Tuesday, July 8, 2025
Tuesday, July 8, 2025
Home » इंदिरा गांधी राष्‍ट्रीय विधवा-अपंग निवृत्‍ती वेतन

इंदिरा गांधी राष्‍ट्रीय विधवा-अपंग निवृत्‍ती वेतन

0 comment

राज्‍यातील शिष्‍यवृत्‍ती, मानधनाचे प्रदान इत्‍यादी योजनांकरिता अनुदान वितरण प्रक्रियेचे सुलभीकरण.. CR क्रमांक:- NO/MTR-1010/CR.32/TP-5, दिनांक:- 28-05-2012

परिपत्रकः- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजनांना संदर्भाधिन परिपत्रकांन्वये बीम्स प्रणालीवर उणे प्राधिकारपत्र काढण्याची मंजूरी देण्यात आली होती. या योजनांसोबत आता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या खालील योजनांना संदर्भाधिन शासन परिपत्रकात नमुद अटींस अधिन राहुन उणे प्राधिकारपत्र काढण्याची सोय बीम्स प्रणालीवर उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
अनु.क्र. योजनेचे नाव योजना संकेतांक
१ ] (०८) (११) इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना (केंद्र पुरस्कृत योजना) २२३५ बी ०४९ ५०
२ ] (०८) (१२) इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना (केंद्र पुरस्कृत योजना) २२३५ बी ०३१ ५०
उपरोक्त योजनांकरीता प्राप्त होणारा निधी उणे प्राधिकार पत्रावर काढत असतांना सदर निधी प्रत्यक्ष लाभार्थ्यांना वितरीत करणे आवश्यक राहील.
संगणक संकेतांक २०१२०५२८१६१५१०५१०००१ असा आहे.

केंद्र पुरस्‍कृत इंदिरा गांधी राष्‍ट्रीय अपंग निवृत्‍ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्‍ट्रीय विधवा निवृत्‍ती वेतन योजनांसाठी नवीन लेखाशीर्ष उघडण्‍याबाबत…. GR क्रमांक:- NO/VISAYO-2010/C.R.-01/VISAYO-1, दिनांक:- 09-02-2012

शासन निर्णय : केंद्र शासनाने आदेशान्वये इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजनाइंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना सुरु केली आहे. या दोन्ही योजना राज्यात राबविण्यात येत आहेत.

इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजनेतंर्गत दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या १८ ते ६४ वयोगटातील ८० टक्के पेक्षा जास्त अपंगत्व असलेले किंवा बहु अपंगत्व असलेले (दोन किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेले) लाभार्थी निवृत्ती वेतनास पात्र आहेत. ‘या लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून रु. २००/-प्रती माह व राज्य शासनाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजनेतंर्गत रु.४००/- प्रती माह असे एकूण रु.६००/- प्रती माह इतके निवृत्ती वेतन देण्यात येते. तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेमध्ये दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या ४० ते ६४ वयोगटातील विधवा लाभ घेण्यास पात्र आहेत.

या लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून रु. २००/- प्रती माह व राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतंर्गत रु.४००/- प्रती माह असे एकूण रु.६००/- प्रती माह निवृत्ती वेतन देण्यात येते.
दोन नवीन योजनांसाठी नवीन

सामाजिक अर्थसहाय योजना. GR क्रमांक:- 2010/CR 33/Visayo-2, दिनांक:- 13-07-2010

(१) इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनाः-
संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील, दारिद्रय रेषेखालील नोंद असलेल्या ४० ते ६४ वयोगटातील विधवा, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजने अंतर्गत निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र असतील. या अनुषंगाने पात्र लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून रु.२००/- प्रतीमहा व राज्य शासनाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजने अंतर्गत अनुज्ञेय असलेले रु.३००/- प्रतीमहा असे एकूण रु.५००/- प्रतीमहा निवृत्तीवेतन अनुज्ञेय राहील.
(२) इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजनाः-
संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधील दारिद्रय रेषेखालील नोंद असलेल्या अपंग लाभार्थ्यांपैकी फक्त १८ ते ६४ वयोगटातील ८०% हून जास्त अपंगत्व असलेले तसेच एक किंवा एका पेक्षा जास्त अपंगत्व असलेले किंवा बहू अपंगत्व असलेले (दोन किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व) असलेले लाभार्थी (केंद्र शासनाच्या दिनांक ३०/०९/२००९ च्या ज्ञापनानुसार), इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजनेंतर्गत निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र राहतील. या अनुषंगाने पात्र लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून रु.२००/- प्रतीमहा व राज्य शासनाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेले रु.३००/- प्रतीमहा असे एकूण रु.५००/- प्रतीमहा निवृत्तीवेतन अनुज्ञेय राहील.
२. वरील पात्र लाभार्थ्यांव्यतिरिक्त, संदर्भाधीन क्रमांक २ येथील केंद्र शासनाच्या दिनांक ३० सप्टेंबर, २००९ च्या कार्यालयीन ज्ञापनानुसार पात्र असलेले लाभार्थी (संजय गांधी निराधार अनुदान योजनेत जरी लाभ घेत नसले तरी) संबंधित तहसिलदार, नायब तहसिलदार यांच्याकडे स्वतंत्रपणे नव्याने अर्ज करु शकतील.

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

36729

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare.