महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम १४० नुसार शासनाने ठरवून दिलेल्या लेखा परिक्षकाकडून लेखापरिक्षण करुन घेणे बंधनकारक आहे. लेखापरिक्षकांकडून लेखा परिक्षण टिपणी प्राप्त झाल्यानंतर ग्रामपंचायतीने लेखापरिक्षकाने दाखवलेले दोष केल्याचे नमूद करुन तीन महिन्यांच्या आत पंचायत समितीकडे पाठविणे आवश्यक आहे.ग्रामपंचायतीने केलेल्या कार्यवाहीस पंचायत समिती सहमत असेल तर आक्षेप वगळण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे शिफारस करु शकेल.लेखापरिक्षा टिपणी प्राप्त झाल्यानंतर ती ग्रामपंचायत मासिक सभेत ठेवून त्यास ग्रामपंचायतीची मान्यता घ्यावी लागते व आक्षेपाचे अनुपालन सुध्दा ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत ठेवून ग्रामपंचायतीची मान्यता घ्यावी लागते.लेखा आक्षेपाच्या अनुपालनासोबत ग्रामपंचायतीच्या ठरावाची प्रत पण सादर करावी लागते.
स्थानिक निधी लेखा आक्षेपाचा निपटारा करण्यासाठी सुधारित जिल्हास्तरीय लेखा परीक्षा गठीत करून संचालक स्थानिक निधी लेखा यांची मान्यता घेवून परीछेद वगळण्याची कार्यवाही करणेबाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक ०३-०९-२०२०
लेखापरीक्षणास कागदपत्र सादर न करण्याबाबत दंडात्मक कारवाई करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक २७-०२-२०१८
विशेष लेखापरीक्षणाचे आदेश देण्यापूर्वी घ्यावयाची दक्षता Click for download वित्त विभाग शासन निर्णय दिनांक ३०-०५-२०१७
ग्रामपंचायतीचे लेखा परीक्षण तसेच स्व उत्पन्नामध्ये वाढ करण्याबाबत Click for download ग्रामविकास विकास विभाग शासन निर्णय दिनांक ०१-०२-२०१६
मुंबई स्थानिक निधी लेखापरीक्षण अधिनियम १९३० मध्ये सुधारणा अधिसूचना दिनांक १० मार्च २०११
ग्रामपंचायत लेखापरीक्षणाची सुधारित कार्यपद्धती Click for download वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 24-09-2008 साठी येथे click करा
ग्रामपंचायत लेखापरीक्षणाची सुधारित कार्यपद्धती Click for download वित्त विभाग शासन निर्णय दिनांक ०७-०७-२००८
वेळेमध्ये लेखा परिच्छेदाची परिपूर्तता करणे बाबत. ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्रमांक:- VPM/1474/44229-E, दिनांक:- 15-07-1975
ग्रामपंचायतीचे लेखापरिक्षण करणे व पंचायत समिती कडून त्वरीत कारवाई बाबत. ग्रामविकास विभाग शासन निर्णय क:- 6769-215-E, दिनांक:- 03-02-1968
लेखा आक्षेप टाळण्यासाठीची तपासणी सूची
तपासणी सूची ता —————— जिल्हा ————–
योजनेचे नांव
कामाचे नांव
मंजूर वर्ष :
कार्यारंभ आदेश निर्गमित करण्यापूर्वी तपासणी सूची | |||
अ क्र | कागदपत्राचा तपशील | सलंग्न आहे / नाही | पान क्र |
