Thursday, April 24, 2025
Thursday, April 24, 2025
Home » ग्रामसभा

ग्रामसभेच्या बैठकी (१) (प्रत्येक वित्तीय वर्षी] विहित करण्यात येईल अशा तारखेस, अशा वेळी व जागी आणि अशा रीतीने), ग्रामसभेच्या निदान (चार सभा) घेण्यात येतील आणि जर सरपंच किंवा त्याच्या अनुपस्थितीत उपसरपंच, पुरेशा कारणाशिवाय अशा चारपैकी कोणतीही सभा] घेण्यास चुकला तर] तो सरपंच किंवा यथास्थिती, उपसरपंच म्हणून चालू राहण्यास किंवा पंचायतीच्या सदस्यांच्या उरलेल्या पदावधीसाठी त्या अधिकारपदावर निवडला जाण्यास निरर्ह (अनर्ह) ठरेल; आणि अशी सभा बोलावण्यात कोणतीही कसूर केल्याबद्दल प्रथमदर्शनी जबाबदार असल्याचे आढळून आले तर पंचायतीचा सचिव देखील निलंबित करण्यास आणि संबद्ध नियमांन्वये तरतूद केल्याप्रमाणे, त्याच्या विरुद्ध अशी इतर शिस्तभंगाची कारवाई करण्यास पात्र असेल.] असे पुरेसे कारण होते किंवा नाही या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम असेलः।

 (२) स्थायी समितीने, पंचायत समितीने किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने] सामान्य किंवा विशेष आदेशाद्वारे याबाबत प्राधिकृत केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याला प्रामसभेच्या बैठकीचे कामकाज चालू असताना भाषण करण्याचा व अन्य रीत्या त्यात भाग घेण्याचा अधिकार असेल, परंतु त्याला मत देण्याचा अधिकार असणार नाही.

*[(३) या आधिनियमात अन्यथा तरतूद केली नसेल, तर पंचायतीच्या प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतरच्या ग्रामसभेच्या पहिल्या सभेत, आणि त्यानंतर, दरवर्षीच्या पहिल्या सभेमध्ये सरपंच व त्याच्या अनुपस्थितीत उपसरपंच अध्यक्षस्थानी राहील, आणि ग्रामसभेच्या, वर्षातील त्यानंतरच्या इतर सर्व सभांमध्ये, ग्रामसभेच्या सभेमध्ये उपस्थित असलेल्या व्यक्तींकडून निवडलेली एखादी व्यक्ती अध्यक्षस्थानी राहील.)

(४) एखाद्या व्यक्तीला ग्रामसभेच्या बैठकीला हजर राहण्याचा हक्क आहे किंवा काय या विषयी कोणताही विवाद निर्माण झाल्यास, अध्यक्षस्थानी असलेली व्यक्ती, यथास्थिती, संपूर्ण गावाच्या किंवा त्याच्या प्रभागाच्या मतदारांच्या यादीतील नोंद लक्षात घेऊन अशा विवादाचा निर्णय करील आणि तिचा निर्णय अंतिम असेल.

**[(५) ग्रामसभेच्या महिला सदस्यांची सभा, पोट-कलम (१) अन्वये बोलावलेल्या ग्रामसभेच्या प्रत्येक नियमित सभेपूर्वी घेण्यात येईल आणि सरपंच अशा सभेची कार्यवृत्ते ग्रामसभेच्या प्रत्येक नियमित सभेसमोर आणील किंवा आणण्याची व्यवस्था करील, आणि ग्रामसभा महिला सदस्यांच्या सभेमध्ये केलेल्या शिफारशींचा विचार करील, आणि पंचायत अशा शिफारशींच्या अंमलबजावणीची खात्री करील :

परंतु, जर ग्रामसभा महिला सदस्यांच्या सभेमध्ये केलेल्या शिफारशींशी सहमत नसेल तर, ती त्याबद्दलच्या कारणांची नोंद करील.]

[(५अ) प्रभागाचे प्रतिनिधित्व करणारा प्रत्येक पंचायत सदस्य, ग्रामसभेच्या प्रत्येक नियमित सभेपूर्वी आणि ग्रामसभेच्या महिला सदस्यांच्या सभेपूर्वी, अशा प्रभागातील सर्व मतदारांची सभा बोलावील आणि अशा प्रभाग सभेमध्ये, प्रभागाचा विकास, राज्याच्या किंवा यथास्थिती, केंद्र सरकारच्या व्यक्तिगत लाभार्थी योजनांसाठी व्यक्तिगत लाभार्थीची निवड करणे, विकास प्रकल्प व कार्यक्रम यांच्याशी संबंधित प्रश्नांवर आणि प्रभाग सभेला योग्य वाटतील अशा, ग्रामसभेच्या नियमित सभेसमोर विचारार्थ आणि निर्णयार्थ ठेवले जाण्याची शक्यता असलेल्या इतर संबंधित प्रश्नांवर चर्चा करण्यात येईल, असा सदस्य आपल्या सहीनिशी अशा सभेची कार्यवृत्ते ठेवील आणि त्या कार्यवृत्तांची एक प्रत पंचायतीला अवश्य पाठवील आणि ती प्रत पंचायतीच्या अभिलेखाचा भाग होईल.]

