Tuesday, July 8, 2025
Tuesday, July 8, 2025
Home » ग्रामपंचायत कर व फी आकारणी

ग्रामपंचायत कर व फी आकारणी

1 comment

महाराष्ट्र ग्राम पंचायत कर आणि शुल्क नियम, 1960 मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

१) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम १२४ अन्वये कर आकारणी करण्याचे अधिकार ग्रामपंचायतीस

२) गावाच्या सीमेतील इमारती व जमिनीवर ग्रामपंचायतीस कर आकारणी करता येते. मोबाईल मनोरे, सौरपंखे व पवनचक्की यावरही कर आकारणी करता येते.

३) फी, यात्राकर, दुकान चालविणे व हॉटेल चालविणे, आठवडे बाजार, सार्वजनिक स्वच्छता कर, दिवाबत्ती कर, आरोग्य व साफसफाई कर, वाहनतळ जागाभाडे इत्यादिच्या संदर्भात ग्रामपंचायतीस फी आकारणी करता येते.

ग्रामपंचायतीना यात्रा कराऐवजी मदत निधी देणेबाबत…शासन निर्णय दिनांक 04-05-1981 प्राप्त करून घेणेसाठी येथे click करा

ग्रामपंचायतीना यात्रा कराऐवजी वित्‍तीय सहाय्य शासन निर्णय दिनांक 02-06-1992 प्राप्त करून घेणेसाठी येथे click करा

ज्या ग्रामपंचायतींचे यात्रा करांचे निव्वळ वार्षिक उत्पन्न [कर वसुली-साठी लागणारा खर्च वजा करता] रु. ५०००/- रु पेक्षा जास्त आहे, अशा ग्राम -पंचायतीनी यात्रा कर न आकारल्यास, त्यांना अशा उत्पन्नाच्या ७५% इतके अनुदान नुकसान भरपाई म्हणन दयावयाचा आदेश वरील शासन निर्णयान्वये दिलेला आहे. ज्या ग्रामपंचायती असे यात्राकर अनुदान मिळण्यास पात्र आहेत, त्या ग्राम पंचायतींनी त्यांना यात्राकरांपोटी नुकसान भरपाई म्हणून मिळालेल्या अनुदानापैकी किमान ५० % रक्कम त्यांच्या कार्यक्षत्रात येणा-या यात्रेकरूंच्या कल्याणासाठी खर्च करण्याची अट त्यांच्यावर घालण्यात आले आहे. ग्राम पंचायतींनी यात्रेकरूच्या कल्याणासा उपलब्ध करून द्यावयाच्या आवश्यक सुविधा / तवांवरील वाढलेला खर्च, तसेच, यात्रे करुची वाढलेली संख्या लक्षांत येता, ग्राम पंचायतीना तथा मिळत असलेल्या यात्राकर अनुदानात तिप्पटीने वाढ करण्याचा प्रस्ताव शात्तनाच्या विचाराधीन होता.
शासन निर्णयः- शासनाने या प्रकरणी आता अता निर्णय घेतला आहे की, ग्राम -पंचायतींना सध्या शासनाकडून मिळत असलेल्या अनुदानांमध्ये तिप्पटीने वाढ करून यात्राकर अनुदान सन १९९२-९३ या वित्तीय वर्षापासून देण्यात यावे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी (सुधारणा) नियम, 2004 शासन निर्णय दिनांक 07 -06- 2004 प्राप्त करून घेणेसाठी येथे click करा

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, १९५८.
क्रमांक व्हीपीएम. २६०१/प्र.क्र. १६७३/२२. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ (सन १९५९ चा मुंबई अधिनियम ३) च्या कलम १७६ चा पोट-कलम (२) चा खंड (सव्वीस) अन्वये महाराष्ट्र शासनास प्रदान करण्यात आलेल्या व त्याबाबतीत महाराष्ट्र शासनास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे, महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम, १९६० ग्रात आणखी सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करीत आहे, हे नियम उक्त कलम १७६ चे पोट-कलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आले आहेत :-

महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व शुल्क (सुधारणा) नियम, 2004 शासन निर्णय दिनांक 29 -05- 2004 प्राप्त करून घेणेसाठी येथे click करा

१४५. प्रतिव्यक्ती कर, त्याचे प्रदान व प्रक्रिया (१) राज्य शासनाने कोणत्याही पंचायतीच्या क्षेत्रात प्रतिव्यक्ती कर घेण्यास मंजुरी दिली असेल व अशा पंचायत क्षेत्राच्या हद्दीत कोणत्याही अभ्यागताने प्रवेश केला तर, तो या भागाला जोडलेल्या अनुसूचीत विनिर्दिष्ट केलेल्या, किमान दरापेक्षा कमी नसेल व कमाल दरापेक्षा अधिक नसेल अशा दराने प्रतिव्यक्ती कर भरेल.
(२) कर वसूल करण्यातून खालील व्यक्तींना सूट देण्यात येईल, त्या पुढीलप्रमाणे:-
(क) अशा ग्रामपंचायतींचा कायम रहिवासी
(ख) कामावरील शासकीय कर्मचारी, आणि
(ग) ५ वर्षाखालील मुले.

