विभागीय परीक्षा: महाराष्ट्र विकास सेवा मधील सहायक गट विकास अधिकारी, गट-ब ग्रामविकास विभाग ३ रा मजला, बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई ४०० ००१, दिनांक ३ जुलै २०२५. अधिसूचना
पेपर निहाय शासकीय पुस्तक मिळविण्यासाठी लिंक्स वर क्लिक download करून माहिती मिळवून घ्यावी……….
भाग एक कायदे आणि नियम
पेपर 1 पुस्तकांसह १५० गुण
(१) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ५) आणि त्या अंतर्गत केलेले नियम.
(२) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३) आणि त्या अंतर्गत केलेले नियम.
(३) महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम, १९६४.
(४) पंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रांवर विस्तारीत करणे) अधिनियम, १९९६. (सन १९९६ चा अधिनियम क्रमांक ४०).
पेपर 2 पुस्तकांसह १०० गुण
(१) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा, २००५. [महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम १९७७}
(२) मुंबई स्थानिक निधी लेखा अधिनियम, १९३० आणि त्या अंतर्गत केलेले नियम.
(३) भारतीय राज्यघटना कलम १ ते ५१, १४८ ते १६१, १९४, २०२ ते २०७, २४३, २८४ ते २९०, ३३० ते ३४२ आणि ५ वे परिशिष्ट. [भारताची राज्यघटना संपूर्ण मराठी English]
(४) माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ (सन २००५ चा २२).
(५) महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम, २००५ (सन २००६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४).
(६) आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ (सन २००५ चा ५३).
(७) महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ (सन २०१५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३१).
भाग दुसरा – सेवा नियम
पेपर III पुस्तकांसह १०० गुण
(१) महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१,
(1) सेवेच्या सर्वसाधारण शर्ती.
(ii) पदग्रहण अवधी, परदेशी सेवा इ.
(in) रजा नियम.
(iv) वेतन.
(v) निवृत्तीवेतन व मुंबई नागरी सेवा नियम, खंड १ चे प्रकरण १२. (तिसरा ते आठवा भाग आणि चौदावा आणि पंधरावा आणि एपीडी-पंधरावा भाग).
(२) महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ आणि महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९.
(३) विभागीय चौकशी नियम पुस्तिका चौथी आवृत्ती, १९९१.
(४) महाराष्ट्र शासकीय कर्मचा-यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणा-या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ (सन २००६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २१) मधील प्रकरण क्रमांक तीन.
(५) सार्वजनिक बांधकाम विभाग संहिता आणि मॅन्युअल.
भाग तिसरा – वित्तीय नियम-अर्थसंकल्पीय लेखे
पेपर IV पुस्तकांसह १०० गुण
(१) मुंबई वित्तीय नियम, १९५९.
(२) महाराष्ट्र आकस्मिक खर्च नियम, १९६५.
(३) महाराष्ट्र जिल्हा परिषद लेखा संहिता, १९६८.
(४) महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता, २०११.
पेपर V पुस्तकांशिवाय १५० गुण
(१) एकात्मिक बाल विकास सेवा योजना.
(२) ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे कार्यक्रम (जल जीवन मिशन).
(३) ग्रामीण गृहनिर्माण.
(४) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान.
(५) राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान.
(६) सहा गड्ढे पद्धती.
(७) खरेदीच्या कार्यपद्धतीची नियमावली व जिल्हास्तरीय खरेदी समितीची कार्यपद्धती नमूद असणा-या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचा दिनांक १ डिसेंबर २०१६ रोजीचा शासन निर्णय.
(८) बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ (सन २००९ चा ३५).
(९) राष्ट्रीय नवीन शैक्षणिक धोरण, २०२०.
