ग्रामपंचायत हद्दीतील सौरउर्जा प्रकल्पावर कर आकारणी करणे बाबत. ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक ०२-०७-२०१८ PDF मध्ये प्राप्त करून घेण्यासाठी येथे CLICK करावे.
सौरऊर्जा हा ऊर्जेचा स्वच्छ व प्रदूषणविरहित स्त्रोत असून भविष्यातील उर्जेचे संकट निवारण्यासाठी सौरऊर्जेद्वारे वीजनिर्मितीस प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेता, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम १२४ व त्याअंतर्गत महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी (शुल्क) नियम, १९६० यांमधील तरतुदींनुसार ग्रामपंचायत हद्दीतील सौरऊर्जा प्रकल्पांवर कर आकारणी करून वसुली खालीलप्रमाणे करण्यात यावी.
१) सौर ऊर्जा वीज निर्मिती प्रकल्पांना केवळ जमीन / मोकळा भूखंड गृहीत धरून जमिनीच्या भांडवलीमूल्याच्या आधारे कर आकारणी करण्यात यावी. भांडवली मूल्य निश्चितीसाठी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या वार्षिक मूल्य दर तक्त्यातील बिनशेती जमिन/भूखंडाचे दर घेण्यात यावे.
२) वाचा येथील अधिसूचनेमधील नियम २० खालील अनुसूची अ मधील तक्ता ४ मध्ये नमूद करण्यात आलेल्या जमिनीवरील कराच्या किमान दराने कर आकारणी करण्यात यावी.
३) तथापि, सौर ऊर्जा प्रकल्पातील सौर संयंत्राव्यतिरिक्त अन्य बांधकामांना/इमारतींना नियमाप्रमाणे कर आकारणी करण्यात यावी
४) संपूर्ण सौर ऊर्जा प्रकल्पास औद्योगिक व वाणिज्यिक भारांक अनुज्ञेय राहणार नाही.
५) निवासी, व्यावसायिक, औद्योगिक इमारतींच्या छतावरील सौरऊर्जा वीज निर्मितीच्या संयंत्रणांना मालमत्ता कर आकारणी करण्यात येऊ नये.
६) सौर ऊर्जा प्रकल्प बंद असला तरी कर आकारणी करण्यात येईल.
७) सौर ऊर्जा प्रकल्पांवर कर आकारणी करण्याबाबत स्पष्टता नसल्याने सौर ऊर्जा प्रकल्पांवर पूर्वलक्षीप्रभावाने वरीलप्रमाणे कर आकारण्यात यावी. तसेच यापूर्वीची वसुलीची रक्कम जास्त असल्यास सदर रक्कम परत न करता आणि त्यावर कोणतेही व्याज न देता पुढील वर्षांमध्ये करण्यात येणाऱ्या कर आकारणीच्या रक्कमेशी टप्प्या टप्प्याने पुस्तकी समायोजन करावे.अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
ग्रामपंचायत हद्द मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना प्रकल्प मालमता कर आकरणी बाबत सवलत, ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक 11-6-2018 अधिक माहिती व शासन निर्णया साठी येथे CLICK करावे
जमिनींवर वा सौर ऊर्जा प्रकल्पांना महसुल अथवा स्थानिक स्वराज्य संस्था इ. विभागाकडून आकारण्यात येणाऱ्या सर्व करांतून प्रकल्प उभारणीपासून ३० वर्षापर्यंत सुट राहील” अशी तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीच्या अनुषंगाने ग्रामपंचायत हद्दीतील महानिर्मिती कंपनीने महाऊर्जाकडे नोंदणी केलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पांना मालमत्ता कर आकारणीमध्ये प्रकल्प उभारणीपासून ३० वर्षांपर्यंत सवलत अनुज्ञेय राहील. परंतु सदरील प्रकल्प हा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत असल्याबाबतचे सक्षम प्राधिकाऱ्याचे (महानिर्मिती/महाऊर्जा यांचे) प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. संबंधित प्राधिकरणाने प्रमाणपत्रामध्ये सदरील प्रकल्पाचा उभारणीपासून ३० वर्षापर्यंतचा कालावधी नमूद करावा.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
ग्रामपंचायत स्तरावरील कर व फी आकारणी बाबत अधिक माहिती व शासन निर्णया साठी येथे CLICK करावे
-
562
-
901
-
602
-
1.6K