Thursday, September 4, 2025
Thursday, September 4, 2025
Home » संत सेवालाल महाराज बंजारा / लमाण तांडा समृध्दी योजना

संत सेवालाल महाराज बंजारा / लमाण तांडा समृध्दी योजना

0 comment 406 views

बंजारा/लमाण/लभाण तांड्यात ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी लोकसंख्येची अट शिथिल करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांकः तांसुयो-२०२४/प्र.क्र.४३/आस्था-५ बांधकाम भवन, २५ मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई-४०० ००१. दिनांक : ०९ ऑक्टोबर, २०२४.

ग्रामविकास विभागाच्या दिनांक १२.०२.२००४ रोजीच्या शासन निर्णयानुसार सद्यस्थितीमध्ये स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी तांडा भागासाठी १००० इतकी लोकसंख्या आवश्यक आहे. सदर १००० इतक्या लोकसंख्येची अट शिथिल करुन बंजारा/लमाण/लभाण तांडा भागासाठी ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी ७०० इतकी लोकसंख्या करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

संकेताक २०२४१००८१८२९३०९६२०

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

संत सेवालाल महाराज बंजारा / लमाण तांडा समृध्दी योजनेसाठी निधी अर्थसंकल्पीत करण्याकरीता नवीन लेखाशीर्ष उघणेबाबत…
ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक : तांडासुधार-२०१९/प्र.क्र.६७/आस्था-५ तारीख: १० मे, २०२४.

महाराष्ट्र राज्यात अनेक बंजारा / लमाण तांडे असून, अशा तांडयामध्ये बंजारा समाज अनेक वर्षापासून राहत असला तरी अशा बंजारा/लमाण तांडयामध्ये प्राथमिक मुलभूत सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यासाठी महाराष्ट्र राज्यातील बंजारा / लमाण तांडयाच्या विकासासाठी स्वतंत्र संत सेवालाल महाराज बंजारा / लमाण तांडा समृध्दी योजना ही ग्राम विकास विभागामार्फत संदर्भाधिन शासन निर्णयान्वये मंजूर करण्यात आली असून सदर योजनेकरिता निधी अर्थसंकल्पीत करण्यासाठी खालीलप्रमाणे नवीन स्वतंत्र लेखाशिर्ष उघडण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

संत सेवालाल महाराज बंजारा/लमाण तांडा समृध्दी योजना. ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांकः तांडा सुधार-२०१९/प्र.क्र.६७/आस्था-५ दिनांक : २३ फेब्रुवारी, २०२४.

बंजारा/लमाण तांड्यासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करणे व सामुहीक विकासाच्या विविध मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी “संत सेवालाल महाराज बंजारा/लमाण तांडा समृद्धी योजना राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे. ग्राम विकास विभागाच्या दिनांक १२ फेब्रुवारी, २००४ रोजीच्या शासन निर्णयानूसार सद्यस्थितीमध्ये स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी तांडा भागासाठी किमान १००० इतकी लोकसंख्या व दोन गावातील ३ कि.मी. अंतर असणे आवश्यक आहे. बंजारा/लमाण तांड्यासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या दोन गावातील ३ कि. मी. अंतराची अट शिथील करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तसेच तांड्याच्या विकासासाठी आवश्यक मुलभूत सुविधा पुरविण्यास, सदर योजनेसाठी रु.५०० कोटीचा निधी उपलब्ध करण्यास व या योजनेसाठी स्वतंत्र लेखाशिर्ष घेण्यास मान्यता देण्यात येत आहे.
अ) तांड्यासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करणे :-
ग्राम विकास विभागाच्या दिनांक १२ फेब्रुवारी, २००४ रोजीच्या शासन निर्णयानुसार सद्यस्थितीमध्ये स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी तांडा भागासाठी किमान १००० इतकी लोकसंख्या व दोन गावातील ३ कि.मी. अंतर असणे आवश्यक आहे. बंजारा/लमाण तांड्यासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या दोन गावातील ३ कि.मी. अंतराची अट शिथील करण्यास मान्यता देण्यात येत आहे. ज्या तांड्यांची लोकसंख्या १००० पेक्षा कमी आहे, अशा ठिकाणी एकापेक्षा जास्त तांडे एकत्रित करून गट ग्रामपंचायत स्थापन करण्यास तसेच ज्या तांड्यांची लोकसंख्या १००० व त्यापेक्षा जास्त आहे व त्याच्या आजुबाजूला आणखी एक दोन छोटे तांडे आहेत, तर अशा प्रकरणीही गट ग्रामपंचायत स्थापन करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
तांड्यासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी जसे की, तांडा अधिकृतरित्या घोषित करणे, तांड्याना स्वतंत्र महसूली गावांचा दर्जा देणे व सदर बाबीसाठी समिती गठीत करणे इत्यादीसाठी पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
(৭) बंजारा/लमाण तांडा घोषित करणे लोकसंख्येमध्ये दरवर्षी बदल होणार हे लक्षात घेता, तांड्यातील लोकसंख्येची मोजणी करताना जनगणनेच्या निकषाबरोबर या तांड्यामधील हंगामी स्थलांतरीत लोकसंख्या लक्षात घेऊन त्याप्रमाणे ग्रामसभेने ठराव पारीत करुन तो ग्रापंचायतीकडे पाठविण्याची कार्यवाही करावी. त्यानंतर अशा प्रस्तावाची तपासणी करुन आवश्यक त्या दुरुस्तीनंतर प्रस्तावाची अंमलबजावणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीकडे पाठविण्याची कार्यवाही गट विकास अधिकारी यांनी करावी.

(२) बंजारा/लमाण तांड्यांना स्वतंत्र महसुली गावांचा दर्जा देणे- महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, खांदेश या भागात मोठ्या प्रमाणात बंजारा/लमाण समाज राहत असून पश्चिम महाराष्ट्र व इतर विभागात विखुरलेल्या स्वरुपात बंजारा/लमाण समाज राहत आहे, परंतू त्या वसाहतीला तांड्याचे स्वरुप नसल्यामुळे कोणतेही अभिलेख व जागेचे नेमके क्षेत्रफळ किती याबाबत सुस्पष्टता नसते. बंजारा/लमाण समाजाची अशी होणारी गैरसोय टाळणे गरजेचे असल्यामुळे अशा तांड्यापासून २ कि.मी. परिसरातील ३५० लोकसंख्या असलेल्या वसाहतींनासुद्धा पुनर्वसित गावाप्रमाणे तांड्यांचा/महसूली गावाचा दर्जा देण्यात यावा. त्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ च्या कलम ४ (१) अनुसार सर्व तांड्यांना महसुली गावाचा दर्जा देण्यात यावा व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ च्या कलम ४ (१) अनुसार समितीमार्फत प्रत्येक तांड्याला महसूली गाव घोषित करण्याचा प्रस्ताव तयार करून महसूली गाव घोषित करण्याची कार्यवाही करण्यात यावी.
(३) बंजारा/लमाण तांडा वस्ती घोषित करणे, गावठाण जाहिर करणे, तांड्याला महसूली गाव घोषित करण्याची कार्यवाही करणे, ग्रामपंचायत स्थापन करण्याची कार्यवाही करणे इ. व इतर अनुषंगिक कार्यवाहीसाठी जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात यावी –

समितीची कार्यकक्षा :-
अ. बंजारा/लमाण तांडा घोषित करणे.
ब. गावठाण जाहिर करणे.
क. बंजारा/लमाण तांड्यांना महसूली गाव घोषित करणे.
ड. ग्रामपंचायत स्थापन करण्याचा प्रस्ताव तयार करणे व तांडयांसाठी ग्रामपंचायत स्थापन करण्याच्या अनुषंगाने पुढिल योग्य ती कार्यवाही करणे.
इ. इतर सर्व अनुषंगिक कामे.
उपरोक्त नमूद कार्यवाही प्राधान्यक्रमाने पूर्ण करण्यात यावी. प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत दरमहा आढावा बैठक घेण्यात यावी.
ब) बंजारा/लमाण तांड्यांचा विकास –
बंजारा / लमाण तांड्यांच्या विकासासाठी तांडयातील रहिवाश्यांच्या गरजा लक्षात घेवून “संत सेवालाल महाराज बंजारा/लमाणतांडा समृधी योजनेंतर्गत” सर्व आवश्यक मुलभुत सुविधा पुरविण्यात याव्यात. तसेच तांड्यांना द्यावयाच्या मुलभुत सुविधा या शासनाच्या प्रचलित मुलभुत सुविधा पुरविण्याच्या धोरणांनुसार उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
उपरोक्त मुलभूत सुविधा पुरविण्याच्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी-
(৭) योजनांतर्गत घेतलेल्या कामांच्या बाबतीत पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी प्रत्येक तांड्यात सर्व आवश्यक मुलभूत सुविधेच्या उपलब्धीसबंधी Mapping करण्यात यावे व पुढील ३ वर्षात सर्व सुविधा प्रत्येक तांड्यात उपलब्ध होतील याबाबतचा कार्यक्रम आखून कार्यान्वित करण्यात यावा.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

पारदर्शकता:- शासकीय निर्णय आणि परिपत्रके थेट शासकीय संकेतस्थळावरून प्राप्त करून घेतलेली असल्याने त्यात कोणताही बदल केलेला नाही असे वेबसाइट स्पष्टपणे नमूद करते. तसेच ह्या संकेतस्थळाचा कोणताही व्यावसायिक हेतु नाही.


You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

80815

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare.