Monday, September 8, 2025
Monday, September 8, 2025
Home » प्रधानमंत्री उज्ज्वला 2.0 योजना [PMUY]

प्रधानमंत्री उज्ज्वला 2.0 योजना [PMUY]

0 comment 108 views

पंतप्रधान उज्ज्वला 2.0 योजना राज्यातील बिगर गॅस जोडणीधारकांना राज्य शासनामार्फत गॅस जोडण्या वितरीत करण्याबाबत. महाराष्ट्र शासन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शासन निर्णय क्रमांकः रॉकेल-२०१९/प्र.क्र.३२/ना.पु.२७, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२ दिनांक: २४ जुलै, २०१९

१. योजनेचे निकष :-

१) जी शिधापत्रिकाधारक कुटूंबे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व विस्तारीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजना-२ यांच्या उपरोक्त निकषांमध्ये पात्र ठरणार नाहीत अशा कुटुंबासाठी ही योजना लागू राहील, मात्र सदर कुटूंब राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी अथवा आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यातील राज्य शासनाच्या शेतकरी योजनेचे लाभार्थी असणे आवश्यक राहील. २) सदरची गॅस जोडणी ही कुटूंबातील कुटुंबप्रमुख प्रौढ स्त्रीच्या नावाने मंजूर करण्यात येईल. ३) एक शिधापत्रिकाधारक कुटूंब एकच गॅस जोडणी मिळण्यास पात्र राहील.

१. योजनेची कार्यपध्दती :-
विभागामार्फत गॅसधारक शिधापत्रिका व बिगर गॅसधारक शिधापत्रिका यांची माहिती तयार करण्यात आली असून ती NIC मार्फत आधारकार्डशी जोडण्यात आलेली आहे. सदर माहिती ही जिल्हाधिकारी यांना दुकाननिहाय पाठविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सदरची माहिती अधिकृत शिधावाटप दुकानदारांना पाठवतील.
तसेच जिल्हास्तरावरील तेल कंपनीचा नियुक्त अधिका-याच्या सहकार्याने गॅस एजन्सी व त्यांना जोडण्यात येणारे शिधावाटप दुकाने यांची यादी तयार करेल. तसेच शिधावाटप दुकानात नवीन गॅसजोडणीचे अर्ज दिले जातील. शिधापत्रिकाधारक अधिकृत शिधावाटप दुकानामध्ये ज्यावेळी केरोसिन घेण्यासाठी येतील त्यावेळी त्यांच्याकडून दुकानदारामार्फत गॅस जोडणीचा फॉर्म भरुन घेण्यात येईल. तथापि, शिधापत्रिकाधारक केरोसिन घेण्यास न आल्यास शासनाकडून देण्यात आलेल्या यादीच्या आधारे शिधापत्रिकाधारकाकडून गॅस जोडणीचा फॉर्म भरुन घेण्यात येईल.
जी कुटूंबे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व विस्तारीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजना-२ अंतर्गत पात्र ठरतील त्यांना केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत गॅस जोडणी दिली जाईल. उर्वरित शिधापत्रिकाधारक कुटूंबांना राज्याच्या योजनेतून गॅस जोडण्या देण्यात येतील. बहुतांश शिधापत्रिकाधारक कुटूंबे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व विस्तारीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजना-२ अंतर्गत पात्र ठरतील.
राज्यात सद्यस्थितीत ५२,००० रास्तभाव दुकाने कार्यरत असून २१२२ इतक्या गॅस एजन्सी कार्यरत आहेत. त्यानुसार साधारणतः एका गॅस एजन्सीकडे २५ रास्तभाव दुकानदार नेमण्यात येतील. तसेच लाभार्थ्यांकडून खालील कागदपत्रांच्या छायांकित प्रती घेण्यात येतील :-
१) शिधापत्रिका,
२) कुटूंबप्रमुख स्त्री व कुटूंबातील इतर व्यक्तींचे आधारकार्ड,
३) लाभार्थ्यांचा (कुटूंबप्रमुख स्त्री) बँकेचा तपशील

अर्जदाराचे अर्ज व उपरोक्त कागदपत्रे जमा करुन शिधावाटप दुकानदारांमार्फत संबंधित गॅस एजन्सीला दिली जातील व गॅस एजन्सी ज्यांची कागदपत्रे परिपूर्ण असतील अशा शिधापत्रिकाधारक कुटूंबांना तात्काळ गॅस जोडणी मंजूर करतील.

सांकेताक 201907241358012706

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

https://gramvikaseseva.com/ ही महाराष्ट्र शासनाशी संबंधित शासकीय निर्णय (Government Resolutions – GR) आणि परिपत्रके (Circulars – CR) यांची माहिती विषयनिहाय माहिती उपलब्ध करणारे एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. या वेबसाइटचे मुख्य उद्दिष्ट शासकीय अधिकारी, कर्मचारी,नागरिकांना शासकीय धोरणे, नियम, आणि योजनांबाबत अद्ययावत आणि परिपूर्ण माहिती प्रदान करणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

89160

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare.