Friday, November 13, 2026
Friday, November 13, 2026
Home » ग्रामपंचायत हद्दीत : जाहिरात फलक, होर्डिंग्ज बोर्डसाठी मान्यता देण्याचे अधिकार -Within Gram Panchayat Limits: Authority to Grant Approval for Advertising Boards and Hoardings.

ग्रामपंचायत हद्दीत : जाहिरात फलक, होर्डिंग्ज बोर्डसाठी मान्यता देण्याचे अधिकार -Within Gram Panchayat Limits: Authority to Grant Approval for Advertising Boards and Hoardings.

3 comments 3.3K views

ग्रामपंचायत हद्दीत जाहिरात फलक (होर्डिंग्ज) लावण्याच्या परवानगीबाबत धोरण/नियम करण्याकरिता समिती स्थापन करणेबाबत
महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांकः व्हीपीएम २०२५/०९/पंरा-४ (ई-ऑफीस क्र. ९७१०३४) बांधकाम भवन, मर्झबान पथ, फोर्ट मंत्रालय, मुंबई-४०० ००१ तारीखः ६ मे २०२५
[Regarding the constitution of a committee to formulate a policy/rules for granting permission to erect advertisement boards (hoardings) within Gram Panchayat limits.]

मा.उच्च न्यायालय, मुंबई रिट याचिका क्र.८६५७/२०२४ संदर्भातील दि.२१ ऑगस्ट २०२४ च्या आदेशात ग्रामपंचायतीला जाहिरात फलक/होर्डिंग लावण्यासाठी परवानगी देण्याबाबत अधिकार नसल्याचे नमूद केले आहे. तसेच मा.उच्च न्यायालय, मुंबई येथील जनहित याचिका क्र.१५५/२०११ याचिकेत अनधिकृत जाहिराती, घोषणा फलक, होर्डिंग, पोस्टर्स बाबत विस्तृत आदेश दिले आहेत. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ तसेच त्याअंतर्गत महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम १९६० मध्ये सद्यस्थितीत ग्रामपंचायत हद्दीत जाहिरात – फलक (होर्डिंग्ज) लावण्याबाबत कोणतीही तरतूद अथवा नियम नाहीत.जाहिरात फलक/होर्डिंग लावण्याबाबत/परवानगी याबाबत नगर विकास विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे धोरण /नियम विहीत केलेले आहेत. ग्रामपंचायत हद्दीत जाहिरात फलक/होर्डिंग लावण्यास विहीत पद्धतीने परवानगी
दिल्यास त्यापासून ग्रामपंचायतीना उत्पन्न प्राप्त होणार आहे. जाहिरात फलक/होर्डिंग उभारण्यातून निर्माण होणा-या आपत्ती घडू नये यानुषंगाने ग्रामपंचायत हद्दीत जाहिरात फलक/होर्डिंग लावण्याबाबत तसेच त्यासाठीच्या परवानगी याबाबत दिनांक ०३/०२/२०२५ रोजी मा. मंत्री (ग्रामविकास) महोदय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने धोरण/नियम करण्याबाबत साधक बाधक विचार विनिमय होणे अपेक्षित असल्याने समिती स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF तारीखः ६ मे २०२५ वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……..
पारदर्शकता:- शासकीय निर्णय आणि परिपत्रके थेट शासकीय संकेतस्थळावरून प्राप्त करून घेतलेली असल्याने त्यात कोणताही बदल केलेला नाही असे वेबसाइट स्पष्टपणे नमूद करते. तसेच ह्या संकेतस्थळाचा कोणताही व्यावसायिक हेतु नाही. https://gramvikaseseva.com/ ही महाराष्ट्र शासनाशी संबंधित शासकीय निर्णय (Government Resolutions – GR) आणि परिपत्रके (Circulars – CR) यांची माहिती विषयनिहाय माहिती उपलब्ध करणारे एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. या वेबसाइटचे मुख्य उद्दिष्ट शासकीय अधिकारी, कर्मचारी,नागरिकांना शासकीय धोरणे, नियम, आणि योजनांबाबत अद्ययावत आणि परिपूर्ण माहिती प्रदान करणे आहे.

