/१५
लाड पागे समितीच्या शिफारसी नुसार वारसा हक्काच्या अंमलबजावणी साठी,सा- न्या व विशेष सहय्य विभाग शा परिपत्रक क्र सफाई-२०१४/प्र क्र ०७ /महामंडळे दि २६/२/१४
लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांच्या वारसा हक्काच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर सूचना उपरोक्त दि.२१ऑक्टोबर, २०११ च्या परिपत्रकाव्दारे देण्यात आलेल्या आहेत. तथापि, त्यानुसार कार्यवाही करतांना नियुक्ती प्राधिका-यांना अडचणी येत असल्याचे तसेच वारसा हक्काची प्रकरणे प्रलंबित राहत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यास अनुसरुन पुढीलप्रमाणे
सूचना देण्यात येत आहेत :-
१) उपरोक्त शासन परिपत्रक दि. २१ऑक्टोबर, २०११ मधील (१) (अ) ६ मध्ये वरील १ ते ५ येथील कोणीही वारस उपलब्ध नसल्यास अथवा सदर वारसांपैकी कोणीही सफाईचे काम करण्यास तयार नसल्यास संबंधीत सफाई कामगाराचा सांभाळ करण्याची लेखी हमी घेणारी कोणीही नामनिर्देशित व्यक्ती ” अशी सुधारणा याद्वारे करण्यात येत आहे.
२) सेवानिवृत्त झालेल्या सफाई कामगाराच्या वारसा हक्काच्या प्रकरणी कार्यवाही होवून नियुक्ती मिळण्यापूर्वी संबंधीत सफाई कामगारास वारस/नामनिर्देशनामध्ये बदल करावयाचा असल्यास त्या कामगारास वारस/नामनिर्देशनामध्ये बदल करण्याचा अधिकार राहील.
३) सफाई कामगाराच्या सेवानिवृत्तीनंतर संबंधितास वारसाहक्कानुसार नियुक्ती मिळण्यापूर्वी सफाई कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसा हक्कामध्ये बाधा येणार नाही. तसेच त्या कामगाराने मृत्यूपूर्वी दिलेले संमतीपत्र ग्राहय राहिल आणि त्यानुसार त्याच्या वारसास/नामनिर्देशित व्यक्तीस नियुक्ती देण्यात येईल.
४) शासकीय/निमशासकीय कार्यालये, अनुदानित संस्था इ. मध्ये सन १९७५ पासून लाड-पागे समितीच्या शिफारशीच्या अंतर्गत वारसा हक्काच्या नियुक्तीची कार्यवाही सुरु असलेल्या प्रलंबित प्रकरणांमध्ये (दि.२१ ऑक्टोबर, २०११ पूर्वीच्या) अर्ज करण्याची मुदत लागू राहणार नाही. मात्र नविन प्रकरणांना वारसा हक्काच्या नियुक्तीकरीता अर्ज करण्याची मुदत शासन परिपत्रक दि.२१ ऑक्टोबर, २०११ नुसार सफाई कर्मचारी दिवंगत किंवा सेवानिवृत्त किंवा विकलांग झाल्याच्या दिनांकापासून १ वर्षाची राहिल. याबाबत असेही स्पष्ट करण्यात येते की, वारसा हक्काबाबत त्या कामगारास व त्याच्या कुटुंबास सविस्तर माहिती देण्याची जबाबदारी संबंधित कार्यालय प्रमुखाची राहिल. तसेच नियतवयोमानानुसार निवृत्त/स्वेच्छानिवृत्त, मयत, वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरलेल्या सफाई कामगाराच्या कार्यालयाने त्यांच्या कार्यालयीन आदेशात वारसा हक्काबाबतच्या तरतुदी स्पष्टपणे नमुद कराव्यात. जेणेकरुन कोणत्याही सफाई कामगाराचा वारस माहिती अभावी वारसा हक्कापासून वंचित राहणार नाही.अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
जिल्हा परिषदेतर्गत अर्धवेळ सफाई काम करणाऱ्या कर्मचाऱ्याना विनाअट सेवेत सामावून घेण्याबाबत,ग्रामविकास परिपत्रक क्र पदनि-१९०९/ प्र क्र ३६२/ आस्था १०/ दि १८/४/२०११
लाड पागे समितीच्या शिफारसी नुसार वारसा हक्क दि 18/08/2006
परिपत्रक :- नगरपालिका/ महानगरपालिकांमधील सफाई कर्मचा-यांना विकंलागतेनंतर किवा सेवा निवृत्तीनतर किता वैद्यकीय दृष्ट्या अपात्र ठरविल्यानंतर किवा मृत्यू नंतर त्याच्या जागी वारसा हक्काने नियुक्ती देण्याची लाड समितीच्या शिफारशीप्रमाणे चालू असलेली पध्दत पूर्वी प्रमाणेच चालू राहिल सफाई कर्मचा-याच्या वारसा हक्कास कोणतीही बाधा येणार नाहीः वारसा हक्कानुसार सेवेत समाविष्ट करताना वारसदाराच्या पात्रतेनुसार खालील व्यक्ती वारस म्हणून पात्र असतील :-
१) पती / पत्नी
२) मुलगा / सुन
३) अविवाहित मुलगी
४) विधवा / घटस्फोटीतु मुलगी
५) विधवा / घटस्फोटीत बहीण,
६) वरील पैकी कोणताही वारस उपलब्ध नसल्यास त्याचा सांभाळ करण्याची लेखी हमी देणारी जवळची नातेवाईक किंवा नामनिर्देशित व्यक्ति.