(६) गावामध्ये काम करीत असलेल्या शासकीय, निमशासकीय व पंचायतीच्या कर्मचाऱ्यांवर तसेच त्यांच्या कार्यालयातील रोजच्या उपस्थितीवर देखील ग्रामसभेचे शिस्तविषयक नियंत्रण असेल.

ऑगस्ट महिन्यातील ग्रामसभा घेणे बाबत शासन निर्णय  दि 12/08/2021

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ७ घेण्यात येणा-या ग्रामभेच्या आयोजनास परवानगी देनेबाबत ग्रामविकास विभाग पत्र शासन निर्णय दि 11 फेब्रुवारी 2021

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ७ घेण्यात येणा-या ग्रामभेच्या आयोजनास परवानगी देनेबाबत ग्रामविकास विभाग पत्र ग्रामसभा 31 मार्च 2021 पर्यंत स्थगिती शासन निर्णय दि 20 जानेवारी 2021

पूर्ववत ग्रामसभा घेणेबाबत  महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम 7 अन्वये घेण्यात येणा-या ग्रामसभेच्या आयोजनास परवानगी देणेबाबत शासन निर्णय दि 15 जाने 2021

कोरोना पार्श्वभूमीवर ग्रामसभा स्थगिती बाबत पत्र शासन निर्णय 12-05-2020

ग्ग्रारामपंचायती मार्फत आयोजित करावयाच्या ग्रामसभा व इतर विभागांनी त्यांचे विषय ग्रामसभेसमोर ठेवण्याबाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय दि 27 एप्रिल 2018

दिनांक १ एप्रिल २०१४ पासून ग्राम सभा, मासिक सभा, महिला सभा,महिलासभा,वार्डसभा विविध समित्यांच्या बैठकांच्या सूचना कार्यवृत्त इतिवृत्त विहित नमुन्यातच ठेवणे अनिवार्य करणेबाबत व माहितीसाठी ग्रामपंचायत फलकावर उपलब्ध करणेबाबत 25.06.2014

ग्रामसभेच्या सूचना भ्रमणध्वनी किंवा संगणका द्वारे पाठविन्याबाबत शासन निर्णय दि. 25-06-2013

ग्रामसभा अधिनियम, नियम ,परिपत्रक दि 12-02-2004

ग्रामपंचायतींच्‍या बैठकींचे कार्यवृत्‍त- पंचायती राज समीतीची शीफारस. ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्रमांक:- क्र.व्‍ही.पी.एम.2688/1395/(3141)21, दिनांक:- 17-11-1988

ग्रामपंचायतीची ग्रामसभा-पंचायत राज समितीची शिफारस, ग्रामविकास विभाग शासन निर्णय दि १०-८-१९८८

पंचायत समीती स्‍तरावर होणा-या मासीक बैठकीमध्‍ये ग्रामसभेचे इतीवृत्‍त आणण्‍या बाबत – पंचायत राज समीतीची या बाबतची शीफारस.ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्रमांक:- व्‍ही.पी.एम.-2687/832/3080-21, दिनांक:- 29-06-1988

ग्राम सभांच्‍या बैठका घेणे बाबत. ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्रमांक:- PRC-1076/2411/CR-1824/XXIII-B, दिनांक:- 19-06-1979

ग्रामपंचायतीची ग्रामसभा व मासीक सभा – पंचायत राज समीतीची शीफारस. ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्र :- पी.आर.सी.1077/2703(सी.आर.2732)तेवीस, दिनांक:- 12-09-1978

ग्रामपंचायतीनी ग्रामसभा व मासीक सभा वेळेवर व नियमीतपणे घेणेबाबत पंचायत राज समीतीने केलेल्‍या शीफारसींबाबत. ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्रमांक:- क्र.पी.आर.सी.1076/2411/ तेवीस, दिनांक:- 07-01-1977

ग्राम सभा – बोंगीरवार समितीचा अहवाल क्र.186 व 187 नुसार शीफारसी. ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्रमांक:- VPM.1272/48004-E, दिनांक:- 18-11-1972

ग्रामपंचायत व ग्रामसभा यांच्‍या सभाना ग्रामपातळीवरील कामगाराना बोलावणे बाबत. ग्क्ररामविकास विभाग शासन निर्णय :- क्र.व्‍ही.पी.एम.ञ2671/26284-इ, दिनांक:- 22-06-1971

मुंबई ग्रामपंचायत अधीनियम 1958 चे कलम 7 व 36 नुसार ग्रामसभा व ग्रामपंचायत सभा भरवण्‍या बाबत सरंपंचाची कर्तव्‍य. ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्रमांक:- VPM/1369/36449-E, दिनांक:- 24-09-1970

मुंबइ ग्रामपंचायत अधीनियम 1958 चे कलम 7 व 36 नुसार ग्रामपंचायतींच्‍या ग्रामसभा व पंचायत सभा भरवणे बाबत कर्तव्‍ये. ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्रमांक:- VPM-1309/14608-E, दिनांक:- 14-05-1969

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

19818

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare.