राज्यातील गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यासाठी राज्य स्तरावर मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे समिती स्थापन करण्यात येत आहे :-
अ.क्र. पदनाम पद १ मुख्य सचिव अध्यक्ष २ प्रधान सचिव/सचिव (सा.न्या.) सदस्य ३ अ.मु.स./प्रधान सचिव / सचिव (नगर विकास विभाग) सदस्य ४ अ.मु.स/प्रधान सचिव/ सचिव (ग्राम विकास व पंचायत राज विभाग) सदस्य ५ अ.मु.स./प्रधान सचिव सचिव (इतर मागास बहुजन कल्याण विभाग) सदस्य ६ आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, पुणे सदस्य ७ आयुक्त तथा संचालक, नगरपालिका प्रशासन संचालनालय, मुंबई .सदस्य ८ सह सचिव / उप सचिव (अजाक), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सदस्य सचिव २. राज्यातील गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्यासंदर्भातील मासिक आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे समिती स्थापन करण्यात येत आहे:-
सदर समितीची बैठक तीन महिन्यातून कमीत-कमी एकदा घेण्यात यावी.
अ.क्र. पदनाम पद
१. विभागीय आयुक्त, महसूल अध्यक्ष
२. आयुक्त, महानगर पालिका (सर्व) सदस्य
३. जिल्हाधिकारी (सर्व) सदस्य
४. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) सदस्य
५. प्रादेशिक उपायुक्त, नगरपालिका प्रशासन शाखा, विभागीय आयुक्त कार्यालय सदस्य
६. प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याणसदस्य सचिव
सदर समितीची बैठक एक महिन्यातून कमीत-कमी एकदा घेण्यात यावी.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
ग्रामीण भागातील वस्त्याची व रस्त्याची जातीवाचक नावे बदलून नवी नावे देण्याबाबत दि. 28/04/2021
(१) एखाद्या वस्तीचे वा रस्त्याचे जातीवाचक नाव बदलावयाचे असल्यास, त्या अनुषंगाने संबंधित गावाने ग्रामसभेत तसा ठराव पास करून त्याबाबतचा प्रस्ताव संबंधित गट विकास अधिकारी यांचे कडे सादर करावा.
(२) गट विकास अधिकारी यांनी सदर प्रस्ताव तपासून संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे पाठवावा. संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रस्ताव तपासून संबंधित विभागीय आयुक्त यांचे मार्फत सदर प्रस्ताव शासनाच्या मान्यतेस्तव पाठवावा .
(३) शासन स्तरावर प्राप्त प्रस्तावाची तपासणी करून मा. मंत्री महोदय यांच्या मान्यतेने त्यावर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल .अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
राज्यातील अनेक शहरातील व ग्रामीण भागातील अनेक गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची नांवे जातीवाचक असल्याची बाब महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला भूषणावह नसल्यामुळे राज्यात सामाजिक सलोखा व सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृध्दींगत होण्याच्या दृष्टीने अशा सर्व गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची नांवे बदलून अशा जातीवाचक नावांऐवजी महापुरुषांची व लोकशाही मूल्यांशी निगडित नांवे देण्यास मान्यता देण्यात येत आहे.
२. सदर विषयाचे महत्व लक्षात घेऊन, जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याची कार्यपध्दती शहरी भागासाठी नगर विकास विभागाने व ग्रामीण भागासाठी ग्राम विकास विभागाने निश्चित करुन जातीवाचक नावे बदलण्याची कार्यवाही तातडीने करावी.अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….