फौजदारी खटल्यातील सिद्धपराध प्रमाण वाढविण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत सात वर्ष किंवा सात वर्षा पेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यमध्ये सरकारी पंच म्हणून घेण्याबाबत गृह विभाग शासन निर्णय दिनांक १२/०५/२०१५ शासननिर्णय मिळविण्या साठी येथे CLICK करावे. (१४ पैकी शासन निर्णय क्रमांक १२)
1.पंच फितुर होऊन दोषारोपसिध्दीचे प्रमाण कमी होणा-या प्रकारास आळा घालण्याच्या दृष्टीने सात वर्षे किंवा सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्हयांमध्ये सरकारी कर्मचारी पंच म्हणून घेण्याचा निर्णय सदर शासन निर्णयान्वये घेण्यात येत आहे.
२. ज्या गुन्हयामध्ये सात वर्षे किंवा सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा नमूद केली असेल अशा प्रकरणांमध्ये तपासी अधिकारी यांनी शक्यतोवर सरकारी कर्मचा-याची पंच म्हणून सेवा घ्यावी.
३. सदरची सेवा पंच म्हणून घेताना ज्या परिसरामध्ये खटल्याची सुनावणी होणार आहे त्या परिसरात वास्तव्य असणा-या सरकारी कर्मचा-यास पंच म्हणून घ्यावे जेणेकरुन खटल्याच्या सुनावणीदरम्यान सदर पंचास उपस्थित राहणे सुलभ होईल.
४. पंच म्हणून घेत असलेल्या सरकारी कर्मचा-याचे चारित्र्याबाबत प्रथम मौखिक स्वरुपात तपास अधिका-याने खातरजमा करुन घ्यावी.
५. एकाच सरकारी कर्मचा-यास अनेक गुन्हयांत वारंवार पंच म्हणून घेण्यात येवू नये.
६. गुन्हयातील फिर्यादी व आरोपी यांचे नातेवाईक असलेल्या सरकारी कर्मचा-यास पंच म्हणून घेण्यात येवू नये.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….