शासकीय उच्च अधिका-यांच्या दालनात वातानुकूलित यंत्रे बसविण्याबाबत 25-05-2022
सातव्या वेतन आयोगानुसार महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारीत वेतन) नियम २०१९ नुसार राज्यातील जे शासकीय अधिकारी सुधारित वेतनश्रेणी मधील वेतन स्तर ९-३०: १४४२००-२१८२०० किंवा त्यापेक्षा अधिक वेतनस्तरा मध्ये काम करतात त्यांची दालने वातानुकूलीत करता येतील असा शासनाने निर्णय घेतला आहे.
२. या बाबीवर होणारा खर्च संबंधीत विभागाने त्यांच्या मंजूर अनुदानातून भागवावा.
शासकीय उच्च अधिका-यांच्या दालनात वातानुकूलित यंत्रे बसविण्याबाबत 27-02-2012
राज्यातोल जे शासकीय अधिकारी रु.१८४००/- किंवा त्यापेक्षा अधिक किमान वेतन आहे अशा वेतनश्रेणीत काम करतात त्यांची दालने वातानुकूलीत करता येतील अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. सदर परिपत्रकातील वेतनश्रेणी बाबतची तरतूद विद्यमान सहाव्या वेतन आयोगाच्या वेतन बँडनुसार सुधारित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. सदर प्रस्तावावर विचार करुन, राज्यातील जे शासकीय अधिकारी वेतन बँड रु.३७४००-६७००० ग्रेड वेतन रु.१०,०००/- किंवा त्यापेक्षा अधिक वेतन बँड व ग्रेड वेतन आहे अशा वेतन बँड ग्रेड वेतनमध्ये काम करतात त्यांची दालने वातानुकूलीत करता येतील असा शासनाने निर्णय घेतला आहे.
शासकीय उच्च अधिका-यांच्या दालनात वातानुकूलित यंत्रे बसविण्याबाबत ०६-०६-१९९१
राज्यातील जे शातकाव अधिकारी, ज्या वेतनश्रेणोचे किमान वेतन रु१८४०० किंवा त्यापेक्षा अधिक आहे अशा वेतनश्रेणीत काम करतात, त्यांची दालने वातानुकूलीत करता येतोत. प्रत्येक मंत्रालयीन प्रशासकीय विभागाने त्यांच्या अधिपत्याखालील अशा अधिका-यांची यादो कस्न घेऊन व संबंधित कार्यकारी अभियंता [विद्युत] सार्वजनिक बांधकाम विभाग याविकडून नकाशे के अंदाजपत्रक घेऊन त्यासाठी लागणा-या खर्चाची तरतूद अंदाजपत्रकास कस्न हे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कस्न घ्यावे. या वर्षीच्या मंजूर नियत व्ययातून हा खर्च भागविणे शक्य असल्यास दालने वातानुकूलीत करुन घेण्यात हरकत नाही. मात्र या प्रयोजनासाठी तरतूद उपलब्ध असल्याशिवाय कामात तुस्वात करू नये.