371
राज्य दिशा (DISHA) समिती मधील मा.संसद सदस्यांचे नामनिर्देशन करण्याबाबत. ग्राम विकास विभाग,31-01-2025
राज्य स्तरावर प्रमुख केंद्रीय योजना/कार्यक्रमांची कार्यक्षम आणि वेळेवर अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी राज्यस्तरीय दिशा (DISHA) समितीच्या मार्गदर्शक सूचनेतील परि.क्र.३ नुसार मा. संसद (लोकसभा व राज्यसभा) सदस्यांचा समावेश असलेल्या राज्य दिशा समितीकरिता दि.२८ नोव्हेंबर, २०२४ च्या पत्रान्वये नामनिर्देशन करण्यात आलेले आहे. केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या राज्यस्तरीय DISHA समितीसाठी नामनिर्देशित केलेल्या मा. संसद सदस्यांची यादी परिशिष्ट-अ येथे सोबत जोडली आहे.
केंद्र शासन पुरस्कृत योजनांच्या संनियंत्रणासाठी ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्गदर्शक सूचनेंमधील तरतूदीनुसार राज्य दिशा समितीची रचना (Formation) करणेबाबत,ग्राम विकास विभाग, 27-02-2024
केंद्रीय ग्रामीण विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांच्या अंमलबजावणीवर सनियंत्रण ठेवण्याचे काम अधिक परिणामकारकरित्या करता यावे या हेतूने मा. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दिशा समितीची स्थापना करण्याचे केंद्र शासनाचे धोरण आहे. त्यानुसार संदर्भ क्र. १ नुसार मा. मंत्री (ग्रा.वि.) यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेली राज्य दक्षता व सनियंत्रण समिती रद्द करण्यात येत आहे. त्याऐवजी आता मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय दिशा समिती गठित करण्यात येत आहे.
You Might Be Interested In