Sunday, September 7, 2025
Sunday, September 7, 2025
Home » प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

0 comment 1.3K views

मिशन शक्ती च्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुधारित प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0 राज्यात लागू करण्याबाबत. सार्वजनिक आरोग्य विभाग 09-10-2023 सांकेतांक क्रमांक 202310091151258717

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत कार्यप्रणाली सार्वजनिक आरोग्य विभाग 20-02-2019 सांकेतांक क्रमांक 201902081305568617

प्रधानमंत्री मातृ वंदना या योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांकः क्रमांक : मासका-२०१७/प्र.क्र.४९३/कुक नविन मंत्रालय १० वा मजला, गो.ते. रुग्णालय, संकुल इमारत लो.टि. मार्ग, मुंबई – ४०० ००१ तारीख: ०८ डिसेंबर, २०१७

भारतातील दारिद्र रेषेखालील व दारिद्र रेषेवरिल अनेक गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत मजूरीसाठी काम करावे लागते. तसेच प्रसुतीनंतर शारिरिक क्षमता नसतानाही मजूरीसाठी तात्काळ काम करावे लागते. त्यामुळे अशा गर्भवती महिला व बालके कुपोषित राहून त्यांचे व त्यांच्या नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. यामुळे देशाच्या मातामृत्यू व बालमृत्यू दरात वाढ होते.

या योजनेचा शासन निर्णय दिनांक 08-12-2017 रोजी निर्गमित करण्यात आला असून, केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृ वंदना ही नवीन योजना संपूर्ण देशात 01 जानेवारी 2021 पासून कार्यान्वीत केली आहे. सदर योजना केंद्र पूरस्कृत असून या योजनेमध्ये शासनाचा 60 टक्के व राज्य शासनाचा 40 टक्के सहभाग आहे.

योजनेचे उद्दिष्ट :- 1- माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करुन त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी. 2- जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचे आरोग्य सुधारावे आणि मातामृत्यू व बालमृत्यू दरात घट येऊन तो नियंत्रणात रहावा. 3- प्रसुतीपूर्व प्रसुतीपश्चात महिलेला आपली बुडीत मजूरी मिळावी यासाठी प्रधानमंत्री मातृ वंदना कार्यान्वीत केली आहे.

योजनेचे निकष :- शासनाने अधिसुचित केलेल्या संस्थेत शासकिय रुग्णालये नोंदणी केलेल्या गर्भवती महिलेस तिच्या पहिल्या जिवंत अपत्यापर्यंत एकदाच लाभ अनुज्ञेय असून, लाभाची र.रु.5000/- इतकी आहे. वेतनासह मातृत्व रजा मिळवणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय रहाणार नाही. मात्र लाभार्थी गर्भवती महिलेस खाली दर्शविल्याप्रमाणे रु.5000/- बँक सलग्न खात्यात किंवा पोस्ट खात्यातDBT Through PFMS व्दारे समाजातील सर्व स्तरातील मातांना तीन टप्प्यांत जमा केली जाते.

पहिला हप्ता :- 1000/- मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून 150 दिवसांत शासकिय संस्थेत गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर प्राप्त होतो.

दुसरा हप्ता :- 2000/- किमान एकदा प्रसुतीपूर्व तपासणी केल्यास गर्भधारणेचे सहा महिने तथा 180 दिवस पूर्ण झाल्यानंतर लाभार्थीच्या खात्यात जमा केले जातात.

तिसरा हप्ता :- 2000/-प्रसुतीनंतर बाळाचे 14 आठवडयापर्यंतचे सर्व लसीकरण पूर्ण झाल्यानंतर लाभार्थीच्या खात्यात जमा केले जातात.

आवश्यक कागदपत्र :- लाभार्थी व तिच्या पतीचे आधार कार्ड, आधार सल्ग्न बँक किंवा पोस्ट खाते, माता व बाल संगोपन कार्ड, बाळाचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र.

ग्रामीण व शहरी क्षेत्र :- आरोग्य सेविका व आशा कार्यकर्ती पात्र लाभार्थींना विना शुल्क विहित नमुन्यातील अर्ज देऊन, प्रा.आ.केंद्र व नागरी प्रा.आ.केंद्रामार्फत तालुका आरोग्य अधिकारी /मुख्याधिकारी यांचेकडे सादर करुन विहित संकेत स्थळी लाभार्थ्यांची माहिती भरण्यात येते व राज्यस्तरावरुन संगणक प्रणालीव्दारे थेट लाभ दिला जातो.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

प्रधानमंत्री मातृ वंदना या योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांकः क्रमांक : मासका-२०१७/प्र.क्र.४९३/कुक नविन मंत्रालय १० वा मजला, गो.ते. रुग्णालय, संकुल इमारत लो.टि. मार्ग, मुंबई – ४०० ००१ तारीख: ०८ डिसेंबर, २०१७

You Might Be Interested In

You may also like

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

89005

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare.