वाचा :-
१) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र. ओएफटी-१०८२/८/अठरा (र.व का.), दि.२२ मार्च, १९८२,
२) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र. शामऊ-१०८७/३४१/२९-अ. दि.३ एप्रिल, १९८७
परिपत्रक
शासकीय कर्मचाऱ्यांना विशेषतः महिला कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेनंतर कार्यालयात उशिरा यांबवू नये आणि रविवारी वा सुट्टीच्या दिवशी शक्यतो कामावर बोलावू नये यासंबंधी वेळोवेळी आदेश निर्गमित केले आहेत.
२. शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की, तातडीचे काम किंवा विधिमंडळाच्या अधिवेशन कालावधीत मंत्रालय विभाग किंवा शासकीय कार्यालयामध्ये महिला कर्मचाऱ्यांना संध्याकाळी कार्यालयीन वेळेनंतर बराच वेळ उशिरा थांबविण्यात येते. तसेच, रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी महिला कर्मचाऱ्यांना कामावर बोलावण्यात येते. याबाबत वरील आदेशानुसार काढण्यात आलेल्या आदेशांचे एकत्रिकरण करुन सर्व मंत्रालयीन विभागांना पुन्हा सूचित करण्यात येते की, शासकीय महिला कर्मचाऱ्यांना शक्यतो उशिरा थांबवू नये. परंतु, तातडीचे काम किंवा विधिमंडळ अधिवेशन कालावधीत थांबविणे अनिवार्य असल्यास. ज्या महिला कर्मचाऱ्यांना संध्याकाळी ६.३० नंतर उशिरापर्यंत थांबविलेले असेल त्यांना संबंधित विभागाने नजिकच्या रेल्वे स्टेशनवर जबाबदारीने सोडण्याची व्यवस्था करावी. तसेच, रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी कामावर बोलावणे आवश्यक वाटल्यास विभागाच्या कार्यालय प्रमुखांच्या अनुमतीनेच त्यांना त्या दिवशी कार्यालयात बोलाविण्यात यावे. वरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.
महिला कर्मचा-यांना कार्यालयीन वेळेनंतर थांबविणे