ग्रामपंचायत हद्दीत ग्रामपंचायतीला कोणत्याही प्रकारचे जाहिरात फलक / होर्डिंग्ज बोर्डसाठी मान्यता देण्याचे अधिकार नसल्याबाबत मा. उच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी.
महाराष्ट्र शासन ग्राम विकास व पंचायती राज विभाग शासन परिपत्रक क्र. व्हीपीएम-२०२४/प्र.क्र.१३३/पंरा-४ दिनांक :- २६ नोव्हेंबर, २०२४ [Implementation of the Hon. High Court’s orders regarding the lack of authority of the Gram Panchayat to grant approval for any type of advertisement boards or hoardings within its jurisdiction.]

मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या रिट याचिका.क्र. ८६५७/२०२४ संदर्भातील दि.२१.८.२०२४ च्या आदेशात निदर्शनास आल्याप्रमाणे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ तसेच त्याअंतर्गत अस्तित्वात असलेल्या नियमात व महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम १९६० मध्ये ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये ग्रामपंचायतीला कोणत्याही प्रकारचे जाहिरात फलक / होर्डिंग्ज लावण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र अथवा परवानगी देण्याची तरतुद नाही. सबब राज्यातील ग्रामपंचायतींनी, ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये कोणत्याही प्रकारचे जाहिरात फलक / होर्डिंग्ज लावण्यासाठी ना- हरकत प्रमाणपत्र अथवा मान्यता देण्याचे नियमबाह्य कृत्य करु नये. नियमबाह्य कृत्य करणाऱ्या संबंधितांवर प्रचलित कायद्यतील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल. राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी त्यांच्या हद्दीतील अनधिकृत जाहिरात फलक / होर्डिंग्ज काढून टाकण्याची तात्काळ कार्यवाही करावी.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF दिनांक :- २६ नोव्हेंबर, २०२४ वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी………

#mukhymantrisamrudhiabhiyan #mspa #governmentofmaharashtra#maharashtra#checklist#MaharashtraGovernment #GovernmentGR #GovernmentResolution #MaharashtraGR #GR #Maharashtra Government #Government Resolution #GR #Government Decision #DIVABATTI TAX #FACTORY TAX #Government Decision #Government Resolution #GR #Gram Panchayat Taxes and Fees #GRAMPANCHAYAT KAR AKARNI, #GRAMPANCHAYAT TAXES #KARKAHANA TAX #Maharashtra Government #MAJI SANIK TAX #MIDC #MIDC TAX #MOBILE TOWER TAX #PAVAN CHAKKI TAX #PROPERTY TAX #SANIK VIDHVA TAX, #SANITARY TAX #SOLAR PROJECT TAX #TAX FREE #taxation-at-industrial-rate #Encrochment #gharkul #Pandit dindayal upadhay gharkul #atikraman #permision #building #construct #Maharashtra Regional and Urban Planning Act

या संकेतस्थळावरील Contact Form / Feedback Form वापरू शकता.

आपल्याला येथील माहिती उपयुक्त वाटल्यास ही वेबसाइट आपल्या सहकारी, मित्रपरिवार आणि संबंधित व्यक्तींसोबत शेअर करू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://gramvikaseseva.com/grampanchyat-kar-v-fee/https://gramvikaseseva.com/tower-fee/

You Might Be Interested In

You may also like

3 comments

ग्रामपंचायत: ISO - ग्रामविकास E-सेवा October 12, 2026 - 3:18 pm

[…] सरपंच-उपसरपंच निवडणूक ग्रामपंचायत हद्दीत : जाहिरात फलक, होर्… ग्रामपंचायत कर्मचारी : कार्यवाही […]

Reply
ग्रामपंचायत विकास कामे- Gram Panchayat Development Works - ग्रामविकास E-सेवा October 12, 2026 - 3:28 pm

[…] सरपंच-उपसरपंच निवडणूक ग्रामपंचायत हद्दीत : जाहिरात फलक, होर्… ग्रामपंचायत कर्मचारी : कार्यवाही […]

Reply
ग्रामपंचायत कार्यालय, भवन बांधकाम-Gram Panchayat Office, Building Construction - ग्रामविकास E-सेवा October 13, 2026 - 8:07 am

[…] ना-हरकत प्रमाणपत्राची… ग्रामपंचायत हद्दीत : जाहिरात फलक, होर्… माजी सैनिक,शौर्य पदक धारक मालमत्ता […]

Reply

Leave a Comment