लिपिक टंकलेखक या पदासाठी मराठी/ इंग्रजी टंकलेखन प्रमाणपत्र धारण करणेबाबत सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक १२/०१/२०२३
लिपिक-टंकलेखक या पदाच्या सेवाप्रवेश नियमातील तरतुदीनुसार सदर पदावर नियुक्तीसाठी मराठी किंवा इंग्रजी टंकलेखन यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येत असले तरी, प्रस्तावनेत नमूद पार्श्वभूमीवर लिपिक-टंकलेखक पदावर नियुक्तीनंतर प्रत्यक्ष शासकीय कामकाज पार पाडण्याच्या दृष्टीने, या शासन निर्णयाद्वारे पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.
१) महाराष्ट्र शासनात सर्व कामकाज मराठी भाषेतून करण्यात येते. यास्तव, संदर्भाधिन क्रमांक २ च्या अधिसूचनेनुसार केवळ इंग्रजी टंकलेखन प्रमाणपत्र धारण करणा-या उमेदवाराची लिपिक-टंकलेखक पदावर नियुक्ती झाल्यानंतर, त्याने नियुक्तीच्या दिनांकापासून ४ वर्षांत मराठी टंकलेखनाचे किमान ३० शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे विहीत प्रमाणपत्र सादर करणे सक्तीचे आहे. अन्यथा, त्याची वार्षिक वेतनवाढ रोखण्याची तरतूद सदर अधिसूचनेत केली आहे.
शासन निर्णय क्रमांकः एसआरव्ही २०२३/प्र.क्र.१/कार्यासन १२
२) शासकीय कामकाज मराठी भाषेतून होत असले तरीही काही विशिष्ट कार्यालयांमधील बहुतांश कामकाज इंग्रजी भाषेतून पार पाडावे लागते. (उदा. न्यायालय व न्यायाधिकरणातील सरकारी वकिलांची कार्यालये) यास्तव, केवळ मराठी टंकलेखन प्रमाणपत्र धारण करणा-या उमेदवाराची अशा शासकीय कार्यालयात लिपिक-टंकलेखक या पदावर निवड झाल्यास, त्या उमेदवाराने नियुक्तीच्या दिनांकापासून ४ वर्षांत इंग्रजी टंकलेखनाचे किमान ४० शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे विहीत प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे राहील. अन्यथा, त्याची वार्षिक वेतनवाढ रोखण्यात येईल.
नियुक्ती प्राधिकारी यांनी लिपिक-टंकलेखक पदावर निवड झालेल्या उमेदवाराकडे मराठी/इंग्रजी यापैकी कोणते टंकलेखन प्रमाणपत्र आहे ही बाब तपासून, नियुक्ती आदेशात वरील १ किंवा २ यापैकी आवश्यकतेनुसार योग्य ती तरतूद नमूद करण्याची दक्षता घ्यावी.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
शासन सेवेत निवृत्ती होताना माजी सैनिक उमेदवारांना टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन संधी तसेच दोन वर्ष इतकी मुदतवाढ देण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक १३/०६/२०१९
शासन सेवेत माजी सैनिक उमेदवारांना जर गट "क" संवर्गातील पदांवर नियुक्ती मिळाली, तर ज्या पदांसाठी टंकलेखन अर्हता आवश्यक आहे, अशा सर्व पदांवर नियुक्त होणाऱ्या माजी सैनिक
शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१८०/२८
उमेदवारांना टंकलेखनाची (इंग्रजी/मराठी) परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी नियुक्तीच्या दिनांकापासून २ वर्षाच्या कालावधीत व २ संधीत सदर परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अवधी व संधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
२. माजी सैनिक उमेदवारांना गट "क" संवर्गातील पदांवर नियुक्ती दिलेल्या व शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत नियुक्तीपासून २ वर्षे पूर्ण न झालेल्या उमेदवारांनाही सदर प्रमाणपत्र सादर करण्यासाठी उमेदवारांच्या नियुक्तीपासून २ वर्षे इतकी मुदत देण्यात येत आहे.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
इंग्रजी टंकलेखक / लिपिक टंकलेखक/ लघुटंकलेखक/लघुलेखक संवर्गाची दि ०-१-१९९१ ची अधिसूचना सुधारित करणेबाबत सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक २४/०३/२०१७
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३०९ च्या परंतुकाव्दारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, महाराष्ट्राचे राज्यपाल याद्वारे "महाराष्ट्र नागरी सेवा (इंग्रजी लघुलेखक व इंग्रजी टंकलेखक यांना प्राप्त करावयाच्या मराठी लघुलेखन व मराठी टंकलेखन परीक्षा सक्तीची करण्याबाबत) नियमावली, १९९१ मध्ये करावयाचे सुधारणा नियम, २०१७ सोबतच्या अधिसूचनेन्वये (मराठी व इंग्रजी) दर्शविल्याप्रमाणे शासन विहित करीत आहे.
उपरोक्त अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या असाधारण राजपत्रात स्वतंत्ररित्या प्रसिद्ध करण्यात येत आहेत. सदर शासन निर्णय निर्गमित केल्याच्या दिनांकापासून लागू राहील.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
महाराष्ट्र नागरी सेवा (इंग्रजी लघुलेखक व इंग्रजी टंकलेखक परीक्षा ) सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक ३०/०९/१९९३
१. या नियमात महाराष्ट्र नागरी सेवा [इंग्रजी लघुलेखन व इंग्रजी टंकलेखक यांच्यासाठी सक्तीची मराठी लघुलेखन व मराठी टंकलेखन परीक्षा (सुधारणा) नियमावली, १९९३ असे म्हणता येईल.
२० महाराष्ट्र नागरी सेवा [इंग्रजी लघुलेखक व इंग्रजी टंकलेखक यांच्यासादी सक्तीची मराठी लघुलेखन व मराठी टंकलेखन परीक्षा नियमावली १९९१ [यात्त यापुढे जिया उल्लेख "मुख्य नियमावली" असा केला आहे] च्या नियम ६ मधील पोटनियम (दोन मध्ये "१५ जुलै "या मूल मजकूराऐवजी "१५ ऑगस्ट" हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल.
३. मुख्य नियमावलीच्या नियम ९ नंतर पुढील नियम समाविष्ट करण्यात येईल आणि तो नेहमीसाठी समाविष्ट करण्यात आला असल्याचे समजण्यात येईल.
"९७. या नियमांमध्ये काहीडी अंतर्भूत असले तरी, ऑक्टोबर १९९१ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत जो उत्तीर्ण झाला आहे असा प्रत्येक इंग्रजी लघुलेखक किंवा इंग्रजी टंकलेखक विद्यमान प्रशिक्षण योजनेनुसार मिञ्णा-या लाभात पात्र असण्याचे चालू राहील.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
इंग्रजी लघुलेखक (निवड श्रेणी, उच्च श्रेणी व निम्मं श्रेणी ) व इंग्रजी टंक लेखक यांना मराठी लघु लेखन मराठी टंकलेखन परीक्षा सक्तीची करण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक ०६/०५/१९९१
शासकीय कर्मचा-यांकरिता मराठी टंकलेखन व लघुलेखन प्रशिक्षण योजना शासनाने कार्यान्वित केली होती व एतदर्थ मंडळाची परीक्षा उत्तीर्ण होणा-या कर्मचा-यांना प्रोत्साहनात्मक बक्षीस देण्यात येत होते. शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की अशी प्रोत्साहनात्मक बक्षीसे देवून देखील इंग्रजी लघुलेखक व टंकलेखक यांचेकडून पुरेसा प्रतिसाद मिळाला नाहीं. यास्तव या बाबतीतील सध्याचे सर्व आदेशांचे अधिक्रमण करून शासन आता असे आदेश देत आहे की, महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील इंगंजी लघुलेखक [निवड श्रेणी, उच्च श्रेणी व निम्न श्रेणी] व इंग्रजी टंकलेखक यांनी प्राप्त करावयाच्या मराठी लघुलेखन/मराठी टंकलेखन अर्हतेबाबतची नियमावली भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३०९ च्या परंतुकान्वये अधिसूचनेच्या स्वत्पात राजपत्रात प्रसिध्द करण्यात यावी. त्यानुसार सदर अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यात येत आहे व प्रसिध्द केल्यानंतर आवश्यक त्या प्रती सर्व संबंधितांना शासन मुद्रणालय व लेखनसामग्री यांचेकडून निर्गमित करण्यात याव्यात.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........