93
शासकीय अधिकाऱ्यांनी खाजगी आणि वैयक्तिक कामासाठी चतुर्थश्रेणी शासकीय कर्मचारी व इतर कनिष्ठ शासकीय कर्मचारी यांच्या सेवेचा वापर न करण्याबाबत उपरोक्त परिपत्रकान्वये सूचना देण्यात आल्या होत्या. तथापि, या सूचनांचे अनुपालन होत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.
२. याची शासनाने गंभीर दखल घेतली असून या परिपत्रकाद्वारे पुन्हा अशा सूचना देण्यात येत आहेत की, शासकीय अधिकाऱ्यांनी चतुर्थश्रेणी कर्मचारी व कनिष्ठ शासकीय कर्मचारी यांच्याकडून त्यांच्या मर्जीविरुद्ध खाजगी अथवा वैयक्तिक काम करुन घेण्याचे कटाक्षाने टाळावे.
You Might Be Interested In