क्रमांक मविसे-१०२१/प्र.क्र.४६/२०२१/आस्था-३अ. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३०९ च्या तरतुदीद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र विकास सेवा मधील सहायक गट विकास अधिकारी, गट-ब, यांच्या विभागीय परीक्षेबाबत सध्या अस्तित्वात असलेले नियम, आदेश व तनुषंगिक निर्गमित केलेल्या इतर सूचना अधिक्रमित करून, महाराष्ट्राचे राज्यपाल याद्वारे ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील महाराष्ट्र विकास सेवा या संवर्गातील सहायक गट विकास अधिकारी, गट-ब या पदासाठी विभागीय परीक्षेचे विनियमन करणारे पुढील नियम करीत आहे:-
१. संक्षिप्त शीर्षक :-
या नियमांना महाराष्ट्र विकास सेवा (सहायक गट विकास अधिकारी, गट-ब या पदावर पदोन्नतीने नियुक्त झालेल्या व्यक्तीस सदर पदावर कायम करण्यासाठी) विभागीय परीक्षा नियम, २०२५ असे संबोधण्यात यावे.
२. व्याख्या :-या नियमांत संदर्भानुसार दुसरा अर्थ अभिप्रेत नसेल तर, -
(अ) " परिशिष्ट" याचा अर्थ, या नियमांना जोडलेले परिशिष्ट असा आहे ;
(ब) " विभाग" याचा अर्थ, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद-१६६ अन्वये बनविलेल्या महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीच्या पहिल्या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेला ग्रामविकास विभाग असा आहे;
(क) " विभागीय परीक्षा" याचा अर्थ, महाराष्ट्र विकास सेवा मधील सहायक गट विकास अधिकारी, गट-ब या पदावर पदोन्नतीने नियुक्त झालेल्या व्यक्तीस सदर पदावर कायम करण्यासाठी असलेली विभागीय परीक्षा असा आहे ;
कक्ष ; (ड) " परीक्षा कक्ष" याचा अर्थ, विभागाने विहित केल्यानुसार विभागीय आयुक्त, कोकण यांच्या कार्यकक्षेखाली गठीत केलेला परीक्षा
(इ) " अधिकारी" याचा अर्थ, महाराष्ट्र विकास सेवेमध्ये गट-ब या पदावर पदोन्नतीने नियुक्त केलेली व्यक्ती असा आहे.
३. विभागीय परीक्षेला बसण्यासाठी पात्रता
सदर नियम प्रसिद्ध झाल्याच्या दिवशी किया लानंतर ज्या व्यक्तीची सहायक गट विकास अधिकारी, गट-वा पदावर पदोन्नतीने नियुक्ती केली जाईल, अशाच वाक्ती परीक्षेस बसण्यास पात्र राहतील
४. विभागीय परीक्षेकरिता अर्ज सादर करणे (१) शाखाचा-याची कोला जिल्हा परिषदेमध्ये काम करण्यासाठी
नियुक्ती केली जाते, असा अधिकारी त्या वर्षाच्या विभागीय परीक्षेला नसण्यासाठी त्या वर्षाच्या ३१ जानेवारी रोजी किंवा त्यापूर्वी संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी अर्ज करेल संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी सदर अर्ज संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयामार्पत परीक्षा कक्षाकडे त्या वर्षाच्या १५ फेब्रुवारी रोजी किवा त्यापूर्वी पाठवतील.
(२) जेका एखाद्या अधिका-याची जिल्हा परिषदेवर नियुक्ती अथवा प्रतिनियुक्ती केली जाईल, तेव्हा ती अधिकारी विभागीय परीक्षेला बसण्यासाठी त्या वर्षाच्या ३१ जानेवारी रोजी कियापूर्वी परीक्षा लेखी अर्ज सादर करेल.
(३) विभागीय परीक्षेसंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने वेळोवळी ठरविलेल्या सामायिक धोरणात्मक विषयक तरतुरी विभागीय फीक्षेला बसता उमेदवारांना लागू राहतील
विभागीय परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी संधीची संख्या
(१) संथी संधी महणजे विभागीय आयुक्त, जोहानी आयोजित केलेल्या विभागीय परीक्षेला बसावासाठी उमेदवाराने केलेला
(२) संधीची संख्या सहायक गट विकास अधिकारी-वादावरीने नियुक्ती केलेल्या उमेदवारांना त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून एकूण ३ संधीत विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आधापक राहोल
(३) संचाची गणना सर्वसाधारणपरीक्षाच्या महिन्यामध्ये आयोजित करण्यात येईल. सहायक गट विकास अधिकारी, गट-ब या पदावर पदोन्नतीने नियुक्ती केलेले उमेदवार विहित मुदतीत विभागीय परीक्षेसाठी अर्ज सादर करतोल जर एखादा उमेदवार विभागीय परीक्षेला बसण्यासाठी पात्र असूनही त्याने अर्ज सादर केला नाही किंवा अर्ज सादर करून तो त्या परीक्षेला चसला नाही, तर त्या वर्षीं आयोजित केलेली विभागीय परीक्षा संबंधीत उमेदवारास दिलेली संधी माणून गणन्यात येईल व तो उमेवचार त्या वर्षाची संधी गमाकेल. विभागीय परीक्षेकरिता पुढील दोन मंथी विभागीय परीक्षा आयोजित केल्यानंतर अनुक्रमे दुसरी व तिसरी संधी माणून गणन्यात येईल
परंतु, विभागीय परीक्षा कोगाकारणाविष्टांत आयोजित करण्यात आले नसेल तर सदर कालावधी संबीची गणना करताना वगळण्यात येईल.
