महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी (सुधारणा) नियम, 2015 शासन निर्णय दिनांक 31-12- 2015 प्राप्त करून घेणेसाठी येथे click करा
महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी (सुधारणा) नियम, 2015 शासन निर्णय दिनांक 31-12- 2015 मधील नियम अन्वये
(४) पुढील जमिनी व इमारती यांना उप-नियम (१), अन्वये कर बसविण्यातून सूट देण्यात आली पाहिजे :-
(क) स्थानिक प्राधिकारी संस्थांच्या मालकीच्या, आणि केवळ सार्वजनिक प्रयोजनासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या किंवा उपयोगात आणण्याचा इरादा असलेल्या आणि नफ्याच्या प्रयोजनासाठी उपयोगात न आणल्या जाणाऱ्या किंवा उपयोग करण्याचा इरादा नसलेल्या जमिनी व इमारती;
(ख) सरकारच्या मालकीच्या जमिनी व इमारती मग त्या नफ्याच्या प्रयोजनाकरिता उपयोगात आणल्या जात असोत वा नसोत किंवा उपयोगात आणण्याचा इरादा असो वा नसो ;
(क) केवळ धार्मिक, शैक्षणिक किंवा धर्मादाय प्रयोजनासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या जमिनी व इमारती;
स्पष्टीकरण. – १. धार्मिक प्रयोजनासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या मालमत्तेमधील ज्या भागात प्रार्थना होते त्याव्यतिरिक्त असलेल्या निवासी, कार्यालयीन, व्यावसायिक इत्यादी कारणाकरिता वापरात असणाऱ्या भागास कर आकारणी करण्यात येईल.
२. शैक्षणिक प्रयोजनासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या मालमत्तेमधील वर्ग खोल्या, ग्रंथालय, प्रयोग शाळा, कार्यालय, क्रिडांगण, प्रेक्षागृह याव्यतिरिक्त वसतिगृह, कर्मचारी निवासस्थाने, उपाहारगृह, व्यावसायिक इत्यादी कारणाकरिता वापरात असणाऱ्या भागास कर आकारणी करण्यात येईल.
३. ज्या धर्मादाय संस्थांना आयकर अधिनियम, १९६१ (सन १९६१ चा अधिनियम क्र. ४३) अन्वये सूट देण्यात आली आहे त्याच धर्मादाय संस्थांना कर आकारणीतून सूट देण्यात येईल आणि इतर धर्मादाय संस्था कर पात्र असतील.
(घ) संरक्षण दलातील शौर्य पदक किंवा सेवापदक धारक व अशा पदक धारकांच्या विधवा किंवा अवलंबितांच्या वापरात आणल्या जाणाऱ्या फक्त एकच निवासी इमारतीस, करातून माफी असेल :
परंतु, अशा कर माफीस पात्र ठरणाऱ्या व्यक्तीने, ती व्यक्ती शोर्य पदक किंवा सेवा पदक धारक किंवा ती व्यक्ती उक्त पदक धारकाची विधवा किंवा अवलंबित असल्याबाबतचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र सादर करील;
(ङ) युनायटेड स्टेटस् टेक्निकल को-ऑपरेशन मिशनच्या सेवक वर्गातील सदस्याच्या मालकीच्या नफ्याच्या कारणासाठी उपयोगात न आणल्या जाणाऱ्या किंवा उपयोगात आणण्याचा इरादा नसलेल्या जमिनी व इमारती; आणि
च-२८३-१अ