येथे हे स्पष्ट करण्यात येते की, तारसाहक्क हा मुलतः नगरपालिका/महानगरपालिकामधील सफाई कामगाराचा आहे, त्यामुळे अशा सफाई कामगाराच्या कोणत्याही प्रकारच्या निवृत्ती नतर त्याच्या हयातीत त्याचा साभाळ करण्याची लखी हमी देणा-या उपरिनिर्दिष्ट वारसांपकी कोणालाही त्याला नामनिर्देशित करता येईल. निवृत्त सफाई कर्मचा-यांने असे नामनिर्देशन पत्र दिल्यानतर इतर सर्व वारसाकडून अशा नियुक्तीकरिता त्यांचे संमती पत्र घेण्याची आवश्यकता नाही. परंतु त्याच्या मृत्यू नंतर मात्र त्याच्या वारसास वारसा हक्काप्रमाणे नियुक्ती देण्यापूर्वी इतर सर्व वारसदारांचे संमती पत्र प्राप्त करणे पूर्वी प्रमाणेच सुरु राहिल.
२ वारसा हक्काच्या रिक्त जागा भरण्यासाठी आस्थापना खचाच्या मर्यादेची अट कानून टाकावी या मागणीबाबत असे स्गष्ट करण्यात येते की, वारसा हक्काच्या रिक्त जागा भरताना सेवा निवृत्त झालेल्या किंवा मृत झालेल्य सफाई कामगाराच्या जागी त्याच्या वारसास नियुक्ती दण्यात येत असल्याने एकूण कर्मचा-याची सख्या वाढत नाही तसंच आधीच्या कर्मचा-याच्या जागी नदीन सफाई कर्मचारी लागला म्हणून खर्चाच्या टक्केवारीच भंग झाला असं होत नाही त्यामुळे आस्थापना खचांच्या मर्यादेची अट काढण्याची आवश्यकता नाही, परंतु वारसा हक्काने नेमणुकीस खचांची मर्यादा लागणार नाही, असे स्पष्ट करण्यात येत आहे.
३ वारसा हक्काच्या रिक्त जागा भनांना न.पा. महानगरपालिकेच्या कर्मचारी आकृती बधाची अट नसावी, तसेच सदर नेनणूकीस, स्थायी/ अस्थायी पदे हा प्रकार करु नये हया मागणीबाबत असे स्पष्ट करण्यात येते की. सफाई कामगाराच्या बाबतीत त्याच्या वारसांना स्थायी / अस्थायी पदांवर नेमणूक देता येईल अशा सुचना नगर प्रशासन संचालनालयाच्या परिपत्रक नप्रसं २००५/न्गडकमिटी / प्रक्र ११५(५)/२६ दि. २३/९/२००५ अन्वये निर्गमित केलेल्या आहेत. त्यानुसार आकृतीबंधामुळे तसंच स्थायी / अस्थायी पदामुळे कोणत्याही सफाई कामगारांच्या वारसा हक्काच्या नेमणूकीबाबत अडचण निर्माण होणार नाही. तसेच सफाई कामगारांच्या बाबतीत निवृत्त / मयत झालेल्या कर्मचा-यांच्या जागी वारसा हक्काने कर्मचारी लागत असल्यामुळे एकूण कर्मचारी वाढत नाहीत त्यामुळे आकृतीबंधाची अट वारसा हक्कांपुरती लागणार नाही, असे स्पष्ट करण्यांत येत आहे.अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
महाराष्ट्र सफाई कर्मचारी आयोगाने सन १९९८-९९ च्या अहवालावरील शिफारशीबाबत,सा प्र वि शा परिपत्रक क्र बी सी सी २००२ /१९५२/प्र कर ६५ २००२ /१६-ब दि १/१०/२००३
श्री. लाड व पागे समितीने मेहतर, वाल्मिकी समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी शिफारशी केलेल्या आहेत त्या अनुषंगाने, सामान्य प्रशासन विभाग, समाजकल्याण, सांस्कृतिक कार्य, क्रिडा व पर्यटन विभाग व नगर विकास विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णय/शासन परिपत्रकाव्दारे देण्यात आलेल्या आदेशांचे/सूचनांचे शासकीय / निमशासकीय / महानगरपालिका/नगरपालिका/नगर परिषदा/ मंडळे/महामंडळे/स्वायत्त संस्था/अनुदानित संस्था इत्यादी आस्थापनेवरील कर्मचारी/अधिकारी या आदेशांची सूचनांची अंमलबजावणी करण्याबाबत अनास्था दाखवित आहेत. ही बाब निश्चितच गंभीर स्वरुपाची असल्याने याबाबत शासनाने गंभीर दखल घेतलेली आहे.
२. महाराष्ट्र सफाई कर्मचारी आयोगाने सन १९९८-९९ च्या पहिल्या अहवालातील शिफारशींवर शासनाने विचार करुन खालीलप्रमाणे निदेश देण्यात येत आहेत.
(अ) लाड व पागे समितीने शिफारस केल्यानुसार शासकीय/निमशासकीय मंडळे/महामंडळे/स्वायत्त संस्था/महानगरपालिका/नगर परिषदा / नगरपालिका/ खाजगी संस्था तसेच कारखाने इत्यादीच्या आस्थापनेवर मेहतर, वाल्मिकी_समाजाच्या उमेदवारांची नोकरभरती करताना त्याच्या वारसास/जवळच्या नातेवाईकास प्राधान्य देण्यात येते ते चालू ठेवावे, याबाबत आवश्यकता भासल्यास त्यांचे सेवाभरतीचे नियम शिथील करुन त्याची अंमलबजावणी करण्यात यावी.
(ब) शासकिय/निमशासकिय कार्यालयातील सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील ज्येष्ठता यादीतील मेहतर-वाल्मिकी, भंगी या जातीच्या उमेदवारांची त्यांच्या जातीचा विचार करुन नव्हे तर त्यांची शैक्षणिक अर्हता विचारात घेऊन त्या आधारे त्यांची नेमणूक करण्यात येईल, यासंबंधी विशेष खबरदारी घेण्यात यावी.
(क) मेहतर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीची अनुसूचित जातीकरिता वर्ग-४ मध्ये ज्या रिकाम्या जागा राखून ठेवलेल्या असतात त्या जागांच्या संबंधात गणना करण्यात येणार नाही. त्यांची सरळसेवेने भरती करावी. मेहेतरांच्या संख्येचा वार्षिक विवरणात दर्शविलेल्या वर्ग चारच्या आकड्यांमध्ये समावेश होणार नाही. हे आकडे वार्षिक विवरणपत्रात स्वतंत्र प्रवर्गामध्ये दर्शविण्यात आले पाहिजेत. वर्ग चार संबंधातील आकड्यांमध्ये मेहेतरांची संख्या समाविष्ट नाही अशा अर्थाची टीप वार्षिक विवरणाच्या शेवटी विनिर्देशपूर्वक समाविष्ट करण्यात आली पाहिजे.
(ड) मेहतर, वाल्मिकी समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी लाड व पागे समितीने केलेल्या शिफारशीवर समाजकल्याण, सांस्कृतिक कार्य, क्रिडा व पर्यटन विभाग, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग आणि नगर विकास विभाग यांनी वेळोवळी शासन निर्णय/शासन परिपत्रक इत्यादी व्दारे आदेश/सूचना निर्गमित केलेल्या आहेत त्यांचे पालन सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, तसेच मंडळे, महामंडळे यांनी ही करावी.
(ई) मेहतर, वाल्मिकी समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी शासनाने निर्गमित केलेले आदेशाचे/सूचनांची अंमलबजावणी करण्यास शासकीय / निमशासकीय/महानगरपालिका/नगरपालिका/स्वायत्त संस्था इत्यादी आस्थापनेवरील कर्मचारी/अधिकारी हेतुपुरस्सर टाळाटाळ, कुचराई करतील त्यांच्याविरुध्द सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्र.बीसीसी-१०९३/६९७/१६-ब, दिनांक १२ जून, १९९५ अनुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी.अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