६. विहित संधीत विभागीय परीक्षा उत्तीर्ण न होण्याचे परिणाम सहायक गट विकास अधिकारी, गट-वापदावर पदोन्नतीने नियुक्त झालेल्या उमेदवारास सवर पदावर कायम होण्यासाठी विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक राहील
कर सहायक गट विकास अधिकारी, गट-व पदावरील उमेदवार विहित संधीत विभागीय परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास ती वार्षिक वेतनवाढीसाठी तसेच वरिष्ठ पदावरील पदोन्नतीसाठी राहणार नाही
अजून असे की, उमेदवाराची रोखलेली वेलनवाड तो विभागीय परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून जानेवारी किवा जुने महिन्यामले दे राहील तसेच जणू काही वेतनवाद रोखून धरल्याचे समजून पूढील सर्व वेतनवाही देण्यात येतील वेतनवाढ रोखाने वालावधीतील वाक अनुज्ञेय राहणार नाही.
स्पष्टीकरण: उमेदवाराची वेतनवाढ मुक्त करण्यासाठी उमेदवार ज्या परीक्षेला उत्तीर्ण झाला त्या परीक्षेच्याच्या पेपर नंतरचा दिनांक विचारात घेण्यात येईल
७. विभागीय परीक्षा केक्षा घेण्यात येईल विभागीय आयुक्त, कोकण हे सदर विभागीय परीक्षा आयोजित करतील, जर नैसर्गिक आपत्ती, महामानो इत्यादी कारणांमुळे विभागीय परीक्षा एप्रिल महिन्यात आयोजित करता आली नाही तर विभाग परीक्षेची पुढील तारीख जाहिर करेल
८. विभागीय परीक्षेसाठी अभ्यासक्रम विभागीय परीक्षेच्या प्रत्येक पेपरचा अभ्यासक्रम व गुणसेना या नियमांना जोडलेल्या परिशिष्टात विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे चिया शासनाने वेळोवेळी आदेशाने निर्देशित केल्याप्रमाणे राही
९. विभागीय परीक्षेचे माध्यम विभागीय परीक्षेचे माध्यम (प्रावि उत्तरपत्रिका) मराठी भाषा राहीन,
१०. विभागीय परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक गुण उमेदवारास उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक पेपरमध्ये किमान ५० टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहीन
११. परीक्षा उत्तीर्ण होण्याचा दिनांक विभागीय परीक्षेच्या शेवटच्या पेपरनंतर लगतचा दिन हा विभागीय परीक्षा उत्तीर्ण होण्याचा दिनांका समजण्यात येईल,
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
https://gramvikaseseva.com/ ही महाराष्ट्र शासनाशी संबंधित शासकीय निर्णय (Government Resolutions - GR) आणि परिपत्रके (Circulars - CR) यांची माहिती विषयनिहाय माहिती उपलब्ध करणारे एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. या वेबसाइटचे मुख्य उद्दिष्ट शासकीय अधिकारी, कर्मचारी,नागरिकांना शासकीय धोरणे, नियम, आणि योजनांबाबत अद्ययावत आणि परिपूर्ण माहिती प्रदान करणे आहे. तसेच सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशांनुसार अचूक अंमलबजावणी करता यावी या उद्देशाने निर्मीत केलेली आहे.
https://gramvikaseseva.com/या संकेतस्थळावर दिनांक निहाय व विषयनिहाय शासकीय निर्णय, राजपत्र, आणि इतर महत्वाचे दस्तऐवज डिजिटल(PDF) स्वरूपात उपलब्ध आहेत, ज्यामुळे ही माहिती सहज उपलब्ध होते.
दिनांक ३ जुलै २०२५ पूर्वीचा अभ्यासक्रम
महाराष्ट्र विकास सेवा गट-अ व गट-ब संवर्गातील विभागीय परिक्षा अभ्यासक्रम महाराष्ट्र विकास सेवा गट अ व गट ब (विभागीय परीक्षा) नियम १९९९
महाराष्ट्र विकास सेवा गट अ व गट ब (विभागीय परीक्षा) (सुधारणा) नियम १९९८ दिनांक १८.४.१९९८
कायदे, नियम व मार्गदर्शक सूचना
०१. भाग – कायदे व नियम पुस्तकांसह १५० गुण
- महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, १९६१
- मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, १९५८
- महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम, १९६४
- महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ अंतर्गतचे नियम – (महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम, १९६४ वगळता)
- मुंबई स्थानिक निधी लेखापरीक्षण अधिनियम, १९३० व त्याअंतर्गतचे नियम
- मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ अंतर्गतचे नियम
- भारताचे संविधान – कलमे १ ते ५१, १४८ ते १६१, १९४, २०२ ते २०७, २८४ ते २९०, ३३० ते ३४२ व पाचवी अनुसूची [भारताची राज्यघटना संपूर्ण मराठी English]
०2 पुस्तकांसह १५० गुण
- मुंबई कृषी कीड व रोग अधिनियम, १९४७
- महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६
- कृषी कर्ज अधिनियम, १९८४
- रोजगार हमी योजना अधिनियम, १९७७ व रोजगार हमी योजना नियम
- तगाई मॅन्युअल
- भूसंपादन अधिनियम, १८९४ (अधिनियम क्र. १, १८९४)
०३. सेवा नियम पुस्तकांसह १५० गुण
- महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ –
i. सेवेसंबंधी सामान्य अटी
ii. रुजू होण्याचा कालावधी, परदेशी सेवा इ.
iii. रजा नियम
iv. वेतन
v. निवृत्तीवेतन व मुंबई नागरी सेवा नियम, खंड १, प्रकरण १२ (भाग III ते VIII, XIV, XV) - महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ व महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९
- महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम
०४ आर्थिक नियम – अंदाजपत्रक व लेखा पुस्तकांसह १५० गुण
- मुंबई वित्तीय नियम, १९५९
- महाराष्ट्र कोषागार नियम, १९६०
- महाराष्ट्र आकस्मिक खर्च नियम, १९६५.
- महाराष्ट्र जिल्हा परिषद लेखा संहिता, १९६८
- सार्वजनिक बांधकाम विभाग संहिता व पुस्तिका
- महाराष्ट्र अर्थसंकल्पीय पुस्तिका, १९६०
०५. समुदाय विकास व ग्रामीण कार्यक्रम पुस्तकांशिवाय १५० गुण
- समुदाय विकास संकल्पना; पंचायत राज प्रशासनिक पद्धतीचे मूल्यांकन
- मार्गदर्शक सूचना (भारत सरकार व महाराष्ट्र सरकार) –
– एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम (IRDP)
– राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम (NREP)
– जवाहर रोजगार योजना (JRY)
– ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम (RLEGP)
– दुष्काळग्रस्त क्षेत्र विकास कार्यक्रम (DPAP)
– एकात्मिक बाल विकास योजना (ICDS) - बायोगॅस कार्यक्रम
- सामाजिक वनीकरण
- ग्रामीण विकासात स्वयंसेवी संस्थांची भूमिका
- कुटुंब नियोजन
- ग्रामीण पिण्याच्या पाण्याचा कार्यक्रम
- प्रशिक्षण पर्यवेक्षक कर्मचाऱ्यांसाठी हँडबुक – भाग III (सामान्य प्रशासन विभाग)
- जिल्हाधिकारी कार्यालय कार्यपद्धती पुस्तिका – एस. बी. कुलकर्णी
- कार्यालय मार्गदर्शन प्रणाली – सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेले शासन निर्णय
- लाखिना पॅटर्न – सुधारित कार्यालय व्यवस्थापन पद्धती