(३) जर एखाद्या मुलाच्या वयाबाबत किंवा एखादी व्यक्ती पंचायतीची कायम रहिवासी आहे किंवा नाही याबाबत, किंवा तिला पोट-नियम (२) घ्या तरतुदीतून सूट देण्यात आली आहे किंवा नाही याबाबत कोणताही प्रश्न उपस्थित झाल्यास, असे. प्रकरण संबंधित पंचायतीच्या सरपंचाकडे निर्णयार्थ सोपविण्यात येईल.
(४) या भागास जोडलेल्या अनुसूचीत विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे अशा पंचायतींमा ठरविलेल्या दराने कर भरल्याशिवाय कोणत्याही अभ्यागतास पंचायतीच्या हद्दीत प्रवेश करता येणार नाही. पंचायतीने या प्रयोजनार्थ, ठरविलेल्या एका किंवा अनेक ठिकाणी पंचायतीने नियुक्त केलेल्या व्यक्तीने किंवा व्यक्तींनी मागणी केल्यावर अभ्यागत प्रतिव्यक्ती कराची रक्कम भरेल.
(५) प्रतिव्यक्ती कर भरल्यानंतर, प्रत्येक अभ्यागतास पास देण्यात येईल. असा पास हस्तांतरणीय नसेल. पंचायत पासाचा आकार, नमुना व रंग ठरवील आणि असे पास छापून घेईल.
(६) पोट-नियम (१) च्या तरतुदींचा भंग करणारा कोणताही अभ्यागत सिद्धपराधी ठरल्यावर, त्याला रुपये १०० पर्यंतच्या दंडाची शिक्षा होईल.
१४६. प्रतिष्यक्ती कराचा हिशोब (१) पंचायत प्रतिव्यक्ती करापासून मिळालेल्या उत्पन्नाची सर्व रक्कम, अधिनियमाच्या कलम ५७ खाली निर्माण केलेल्या ग्राम निधीत जमा करील.
(२) पंचायत प्रतिव्यक्ती करापासून प्राप्त होणान्या उत्पन्नातील जमा व त्यातून केलेला खर्च दर्शविणारा हिशेब स्वतंत्रपणे ठेवील. ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक प्रतिव्यक्ती कराचा हिशेब संबंधित गटविकास अधिकाऱ्याला लेखा परीक्षेसाठी सादर करील.
(३) अधिनियमाच्या तरतुदींनुसार, पंचायतीच्या कायम रहिवाशांना फायदा व्हावा या हेतूने सोईसुविधांची तरतूद करण्यासाठी, पंचायत अशा प्रतिव्यक्ती कराच्या वार्षिक प्राप्तीच्या २५ टक्के इतकी रक्कम त्यासाठी प्रत्यक्ष उपयोगात आणील. वार्षिक प्राप्तीच्या उर्वरित ७५ टक्के रक्कम समितीचे सुचनेनुसार क्षेत्राच्या विकासासाठी आणि अभ्यागतांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी उपयोगात आणली जाईन

महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी (सुधारणा) नियम, 2002 शासन निर्णय दिनांक 12 -02- 2003 प्राप्त करून घेणेसाठी येथे click करा

२. महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम, १९६० मधील भाग दोनमधील अनुसूचीतील ” दोन : जमिनीवरील कराचा दर-” या शीर्षकाखालील कोष्टकाखाली दिलेल्या स्पष्टीकरणातील कलम (५) मधील ” जनावरांचे गोठे” या शब्दांऐवजी ” जनावरांचे गोठे, कुक्कुटपालन व कुक्कुटपालनाशी निगडित इमारती” हे शब्द समाविष्ट करण्यात येतील.

महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी (पहिली सुधारणा) नियम, 2002 शासन निर्णय दिनांक 17 -01- 2002 प्राप्त करून घेणेसाठी येथे click करा

महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी (पहिली सुधारणा) नियम, 2001 शासन निर्णय दिनांक 12 -12- 2001  प्राप्त करून घेणेसाठी येथे click करा

२. महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम, १९६० मधील नियम ९ च्या पोट-नियम (१) ऐवजी खालील पोट-नियम समाविष्ट करण्यात येईल :-
“(१) सरपंचाने पुढील गोष्टी दर्शविणारी आकारणीची यादी तयार केली पाहिजे किंवा केलेली असली पाहिजे:-
(अ) प्रत्येक इमारतीचा किंवा जमिनीचा अनुक्रमांक ;
(ब) प्रत्येक इमारतीचा प्रकार म्हणजेच ती पुढील प्रकारची आहे किंवा कसे, –
(१) झोपडी किंवा मातीचे घर-
(क) गवती छप्पर,
(ख) पत्रा किंवा कौलारु छप्पर, किंवा
(२) दगड-विटांचे, मातीचे घर, किंवा
(३) दगड-विटांचे, चुना किंवा सिमेंटचे पक्के घर-
(क) पत्रा अगर कौलारु छप्पर,
(ख) आर.सी.सी. स्लॅब, किंवा
(४) नवीन आर.सी.सी. पद्धतीचे घर, किंवा
(५) मारबल किंवा ग्रॅनाईट यांचा वापर करून बांधलेली अलिशान घरे.
(क) तिच्या माहिती असलेल्या मालकाचे व ती ताब्यात असणाऱ्याचे नाव :
(ड) तिचे क्षेत्रफळ :
(इ) तिच्या एकूण क्षेत्रफळाच्या आधारे तिच्यावर आकारण्यात आलेल्या कराची रक्कम :
परंतु, राज्य शासन किंवा यथास्थिति स्थायी समिती तसे करण्यास भाग पाडील तर, पंचायतीत, मूल्य निर्धारित सूची तयार करण्याचे काम, शासनाच्या किंवा जिल्हा परिषदेच्या सेवेमधील अधिकाऱ्याकडे (ज्याचा यापुढे ” मूल्य निर्धारण अधिकारी” असा उल्लेख केला आहे) सोपविता येईल “.

शुद्धीपत्रक शासन निर्णय दिनांक 10 -09- 2001

ग्राम पंचायतीचे उत्पन्न वाढावे व त्या स्वयंपूर्ण व्हाव्यात म्हणून ग्रामीण भागात चौरस फुटावर आधारीत घरपटी आकारण्याबाबत शासन निर्णय दिनांक 09-02-2001 Click Here for download

शासन निर्णय दिनांक 09-02-2001 थोडक्यात खालील प्रमाणे

महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी (सुधारणा) नियम, 1999 शासन निर्णय दिनांक 03 -12-1999  प्राप्त करून घेणेसाठी येथे click करा

(१) अनेक मजली इमारतींच्या बाबतीत प्रत्येक मजल्याचे क्षेत्रफळ स्वतंत्रपणे विचारात घेतले जाईल.

(२) लहान किंवा मोठ्या कारखान्यांसाठी लोखंडी अँगल्स आणि पत्रे (लोखंडी व अॅसबेस्टॉस) यांचा वापर करून उभारण्यात येणाऱ्या शेड्स यांचा समावेश आर.सी.सी. पद्धतीच्या इमारती प्रकारामध्ये करण्यात येईल (कोष्टक एकमधील अनुक्रमांक ४).

(३) छोट्या व्यवसायासाठी (उदा. किराणा दुकान, केशकर्तनालय, भाजीपाला विक्री, चहाचे स्टॉल इत्यादी) उभारण्यात येणाऱ्या यंत्रांच्या किंवा लाकडी स्टॉल्स (टपन्या) यांचा समावेश आर.सी.सी. स्लॅबच्या पक्क्या इमारती [कोष्टक एक मधील अनुक्रमांक ३(२)] प्रकारामध्ये करण्यात येईल.

(४) उद्योगधंदे आणि व्यवसायासाठी वापरात असलेल्या इमारतीवर आकारणी निवासी इमारतीच्या दुप्पट दराने राहील.

(५) निवासी इमारतीव्यतिरिक्त जनावरांचे गोठे व तत्सम इमारतीवर कराची आकारणी झोपडी किंवा मातीचे घर प्रकार १ (अ) नुसार राहील. मात्र जनावरे बांधण्यासाठी आर.सी.सी. किंवा चुना सिमेंटच्या पक्क्या इमारतींचा वापर केला जात असल्यास इमारतीच्या प्रकारानुसार कर आकारणी केली जाईल.
(६) गावातील जुन्या वाड्यांच्या बाबतीत फक्त बांधकाम केलेल्या क्षेत्रावरच (वर छत असलेल्या) कराची आकारणी केली जाईल. वाड्यातील मोकळ्या (Land without roof) जागेवर वखळ जागेच्या दराने नाममात्र कर आकारणी केली जाईल.
(७) गावातील जुन्या इमारतीवर (यामध्ये सन १९७० पूर्वी बांधलेल्या इमारतींचा समावेश राहील) कराची आकारणी करताना किमान दराने कराची आकारणी करणे सक्तीचे राहील. नवीन इमारतीवर (सन १९७० नंतर बांधलेल्या) कराची आकारणी वाढीव दराने करण्यात हरकत नाही मात्र याबाबत ग्रामपंचायतींना स्वातंत्र्य राहील.
(८) १०० चौरस फुटाच्या आतील झोपडीच्या (गवती छपराचे घर) निवासासाठी वापर केला जात असल्यास त्यास घरपट्टी माफ राहील.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व शुल्क (सुधारणा) नियम, 1997 शासन निर्णय दिनांक 06 -03- 1997 प्राप्त करून घेणेसाठी येथे click करा

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

मा. बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजने अतंर्गत माजी सैनिक व सैनिक विधवा , पत्नी यांना मालमत्ता करातून सूट देण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक २८-०३-२०२५ प्राप्त करून घेणेसाठी येथे click करा


शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, दि.२३/११/२०२० अन्वये महाराष्ट्र राज्यातील माजी सैनिक व सैनिक विधवा/पत्नी यांना मालमत्ता करातून सूट देण्यात येत आहे. सदर शासन निर्णयातील परिच्छेद २ अ मध्ये ” या योजनेचे लाभ मिळण्यासाठी सदर माजी सैनिक महाराष्ट्र राज्यात जन्मलेला असावा किंवा महाराष्ट्र राज्याचा किमान १५ वर्षे सलग रहिवासी असावा.” असे नमुद केले आहे.
याऐवजी संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णय परिच्छेद २ अ मधील अट खालीलप्रमाणे वाचावीः-
” या योजनेचे लाभ मिळण्यासाठी सदर माजी सैनिक महाराष्ट्र राज्याचा जन्मतः अधिवासी असावा किंवा त्यांचे आई/वडील/आजी/आजोबा महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असावेत. इतर राज्यातून महाराष्ट्र राज्यात स्थलांतरीत झालेल्या माजी सैनिकांनी सैन्यसेवेतील निवृत्तीनंतर किमान सलग १५ वर्षे महाराष्ट्र राज्यात वास्तव्य केलेले असावे व या कालावधीमध्ये त्यांनी इतर कोणत्याही राज्यातील सैनिक कल्याण कार्यालयाचे माजी सैनिक ओळखपत्र घेतलेले नसावे.”

मा.बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना ( माजी सैनिक व सैनिक विधवा/पत्नी यांना मालमत्ता करातून सूट ) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय दिनांक २३-११-२०२०


