धारणाधिकार म्हणजे, सावधि नियुक्तीपदासह ज्या स्थायी पदावर शासकीय कर्मचा-याची कायमपणे नियुक्ती केलेली असेल असे स्थायी पद कायमपणे धारण करण्याचा हक्क, मग असा हक्क तत्काळ निर्माण होवो किंवा त्या पदावरील अनुपस्थितीचा एक किवा त्याहून अधिक कालावधी संपल्यावर निर्माण होवो.
महाराष्ट्र नागरी सेवा ( सेवेच्या सर्वसाधारण शर्ती ) नियम १९८१ नियम २० अन्वये धारणाधिकार संपादित करणे
जो शासकीय कर्मचारी शासन सेवेतील प्रवेशाच्या पदावर किंवा संवर्गात कायम झाला असेल किंवा ज्या पदांसाठी परीविक्षाधिन कालावधी विहित केला असेल तो परीविक्षा कालावधी पूर्ण केल्याचे घोषित केलेल्या वरिष्ठ पदावर ज्याला पदोन्नती देण्यात अल्ली आहे अशा शासकीय कर्मचा-याने त्या पदावर किंवा संवर्गात धारणाधिकार संपादित केला असल्याचे मानण्यात येईल.
महाराष्ट्र नागरी सेवा ( सेवेच्या सर्वसाधारण शर्ती ) नियम १९८१ मधील नियम २० ते २७ अन्वये
नियम २० धारणाधिकार संपादित करणे व समाप्त करणे
नियम २१ शासकीय कर्मचा-याचा एकाच वेळी अधिक पदावर धारणाधिकारअसण्यावर निर्बंध
नियम २२ धारणाधिकार अबाधित राहणे
नियम २३ धारणाधिकाराचे निलंबन
नियम २४ भूतलक्षी प्रभावाने धारणाधिकाराचे निलंबन आणि त्यांनतरची बढती
नियम २५ एका शासकीय कार्यालयातून दुस-या शासकीय कार्यालयात नियुक्ती झाल्यास धारणाधिकार ठेवण्याचा कालावधी
नियम २६: धारणाधिकार दुसऱ्या पदाकडे बदली करणे
२६) नियम २७: ज्याने एखाद्या पदावर् धारणाधिकार संपादित केला असेल त्या शासकीय कर्मचा-याची कमी वेतन असलेल्या पदावर बदली केव्हा अनुदेय ठरते -कमी वेतन असलेल्या पदावर बदली
धारणाधिकाराबाबतचे दिनांक २५-०५-१९५५ शासन परिपत्रक रद्द करण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक १९-११-२०१६