1 | सक्षम प्राधिकरणा कडील प्रशाकीय आदेश | ||
2 | सक्षम प्राधिकरणा कडील प्रशाकीय आदेश तांत्रिक मान्यता व अंदाज पत्रक | ||
3 | मंजूर कामाचा कारारनामा | ||
4 | ग्राम पंचायत काम करण्यास इच्छुक असलेचा दाखला/ मागणी पत्र | ||
5 | ग्रामपंचायती कडील मागील ३ वर्षाचे नमुना नं ३ व ४ | ||
6 | मंजूर काम अतिक्रमण विरहीत असल्या बाबत ग्रामपंचायती चा दाखला | ||
7 | जागेचा उतारा ( समाज मंदिर, शौचालय, व्यायाम शाळा बांधकामास लागू , सार्वजिनक कामांना ) | ||
8 | १ टक्के विमा रक्कम भरणा चलन | ||
9 | काम सुरु करण्यापूर्वीचा प्रस्तवित जागेचा जिओ टग फोटो | ||
10 | जागेचा चतु: सीमा दर्शविणारा तक्ता | ||
अंतिम देयक अदा करण्या पूवी ची तपासणी सूची | |||
1 | कामाचा कार्यारंभ आदेश | ||
2 | ग्रामपंचायतीचे ई नविदा प्रक्रिया संबधी चे कागदपतत्रे ( साहित्य / कामाचे | ||
2-1 | ई निविदा सूचना (नोटीस ) | ||
2-2 | ई नविदा प्रसिद्धी नोटीस ( सविस्तर कागद पत्रे, कात्रणे ) | ||
2-3 | जाहिरात वृत्त पत्ताची प्रत | ||
2-4 | बी ओ क्यू BOQ | ||
2-5 | L 1 चार्ट | ||
2-6 | तांत्रिक लिफापा कागदपत्रे | ||
2-7 | ठेकेदाराचे अद्यावत नोंदणी प्रमाणपत्र | ||
2-8 | ठेकेदाराचे पंन कार्ड व आधार कार्ड | ||
2-9 | ठेकेदाराचे जि एस टी प्रमाणपत्र | ||
2-10 | आर्थिक लिफापा कागदपत | ||
2-11 | ग्रामपंचायतीने ठेकेदाराशी केलेला करारनामा | ||
2-12 | ग्रामपंचायतीने ठेकेदाराला दिलेला कार्यारंभ आदेश | ||
3 | काम विहित मुदतीत पूर्ण झालेबाबत उप अभियंता यांचे अभिप्राय | ||
4 | काम पूर्णत्वाचा दाखला | ||
5 | कामाचे जि ओ टग फोटो ( काम सुरु करण्यापूर्वी, काम सुरु असताना,काम पूर्ण झाल्याचा प्रमाणित केलेले | ||
6 | कामाच्या ठिकाणी लावलेल्या फलकाचा फोटो | ||
7 | कार्यकारी अभियंता यांचे 5 % कामाची तपासणी बाबत अभिप्राय | ||
8 | इतिहास नोंदवही मध्ये कामाची नोंद घेवून क्रमाक पान क्रमांका सह | ||
9 | कामाचे दर कमी जास्त झाल्याबाबतचे प्रमाणपत्र | ||
10 | मोजमाप पुस्तिके मध्ये काम पुर्णत्वाचा दाखला | ||
11 | कामाच्या दरात बदल झाल्यास वर्किग अंदाज पत्रक | ||
12 | गुण वत्त (SQM) प्रमाणपत्र | ||
13 | गुण नियंत्रण चाचणी प्रमाणपत्र ( टेस्ट रेपोर्टZ) | ||
14 | कामाचे मालमत्ता नोंदवही मध्ये नोंद केलेले प्रमाणपत्र | ||
15 | ठेकेदाराचे हस्तांतरण प्रमाणपत्र (Handover Certificate) | ||
16 | देयकाच्या सर्व बाबी अद्यावत भरणे | ||
17 | कामच्या शासकीय कपाती | ||
18 | विमा (Insurance 1%) | ||
19 | उपकर (Cess) | ||
20 | रॉयलटी व गौण खनिज (As per M.B) | ||
21 | G.S.T (TDS) 2% | ||
22 | आयकर (Income Tax 2.30%) |