बीम्स् प्रणालीवर आहरण व संवितरण आधिकारी यांना दिलेली प्राधिकार पत्र रद्द (Undo ) करण्याची सुविधा बंद करणेबाबत. वित्त विभाग 12-02-2015
बीम्स् प्रणालीवरील प्राधिकारपत्र रद्द करण्याची (Undo) सुविधा आहरण व संवितरण अधिकाऱ्याकरिता बंद करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने खालील आदेश देण्यात येत आहेत.
१) यापुढे बीम्स् प्रणालीवर प्राधिकारपत्र रद्द (Undo) करण्याची आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकरिता असलेली सुविधा बंद करण्यात येत आहे.
२) प्राधिकारपत्र रद्द करुन पुन्हा नवीन प्राधिकारपत्र तयार करावयाचे असल्यास ही सुविधा संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांचे बीम्स् प्रणालीवरील नियंत्रक अधिका-यास उपलब्ध राहील.
३) स्वतः आहरण व संवितरण असलेले आधिकारी व विधानसभा/विधानपरिषद सदस्य (Self-Drawing & Disbursing Officer) यांना सदर परिपत्रकातून सूट देण्यात येत आहे.
४) याबाबतची दुरुस्ती बीम्स प्रणालीवर करण्यात यावी.
५) आहरण व संवितरण अधिकारी यांनी प्राधिकारपत्र तयार करतेवेळेस रकमा, अदात्याचे नाव व इतर तपशील अचूक भरावा व त्यानंतरच देयक प्राधिकारपत्र काढावे. आहरण व संवितरण अधिकारी यांनी काढण्यात आलेले देयक प्राधिकारपत्र रद्द (Undo) करावयाचे असल्यास, सदरचे देयक प्राधिकारपत्र रद्द (Undo) करण्याची सविस्तर कारणे, तसेच कोणत्या परिस्थितीत ते रद्द करणे भाग पडले आहे, त्याच्या तपशिलासह आहरण व संवितरण अधिकाऱ्यांने नियंत्रक अधिका-यास लेखी स्वरुपात कळवावीत. तद्नंतरच नियंत्रक अधिका-याकडून सदर देयक प्राधिकारपत्र रद्द (Undo) करण्यात येईल. देयक प्राधिकारपत्राच्या वैधता कालावधी बाबतच्या सूचना संदर्भीय दिनांक १८-१२-२०१० च्या परिपत्रकाप्रमाणे कायम राहतील.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
अर्थसंकल्पिय उद्वीष्ट शिर्षाचे सांकेतांक लेखांकीत करण्याबाबत वित्त विभाग 10-08-2010
केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासनानेही दि.१६.१.२००८ च्या शासन निर्णयात बदल करून सन २०११-१२ पासून उदिदष्ट शिर्ष क्र.३५ हे भांडवली मत्तेच्या निर्मिती करीता अनुदान आणि उदिदष्ट शिर्ष क्र.३६, सहाय्यक अनुदाने (वेतन) साठी वापरण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
आहरण व संवितरण अधिका-यांच्या माहितीतील बदल करण्यासाटी संगणीकृत प्रस्ताव सादर करण्याची कार्यपध्दती वित्त विभाग 09-02-2010
१) आहरण व संवितरण अधिकाऱ्याच्या माहितीतील बदलाचा संगणकीकृत प्रस्ताव सादर करण्याची सुविधा अर्थसंकल्प अंदाज वितरण व संनियंत्रण प्रणाली (BEAMS) बीम्स वरील आहरण व संवितरण अधिकाऱ्याच्या फायनल मोडला उपलब्ध असेल.
२) ज्या आहरण व संवितरण अधिकाऱ्याला त्याच्या पदनामाच्या माहितीत बदल करावयाचा असेल त्यांनी "बीम्स" प्रणालीवर आहरण व संवितरण अधिकारी संकेतांक युजर आय डी टाकून फायनल मोड मध्ये प्रवेश करावा (Login)
३) त्यानंतर मेन्टेनन्स मेनू मध्ये "Change DDO Details Proposal" हा विकल्प दिसेल. त्यावर क्लीक केल्यानंतर माहितीत बदल करावयाचा नमुना उपलब्ध होईल.