महाराष्ट्र राज्यात अधिवास असणाऱ्या संरक्षण दलातील सर्व माजी सैनिक आणि सैनिक विधवा यांच्या करीता ग्रामविकास विभाग व नगर विकास विभागामार्फत संदर्भाकीत अनुक्रमे दि.१८/८/२०२० व दि.९/९/२०२० च्या आदेशान्वये विहीत करण्यात आलेल्या आदेशाचे एकत्रिकरण करुन मा. बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना (माजी सैनिक व सैनिक विधवा/पत्नी यांना मालमत्ता करातून सूट) विहीत करण्यात येत आहे. परीणामतः ग्रामविकास विभाग तसेच नगर विकास विभागाचे अनुक्रमे शासन निर्णय दि.१८/८/२०२० व दि.९/९/२०२० अन्वये निर्गमित केलेले आदेश अधिक्क्रमित झाले आहेत.
२. सदर योजनेचे लाभार्थी होण्यासाठी खालील अटींची पुर्तता होणे आवश्यक आहे :-
अ. या योजनेचे लाभ मिळण्यासाठी सदर माजी सैनिक महाराष्ट्र राज्यात जन्मलेला असावा किंवा महाराष्ट्र राज्याचा किमान १५ वर्षे सलग रहिवासी असावा. त्याकरीता त्याने सक्षम प्राधिकाऱ्याकडून अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
ब. अशा करमाफीस पात्र ठरणाऱ्या व्यक्तीने संबंधित जिल्हयाच्या जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्याकडून प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
क. अशी पात्र व्यक्ती राज्यातील एकाच मालमत्ते करीता करमाफीस पात्र राहील. तसे घोषणापत्र त्यांनी संबंधित जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांना सादर करणे आवश्यक राहील.
ड. या योजनेचे लाभ संबंधित माजी सैनिक व त्यांच्या पत्नी/ विधवा हयात असे पर्यंतच देय राहतील. तसेच अविवाहीत शहीद सैनिकांच्या बाबतीत त्यांचे आईवडील हयात असेपर्यंत हे लाभ देय राहतील.
इ. या प्रयोजनासाठी माजी सैनिक याचा अर्थ हा माजी सैनिक (केंद्रीय नागरी सेवा व पदांवर पुर्ननियुक्ती) सुधारणा नियम, २०१२ मध्ये विहीत केल्याप्रमाणे राहील.
३. या योजनेची अंमलबजावणी व त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद प्रकरणपरत्वे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रातील मालमत्ता करीता नगर विकास विभाग व ग्रामीण स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रातील मालमत्ता करीता ग्रामविकास विभागाच्या मार्फत करण्यात येईल. नागरी स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रात या योजनेचे लाभ देण्यासाठी आवश्यकत्तेनुसार संबंधित अधिनियम / नियम या मध्ये आवश्यक सुधारणा करण्याची कार्यवाही नगर विकास विभागामार्फत करण्यात यावी. तसेच ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रात या योजनेचे लाभदेण्यासाठी आवश्यकतेनुसार संबंधित अधिनियम / नियममध्ये आवश्यक सुधारणा करण्याची कार्यवाही ग्राम विकास विभागामार्फत करण्यात यावी.

(ब) कर आकारणी प्रक्रिया / पद्धत

१) दर चार वर्षांनी कराची फेर आकारणी करणे

[ महाराष्ट्र ग्रामपंचायत (कर व फी ) नियम १९६० चे नियम १७ अन्वये,ग्रामपंचायती नी कर आकारणी यादीची दर करवाढ बाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक ०२-०२-१९९४ साठी येथे click करा

२) कर आकारणी करण्यासाठी कर आकारणी समितीचे गठण. सदर समितीचे अध्यक्ष सरपंच  

३) कर व फी चे कमाल व किमान दर मासिक आणि ग्रामसभेत निश्चित करण्यात यावेत.

४) महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम, १९६० अंतर्गत सुधारणा नियम २०१५ नुसार भांडवली मुल्यावर आधारीत कर आकारणी करणे

A) महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी (सुधारणा) नियम, 2015 शासन निर्णय दिनांक 31-12- 2015 प्राप्त करून घेणेसाठी येथे click करा

७. इमारती व जमिनी यांवरील कराचा दर. (१) इमारती व जमिनी वावर कर बसविण्याचे ज्या पंचायतीने ठरविले असेल,
अशा प्रत्येक पंचायतीने, उप-नियम (४) च्या तरतुदीस अधीन राहून आणि नियम ३ व ४ यांत विहीत केलेली कार्यपद्धती अनुसरल्यानंतर, भांडवली मूल्यावर आधारित इमारत किया जमिनीचे पुढील गणिती सुत्रानुसार भांडवली मूल्य निश्चित करून, तिच्याकडून ठरविण्यात येईल अशा दराने असा कर बसविला पाहिजे, परंतु असा दर, हा अनुसूची ‘अ’ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या किमान दरापेक्षा कमी व कमाल दरापेक्षा अधिक असता कामा नये-
(क) ज्या कोणत्याही ग्रामीण भागाकरीता वार्षिक मूल्य दर तक्त्यामध्ये इमारतीचे स्वतंत्र वार्षिक मूल्य दर विनिदिष्ट केलेले नाही, त्या ग्रामीण भागाकरिता वार्षिक मूल्य दर तक्त्यामध्ये विनिदिष्ट केलेले जमिनीचे वार्षिक मूल्य दर आणि इमारतीच्या बांधकामाच्या प्रकारानुसार बांधकामाचे दर, अनुसूची अ मधील तक्ता १ मधील इमारतीच्या वापरानुसार भारांक आणि तक्ता २ मधील इमारतीचे वयोमानानुसार घसारा दर विचारात घेऊन पुढील गणिती सूत्रानुसार इमारतीचे भांडवली मूल्य निश्चित करण्यात येईल,-
इमारतीचे भांडवली मूल्य=
[(इमारतीचे क्षेत्रफळ जमिनीचे वार्षिक मूल्य दर) +(इमारतीचे क्षेत्रफळ इमारतीच्या बांधकामाच्या प्रकारानुसार बांधकामाचे दर × घसारा दर)] x इमारतीच्या वापरानुसार भारांक :