४) या नमुन्यामध्ये सर्वात प्रथम पदनाम बदल, त्यानंतर कार्यालयात बदल व शेवटी आहरण व संवितरण अधिकाऱ्याच्या सध्याच्या कोषागारात बदल करण्याबाबत सुविधा देण्यात आली आहे.
५) या तीन कारणांपैकी योग्य त्या एक किंवा एकापेक्षा जास्त कारणाच्या रकान्यात दिलेल्या चौकोनात क्लीक करावे म्हणजे त्या ठिकाणी बरोबरची खुण उमटेल व आवश्यक बदल नोंदविण्यासाठी रकाने उपलब्ध होतील. रकान्यात आवश्यक त्या नवीन बदलाची माहिती नोंदवावी / भरावी.
६) आहरण व संवितरण अधिकाऱ्याच्या सध्याच्या पदनामात बदल करावयाचा असल्यास तो बदल कोणत्या कारणास्तव करावयाचा आहे म्हणजेच अधिकाराचे प्रत्यायोजन, श्रेणीवाढ / श्रेणीघट किंवा इतर कारण यापैकी योग्य चौकोनात क्लीक करावे.
७) त्यानंतर तो बदल ज्या शासन निर्णय / कार्यालयीन आदेश / परिपत्रकान्वये झाला असेल त्याची माहिती त्यासाठी दिलेल्या रकान्यात भरावी. त्याचा क्रमांक व दिनांक भरावा. यामध्ये २ पैकी किमान १ नोंद करणे अनिवार्य असेल.
८) शेवटी सुरक्षीततेच्या दृष्टीकोनातून दर्शविलेला इंग्रजी शब्द त्या खालील रिकाम्या जागेत भरुन सबमीट या बटणावर क्लीक करावे. त्यानंतर "आपल्याला प्रस्ताव तयार करावयाचा आहे काय?" अशी विचारणा करणारा संदेश दिसेल. त्याखाली OK बटणावर क्लीक केल्यानंतर संगणकीकृत प्रस्ताव स्क्रिनवर दिसेल. सदर पत्रासोबत सहपत्रासह प्रस्ताव संचालक, लेखा व कोषागारे, संगणक शाखा, पाचवा मजला, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई येथे सादर करावा.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
आहरण व संवितरण अधिकारी संकेतांक प्रदान करावयाची संगणकीकृत कार्यपध्दती, वित्त विभाग 24-06-2009
१) शासनाच्या संगणक प्रणालीवर असणा-या उपरोक्त जोडणीवर क्लीक करावे.
२) त्यानंतर आहरण व संवितरण अधिकाऱ्यास सोबत जोडल्याप्रमाणे माहिती भरण्यासाठी नमुना उपलब्ध होईल.
३) त्यामध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी.
४) "सबमीट" या बटणावर क्लीक केल्यावर संगणकीय प्रणालीद्वारे व्यवहार क्रमांक नमूद केलेले मागणीपत्र तयार होईल.
५) सदरच्या मागणी / विनंती पत्राची संगणीकृत प्रत काढून त्यासोबत संबंधित शासन निर्णय व महालेखापाल, मुंबई /नागपूर तसेच अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई यांचेकडून प्राप्त प्राधिकार पत्रासोबत प्रस्ताव लेखा व कोषागारे संचालनालयास सादर करावा लागेल.
सदर प्रस्ताव लेखा व कोषागारे संचालनालयास प्राप्त झाल्यानंतर संबंधीत प्रस्ताव तपासून प्रणालीवरच मान्यता दिली जाईल व त्यानंतर आहरण व संवितरण अधिकारी संकेतांक प्रदान करण्याबाबतचे पत्र प्रणालीद्वारे निर्मित होईल. सदर पत्राची प्रत संबंधीत आहरण व संवितरण अधिकाऱ्याला पाठविली जाईल.
प्रशासनिक विभागांनी नविन कार्यालय / आहरण व संवितरण अधिकारी घोषित करताना या परिपत्रकाचा संदर्भ
2.देऊन आहरण व संवितरण अधिकारी संकेतांकासाठी परिपत्रकात नमूद केलेली कार्यवाही करण्याबाबत संबंधितांना निर्देश द्यावे.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
अर्थसंकल्पीय उद्दिष्टशिर्षाचे सांकेतांक लेखांकित करण्याबाबत, वित्त विभाग 16-01-2008
सद्याच्या अर्थसंकल्प लेखांकनाप्रमाणे काही उद्दिष्टांमधून ब-याच बाबींवर खर्च होतो व तो बाबनिहाय वेगवेगळा दर्शविण्यात येत नाही. यास्तव, अधिक सुस्पष्टता येण्यासाठी शासन असा निर्णय घेत आहे की, ‘खाली नमूद केलेले उद्दिष्टशिर्ष क्र.०६, १० व ३५ नव्याने उघडण्यात येत असून उद्दिष्टशिर्ष क्र. १३, १८, २९ व ३१ च्या वर्णनामध्ये काही बदल करण्यात येत आहे’.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
अर्थसंकल्प वितरण प्रणाली कार्यान्वयीत करणेबाबत, वित्त विभाग 15-05-2007
१. महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, २००७ क्रमांक १० म्हणून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग-४, दिनांक १६ एप्रिल, २००७ रोजी प्रसिध्द करण्यात आले आहे. अर्थसंकल्पामध्ये. उपलब्ध झालेली १००% तरतूद खालील अपवाद वगळता विभागाला परस्पर मासिक निधी विवरणपत्रान्वये खर्च करण्यास उपलब्ध करण्यात येत आहे.
२. खालील बाबींवरील अर्थसंकल्पीय तरतूदी वित्त विभागाच्या अनुमतीशिवाय खर्च करता येणार नाहीत-
(अ) बाराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार केलेल्या सर्व तरतूदी.
(ब) केंद्र शासनाकडून प्राप्त होणारा निधी व राज्य शासनाच्या हिश्याचा निधी हा केंद्र शासनाकडून निधी प्रत्यक्ष प्राप्त झाल्याशिवाय वितरित करता येणार नाही अशा तरतूदी.
(क) भांडवली अर्थसंकल्प विहित पध्दतीने मंजूर झाल्याशिवाय महामंडळाच्या भांडवली अंशदानासाठी केलेल्या तरतूदी.
(ड) विद्युत महामंडळ व त्या अंतर्गत असणा-या कंपन्या यांना देय अर्थसहाय्य, भाग भांडवल व कर्जाच्या तरतूदी.
(इ) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास सवलतीपोटी देय अर्थसहाय्याच्या तरतुदी.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
उप-शीर्षे उघडण्याबाबत सुधारित पध्दत,वित्त विभाग 06-01-2001
शासकीय खर्चमेळांचे काम, वित्त विभाग 02-02-1994
(1) प्रत्येक प्रशासकीय विभागाने त्यांच्या अधिपत्याखालील विविध कार्यालयातील नियंत्रक अधिका-यां-जी अद्ययावत यादी दरवर्षी सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात प्रसिध्द कारावी. (जोडपत्र-एक)
(2) गहालेखापालांच्या कार्यालयातील लेखे जुलै अखेर पूर्ण. केले जातात. ॥तात. त्यामुळे खर्चाच्या ताळमेळाचे काम त्या वर्षीचे लेखे पूर्ण होण्याच्या आधी पूर्ण करण्यात यावे. जर अपवादात्मक परिस्थितीत वरील मुदतीत ते पूर्ण करता आले नाहीत तर त्यानंतर डिसेंबर पूर्वी त्यातील दुरुस्त्या महालेखापालांच्या कार्यालयाच्या निदर्शनास आणून चुकीच्या नोंदी (नोट्स ऑफ एरर) महालेखा -पालांच्या कार्यालयाकडून मिळविण्यात याव्यात.
(3) प्रशासकीय विभागांनी संबंधित नियंत्रक अधिकारी खर्चगळाचे काम नेमून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे करतात याची खात्री करुन घ्यावी. यासाठी विभागीय प्रधान सचिवांनी/सचिवांनी प्रत्येक तिमाहीला खर्चमेळाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बैठका घ्याव्यात.
(4) खर्चगळाचे काम करणा-या कर्मचा-यांना खर्चमेळाच्या कामात अडचण उद्भवल्यास गहालेखापालां-च्या गंबंधित नेम्वा अधिका-यांना भेटून त्यांच्या शंका/अडचणी दूर करून घ्याव्यात.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........