(ख) ज्या ग्रामीण भागाकरिता वार्षिक मूल्य दर तक्त्यामध्ये इमारतीचे स्वतंत्र वार्षिक मूल्य दर विनिदिष्ट केलेले आहेत, त्या ग्रामीण भागाकरिता वार्षिक मूल्य दर तक्त्यामध्ये विनिदिष्ट केलेले इमारतीचे वार्षिक मूल्य दर, अनुसूची अ मधील तक्ता १ मधील इमारतीच्या वापरानुसार भारांक आणि अनुसूची अ मधील तक्ता २ मधील इमारतीचे वयोमानानुसार घसारा दर विचारात घेऊन पुढील गणिती सूत्रानुसार इमारतीचे भांडवली मूल्य निश्चित करण्यात येईल, –
इमारतीचे भांडवली मूल्य इमारतीचे क्षेत्रफळ इमारतीचे वार्षिक मूल्य दर x घसारा दर x इमारतीच्या वापरानुसार भारांक :
(ग) जमिनीचे वार्षिक मूल्य दर विचारात घेऊन पुढील गणिती सूत्रानुसार जमिनीचे भांडवली मूल्य निश्चित करण्यात येईल,
जमिनीचे भांडवली मूल्य जमिनीचे क्षेत्रफळ जमिनीचे वाषिक मूल्य वर
(२) वार्षिक मूल्य दर तक्त्यामध्ये विनिदिष्ट केलेल्या ” मुद्रांक शुल्क मुल्यांकनाच्या महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये” काहीही अंतर्भूत असले तरी, या नियमांमध्ये केलेल्या तरतुदी, राज्याच्या विधिमंडळाने तयार केलेल्या इतर कोणत्याही कायद्यातील तरतुदीवर किंवा राज्य विधिमंडळ कायदा करण्यास अथवा सुधारणा करण्यास सक्षम आहे अशा कोणत्याही कायद्यास, जेथवर असा कायदा उक्त तरतुदींशी किंवा नियमांशी विसंगत नसेल तेथवर, अभिभावी असतील आणि असा कायदा अशा विसंगतीपुरताच अशा बाबीस लागू होण्याचे बंद होईल अथवा लागू होणार नाही.
(३) पवनचक्की, दळणवळण व इतर प्रयोजनांकरिता वापरण्यात येणारे मनोरे व त्यांची कार्य पार पाडण्याकरिता आवश्यक असलेल्या जमिनी वावर कर बसविण्याचे ज्या पंचायतीने ठरविले असेल, अशा प्रत्येक पंचायतीने, उपनियम (४) च्या तरतुदीस अधीन राहून आणि नियम ३ व ४ यांत विहीत केलेली कार्यपद्धती अनुसरल्यानंतर, उक्त मनोरे व जमिनी यांच्या संपूर्ण क्षेत्रफळावर (प्रति चौरस फुटाच्या आधारे) संबंधित ग्रामपंचायतीने अनुसूची अ मधील तक्ता ५ मध्ये विनिदिष्ट केलेल्या दराने ठरविल्यानुसार असा कर बसविला पाहिजे:
परंतु, संबंधित ग्रामपंचायतीने ठरविलेला कराचा दर, हा अनुसूची अ मधील तक्ता ५ मधील स्तंभ (४) व (५) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या किमान दरापेक्षा कमी व कमाल दरापेक्षा अधिक असता कामा नये.
(४) पुढील जमिनी व इमारती यांना उप-नियम (१), अन्वये कर बसविण्यातून सूट देण्यात आली पाहिजे:-
(क) स्थानिक प्राधिकारी संस्थांच्या मालकीच्या, आणि केवळ सार्वजनिक प्रयोजनासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या किंवा उपयोगात आणण्याचा इरादा असलेल्या आणि नफ्याच्या प्रयोजनासाठी उपयांगात न आणल्या जाणाऱ्या किंवा उपयोग करण्याचा इरादा नसलेल्या जमिनी व इमारती:
(ख) सरकारच्या मालकीच्या जमिनी व इमारती मग त्या नफ्याच्या प्रयोजनाकरिता उपयोगात आणल्या जात असोत वा नसोत किंवा उपयोगात आणण्याचा इरादा असो वा नसो :
(क) केवळ धार्मिक, शैक्षणिक किंवा धर्मादाय प्रयोजनासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या जमिनी व इमारती:
स्पष्टीकरण. – १. धार्मिक प्रयोजनासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या मालमत्तेमधील ज्या भागात प्रार्थना होते त्याव्यतिरिक्त असलेल्या निवासी, कार्यालयीन, व्यावसायिक इत्यादी कारणाकरिता वापरात असणाऱ्या भागास कर आकारणी करण्यात येईल.
२. शैक्षणिक प्रयोजनासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या मालमत्तेमधील वर्ग खोल्या, ग्रंथालय, प्रयोग शाळा, कार्यालय, क्रिडांगण, प्रेक्षागृह याव्यतिरिक्त वसतिगृह, कर्मचारी निवासस्थाने, उपाहारगृह, व्यावसायिक इत्यादी कारणाकरिता वापरात असणाऱ्या भागास कर आकारणी करण्यात येईल.
३. ज्या धर्मादाय संस्थांना आयकर अधिनियम, १९६१ (सन १९६१ चा अधिनियम क्र. ४३) अन्वये सूट देण्यात आली आहे त्याच धर्मादाय संस्थांना कर आकारणीतून सूट देण्यात येईल आणि इतर धर्मादाय संस्था कर पात्र असतील.
(घ) संरक्षण दलातील शौर्य पदक किंवा सेवापदक धारक व अशा पदक धारकांच्या विधवा किंवा अवलंबितांच्या वापरात आणल्या जाणाऱ्या फक्त एकच निवासी इमारतीस, करातून माफी असेल :
परंतु, अशा कर माफीस पात्र ठरणाऱ्या व्यक्तीने, ती व्यक्ती शोर्य पदक किंवा सेवा पदक धारक किंवा ती व्यक्ती उक्त पदक धारकाची विधवा किंवा अवलंबित असल्याबाबतचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र सादर करील;
(ङ) युनायटेड स्टेटस् टेक्निकल को-ऑपरेशन मिशनच्या सेवक वर्गातील सदस्याच्या मालकीच्या नफ्याच्या कारणासाठी उपयोगात न आणल्या जाणाऱ्या किंवा उपयोगात आणण्याचा इरादा नसलेल्या जमिनी व इमारती; आणि
(च) आदिवासी व डोंगराळ भागातील जमिनींना करातून माफी असेल, परंतु अशा भागातील जमिनींचा औद्योगिक, पर्यटन किंवा वाणिज्यिक प्रयोजनार्थ वापर होत असल्यास अशा जमिनींना कर आकारणी करण्यात येईल :
परंतु, या नियमातील कोणत्याही गोष्टीमुळे, भारतीय रेल्वे अधिनियम, १८९० (सन १८९० चा अधिनियम क्र. ९) याच्या कलम १३५ खालील किंवा रेल्वे (स्थानिक प्राधिकारी कर आकारणी) अधिनियम, १९४१ (सन १९४१ चा अधिनियम क्र. २५), याच्या कलम ३ खालील अधिसूचनेनुसार जो कर किंवा त्या ऐवजी रक्कम देण्याबद्दल रेल्वे प्रशासन जबाबदार आहे अशा कोणत्याही जमिनी किंवा इमारती यांस कर माफी आहे असे समजण्यात येणार नाही.
८. कोणत्या तारखेपासून कर अमलात येईल ते. दिनांक १ एप्रिल रोजी सुरू होणाऱ्या व ३१ मार्च रोजी संपणाऱ्या वर्षासाठी
कर बसविण्यात येईल आणि तो कोणत्याही वर्षातील १ एप्रिल, १ जुलै, १ ऑक्टोबर किंवा १ जानेवारी या तारखांव्यतिरिक्त, इतर तारखांस अंमलात येणार नाही; आणि तो एप्रिल व्यतिरिक्त कोणत्याही इतर दिवशी अंमलात आला असेल तर तो त्यानंतर येणाऱ्या, १ एप्रिलपर्यंत तिमाहीने बसविण्यात आला पाहिजे.

B) मूल्यधारीत कर आकारणी शासन निर्णय पीआयएल-२६१४/प्र.क्र.३३९/पंरा-४ दिनांक. 10-12-2018 प्राप्त करून घेणेसाठी येथे click करा

हरकती व सूचना मागविण्यासाठीची शासन अधिसूचना- महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी (दुसरी सुधारणा) नियम, 2019,शासन निर्णय दिनांक 28-11-2019 प्राप्त करून घेणेसाठी येथे click करा

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम.
क्रमांक व्हीपीएम. २०१६/प्र.क्र. १६६/पंरा ४ (२२). महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, (१९५९ चा ३) याच्या कलम १७६ च्या पोट-कलम (२) च्या खंड (सव्वीस) व्दारे प्रदान करण्यात आलेल्या व या बाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम, १९६० यांत आणखी सुधारणा करण्याचे योजिलेल्या पुढील नियमांचा मसुदा हा, त्यामुळे बाधा पोचण्याची शक्यता असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीकरिता, उक्त अधिनियमाच्या कलम १७६ चे पोट-कलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे, याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे; आणि याद्वारे अशी नोटीस देण्यात येत आहे की, उक्त मसुदा महाराष्ट्र शासनाकडून दिनांक १४ डिसेंबर २०१९ रोजी किंवा त्यानंतर विचारात घेण्यात येईल.

 ८) हरकतींचे निराकरण करुन आकारणीचे दर निश्चित करावेत.

९) कराची फेरआकारणी करताना करामध्ये जी वाढ होईल, ती अगोदरच्या वर्षाच्या ३०% पेक्षा जास्त असता कामा नये.

१०) आर्थिक वर्ष सुरु झाल्यानंतर पहिल्या ६ महिन्याच्या आत कर भरणाऱ्या खातेदारास चालू करात ५ टक्के सूट देण्यात येईल. नंतरचे संपुर्ण आर्थिक वर्षात कराचा भरणा न करणाऱ्या खातेदारास त्या वर्षाच्या थकबाकीवर ५ टक्के दंड आकारला जाईल. सहा महिने ते वर्ष संपेपर्यंत कर भरणा करणाऱ्या खातेदारास सुट मिळणार नाही.

१२) संरक्षण दलातील शौर्यपदक, सेवापदक धारकाच्या विधवा पत्नीस किंवा अवलंबिताच्या वापरात आणल्या जाणाऱ्या फक्त एकच निवासी इमारतीस करातून माफी असेल. यासाठी जिल्हा सैनिक कल्याण बोडचि प्रमाणपत्र अनिवार्य असेल.

१३) मोबाईल मनोरे व पवनचक्की यावर कर आकारणी करताना मनोन्याची लांबी-रुंदी विचारात घ्याची व क्षेत्रफळावर आधारीत कर आकारणी करावी, सौर ऊर्जा प्रकल्पांवर कर आकारणी करावी.

ग्रामपंचायत हद्दीतील बीएसएनएलच्या मोबाईल टॉवरवरील कर आकारणी व वसुलीबाबत. उक्त अधिनियम व नियमांतील तरतुदींनुसार राज्यातील बीएसएनएल टॉवर्सवर कर आकारणी व वसुली बंधनकारक आहे. शासन निर्णय क्र. व्हीपीएम २०१५/प्र.क्र.४४/पंरा४ दिनांक:-01-04-2015

ग्रामपंचायत हद्दीतील सौर उर्जा प्रकलपांवर कर, शासन निर्णय दिनांक 02-07-2018 प्राप्त करून घेणेसाठी येथे click करा

१) सौर ऊर्जा वीज निर्मिती प्रकल्पांना केवळ जमीन / मोकळा भूखंड गृहीत धरून जमिनीच्या भांडवलीमूल्याच्या आधारे कर आकारणी करण्यात यावी. भांडवली मूल्य निश्चितीसाठी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या वार्षिक मूल्य दर तक्त्यातील बिनशेती जमिन/भूखंडाचे दर घेण्यात यावे.
२) वाचा येथील अधिसूचनेमधील नियम २० खालील अनुसूची अ मधील तक्ता ४ मध्ये नमूद करण्यात आलेल्या जमिनीवरील कराच्या किमान दराने कर आकारणी करण्यात यावी.
३) तथापि, सौर ऊर्जा प्रकल्पातील सौर संयंत्राव्यतिरिक्त अन्य बांधकामांना/इमारतींना नियमाप्रमाणे कर आकारणी करण्यात यावी.
४) संपूर्ण सौर ऊर्जा प्रकल्पास औद्योगिक व वाणिज्यिक भारांक अनुज्ञेय राहणार नाही.
५) निवासी, व्यावसायिक, औद्योगिक इमारतींच्या छतावरील सौरऊर्जा वीज निर्मितीच्या संयंत्रणांना मालमत्ता कर आकारणी करण्यात येऊ नये.
६) सौर ऊर्जा प्रकल्प बंद असला तरी कर आकारणी करण्यात येईल.
७) सौर ऊर्जा प्रकल्पांवर कर आकारणी करण्याबाबत स्पष्टता नसल्याने सौर ऊर्जा प्रकल्पांवर पूर्वलक्षीप्रभावाने वरीलप्रमाणे कर आकारण्यात यावी. तसेच यापूर्वीची वसुलीची रक्कम जास्त असल्यास सदर रक्कम परत न करता आणि त्यावर कोणतेही व्याज न देता पुढील वर्षांमध्ये करण्यात येणाऱ्या कर आकारणीच्या रक्कमेशी टप्प्या टप्प्याने पुस्तकी समायोजन करावे.

१४) बहुमजली इमारतीच्या बाबतीत कर आकारणी करताना प्रत्येक मजल्याचे क्षेत्रफळ स्वतंत्रपणे विचारात घेतले जाईल.

१५) सन १९७० पूर्वी बांधलेल्या इमारतीवर कराची आकारणी करताना ती आकारणी किमान दराने करणे सक्तीचे आहे.

१६) मोकळ्या भूखंडावर कर आकारणी करताना जमिनीच्या कराच्या दराप्रमाणे करण्यात यावी, आकारणी करताना १ एप्रिल रोजी सुरु होणाऱ्या व ३१ मार्च रोजी संपणाऱ्या वर्षासाठी करावी, तसेच ती १ एप्रिल, १ जुलै, १ ऑक्टोबर व १ जानेवारी या तारखेस अंमलात येईल.

ग्रामपंचायत कर आकारणी बाबत ग्राम प अधिनियम २   महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (सुधारणा) आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत (कारखान्यांकडून करांऐवजी ठोक रक्कमेच्या स्वरूपात अंशदान देण्यासंबंधी) नियम (निरसन) अधिनियम, 2017 (सन 2018 चा महाराष्ट्र अधिनियम क्र 11) शासन निर्णय दि 15-02-2018

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

ग्रामपंचायत हद्दीतील औद्योगिक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रातील मिळकतीकडून करांची वसूली ग्रामपंचायतीच्या वतीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडल कडून करने,शासन निर्णय दि 13-09-2019

१) ग्रामपंचायती आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने संदर्भीय शासन अधिसूचनेन्वये कार्यवाही करावी.
२) ग्रामपंचायत हद्दीमधील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रातील जमीन, इमारती व मालमत्ता यांवरील सामान्य आरोग्य रक्षण उपकर (स्वच्छता कर) व दिवाबत्ती कर यांसहित मालमत्ता कर यांची वसुली ग्रामपंचायतीच्यावतीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने करावयाची आहे.
३) त्यानुसार ग्रामपंचायतीने महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम, १९६० मधील तरतुदीनुसार प्रचलित पद्धतीनुसार त्यांच्या हद्दीमधील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रातील मिळकतींवर कर आकारणी करावी.
४) त्याची देयके महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या स्थानिक कार्यालयाकडे देण्यात यावी.
५) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने सदरील देयके संबंधितांना बजावून व ग्रामपंचायतीच्या वतीने कर वसुली करावी व त्याबाबतची संबंधितांना पावती द्यावी.
६) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने वसूल केलेल्या कराच्या एकूण रकमेपैकी ५० टक्के इतकी रक्कम स्वतःकडे ठेवून उर्वरित ५० टक्के इतकी रक्कम ग्रामपंचायतीस द्यावयाची आहे.
७) त्याकरिता ग्रामपंचायतीने ग्रामनिधीबाबतचे बैंक खाते क्रमांक संबंधित गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडून प्रमाणित करून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास उपलब्ध करून देण्यात यावे.
८) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने प्रत्येक महिन्याच्या सात तारखेपर्यंत मागील महिन्यात वसूल झालेल्या कराच्या एकूण रकमेपैकी ५० टक्के इतकी रक्कम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने स्वतःकडे ठेवून उर्वरित ५० टक्के इतकी रक्कम ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीबाबतच्या बँक खात्यावर हस्तांतरित करावी. तसेच यासंदर्भात मिळकतनिहाय थकबाकीदार व वसुली झालेली रक्कम त्यांना देण्यात आलेल्या पावतीच्या प्रतीसह सविस्तर माहिती देण्यात यावी.
९) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व ग्रामपंचायत स्तरावर यासंदर्भात स्वतंत्र लेखे ठेवण्यात यावे.
१०) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने स्वतःच्या साधनांचा/पर्यार्याचा आकर्षक वापर करुन कर वसुलीसाठी प्रयत्न करावा.
११) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम व त्याअंतर्गत केलेले नियम यांमधील तरतुदींनुसार ग्रामपंचायतीने थकबाकीदारांवर विहित पद्धतीने कार्यवाही करावी.
१२) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने स्वतःकडे ठेवलेल्या ५० टक्के रकमेचा विनियोग हा या कर वसुलीकरिता येणारा प्रशासकीय खर्च आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमामधील कलम ४५ मध्ये उल्लेख केलेल्या अनुसूची १ मधील ग्रामसूची मध्ये नमूद विषयांपैकी अ.क्र. २९, ३१, ३२, ३९, ४०, ४१, ४५, ५२, ५३ मधील विषयांबाबत कार्यवाही करण्यासाठी करावयाचा आहे. त्यानुषंगाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची त्यांच्या क्षेत्रात सर्व प्रकारच्या सोयीसुविधा जसे की रस्ते, दिवाबत्ती, कचरा/घनकचरा व्यवस्थापन, गटारे, पाणीपुरवठा, अग्निशमन सेवा (उपलब्धतेनुसार) इत्यादी पुरवण्याची सर्वस्वी जबाबदारी आहे.
१३) ग्रामपंचायतीच्या वतीने वसुल केलेल्या करापोटी मिळणारी ५० टक्के रक्कम व वरील सोयीसुविधांसाठीचा खर्च यामध्ये महामंडळास तुट आल्यास अशी तुट भरून काढण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ मधील प्रकरण क्र. ३ खालील कलम १७मधील तरतुदीच्या अनुषंगाने महामंडळाकडून त्यांच्या क्षेत्रातील औद्योगिक घटकांना सेवा शुल्काची आकारणी करण्यात येणार आहे.
१४) ज्या ग्रामपंचायतींकडून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास देणी अदा करावयाची आहे त्या ग्रामपंचायतीला उक्त महामंडळाकडून वर्ग करण्यात येणाऱ्या रकमेमधून सदर देणी रक्कम वजा करण्यास हरकत नाही. मात्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास ग्रामपंचायतीकडून देय असलेल्या रकमेबाबत वाद असल्यास सदर देय रकमेबाबतचा वाद विहित पद्धतीने मिटविल्यानंतरच अशी रक्कम वजावट करण्यात यावी.


संके ताक 201909131046136420 अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….









2.A) ग्राम पंचायत हद्दीतील MIDC क्षेत्रातील जमींन इमारती , मालमत्ता यावरील सामान्य आरोग्य रक्षण उपकर व दिवाबत्ती कर व मालमत्ता कर यांची वसूली ग्रापच्या वतीने MIDC ने करवायची आहे.

2.B) MIDC ने कराच्या एकुण रकमें पैकी ५० टक्के रक्कम स्वत कड़े ठेवून उर्वरित ५० टक्के रक्कम ग्रा प द्यावयाची आहे. 

2.C) ग्रा प ने ग्रामनिधी बाबतचे बैंक खाते क्र संबधित गटविकास अधिकारी यांचे कडून प्रमाणित करून MIDC उपलब्ध करून द्यावे.

2.D) दरमहा 7 तारखे पर्यंत मागील महिन्याची वसूल रक्कम पैकी ५० टक्के रक्कम ग्रामनिधी मधे जमा करावी

क) कर वसुली

१) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम मधील कलम १२९ प्रमाणे कर वसुलीचे अधिकार ग्रामपंचायतीस आहेत.

२) आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस माहे एप्रिल महिन्याच्या मासिक सभा व ग्रामसभेत वार्षिक कर मागणी अंतिम करणेत याची.

३) माहे में किंवा जून पूर्वी प्रत्येक खातेदारास कर मागणीचे बील बजाविणेत यावे (नमुना ९ क प्रमाणे)

४) करदात्यास बील बजाविल्यानंतर १५ दिवसाच्या आत खातेदाराने करभरणा न केल्यास त्यास मागणीचा रुकुम (रिट नोटीस) बजाविणेत यावी. रिट नोटीसीची मुदत ३० दिवसांची असेल.

५) रिट नोटीसीची मुदत संपल्यानंतरही कराचा भरणा न केलेल्या खातेदाराबर जप्तीची कारवाई करणेत बाबी.

६) अशाप्रकारे कर वसुली झाली नाही तर वसुलीची यादी तहसिलदार यांचेकडे पाठवावी.

ग्रामपंचायतीने किमान ७०% करवसुली करणे बंधनकारक आहे. अन्यथा सरपंच व ग्रामसेवक कारवाईस पात्र ठरतात,

ग्रामपंचायतींच्या हद्दीतील मिळकर्तीवर कर आकारणी करुन वसुली करणेबाबत.

शासन परिपत्रक क्रमांकः पंरास २०१६/प्र.क्र.१७/पंरा-४ तारीखः १८ जुलै, २०१६ प्राप्त करून घेणेसाठी येथे click करा

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम १२४ व त्याअंतर्गत महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी (शुल्क) नियम १९६० यांमधील तरतुदींनुसार गावाच्या सीमेतील इमारती (मग त्या कृषी आकारणीस अधीन असोत किंवा नसोत) व जमिनी (ज्या कृषी आकारणीस अधीन नाहीत) यावर ग्रामपंचायतीस कर बसविण्याचा अधिकार आहे. त्यानुषंगाने ग्रामपंचायत हद्दीतील मिळकतींवर विहीत पद्धतीने कर आकारणी करुन कर वसुली करण्याबाबत तसेच, याकरिता करपात्र मिळकर्तीच्या नोंदी ग्रामपंचायतीकडील नमुना नं. ८ म्हणजेच, कर आकारणी नोंदवहीमध्ये करण्याबाबत तरतूद आहे.

उक्त तरतुदीनुसार ग्रामपंचायत हद्दीतील ज्या इमारतींनी विहीत पद्धतीने बांधकाम परवानगी घेतलेली असो अथवा नसो अशा इमारतींची ग्रामपंचायतीकडील नमुना नं. ८ म्हणजेच, कर आकारणी नोंदवहीमध्ये नोंद घेण्यात येऊन विहीत पद्धतीने कर आकारणी करुन कर वसुलीची कार्यवाही करण्यात यावी. तसेच, नमुना नं. ८ म्हणजेच कर आकारणी नोंदवहीमध्ये इमारतीची नोंद घेतल्यामुळे अनधिकृत/अतिक्रमित/अवैध इमारती/बांधकाम अधिकृत होत नाही.

नमुना नं 8 अद्ययावत करणे 04-02-2021 प्राप्त करून घेणेसाठी येथे click करा

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

ग्रामीण भागातील घराची नोंदणी पती-पत्नी यांच्या संयुक्त नांवे करण्याबाबत. 20-11-2003 प्राप्त करून घेणेसाठी येथे click करा

ड) आठवडे बाजार

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम १२६ नुसार ग्रामपंचायतीला बाजार व आठवडेबाजार यावर फी वसूल करण्यासाठी जाहिर लिलावाने किंवा खाजगी कराराने मक्ता देता येतो किंवा ग्रामपंचायत स्वतः कर वसूली करु शकेल. मक्ताच्या शर्तीच्या अटी मध्ये त्याने तारण देणे आवश्यक आहे.


You Might Be Interested In

You may also like

1 comment

ग्रामविकास E-सेवा March 31, 2025 - 1:08 pm

Pefect information thanks

Reply

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

36846

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare.